Breaking News

Ramprahar News Team

दोन ट्रेलर चोरांना अटक; तर तिघांचा शोध सुरू

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जीडीएल गोदामाजवळून उभ्या असलेल्या जागेतून 6 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 7 नोव्हेंबर 2019 सकाळी 7 वाजताच्या दरम्यान 40 फुटी ट्रेलर चोरणार्‍या टोळीतील दोन आरोपींना उरण पोलिसांनी अटक केली. या टोळीतील आणखी तीन आरोपी फरारी असून, उरण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. …

Read More »

पालिकेचा दहा एकर भूखंड राखीव, न्यायालयाची इमारत आणि न्यायाधीशांचे निवासस्थान

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत न्यायालयाची इमारत आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी दहा एकरचा भूखंड महापालिकेच्या आराखड्यात राखीव ठेवण्यात येईल, असे महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण महासभेत अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगण्यात आले. पनवेल येथे सध्या दिवाणी कनिष्ठ, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, दिवाणी वरिष्ठस्तर आणि अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू …

Read More »

बेशिस्त वाहनचालकांवर ‘ऑफलाइन’ कारवाई

पनवेल : बातमीदार वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांना चाप लावण्यासाठी राज्यात वाहतूक विभागाला देण्यात आलेल्या ‘इंटरसेप्टर’ वाहनाचे उद्घाटन ठिकठिकाणी पार पडले, मात्र नवी मुंबईतील अशा दोन ‘इंटरसेप्टर’ वाहनांमधील प्रणाली अद्याप कार्यरत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या नियमभंग करणार्‍यांवर ‘ऑफलाइन’ कारवाई केली जात आहे. प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ‘ई-चलान’ पाठविण्यात …

Read More »

उरण येथे राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे आयोजन

उरण : प्रतिनिधी उरण शहरातील विमला तलाव येथे कोकण मराठी साहित्य परिषद, मधुबन कट्ट्याची दर महिन्याच्या 17 तारखेला सातत्याने कविसंमेलने होत असतात. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून राज्यातील प्रगल्भ कवींच्या लेखणीचे कौतुक करण्याच्या हेतूने कट्ट्याचे संस्थापक तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख प्रा. एल. बी. पाटील यांच्या आधिपत्याखाली मधुबन कट्ट्याच्या …

Read More »

कामोठे येथे भव्य चित्रकला स्पर्धा

कामोठे : रामप्रहर वृत्त दिशा महिला मंच (साई मीडिया) आणि नवी मुंबई मैथिल ट्रस्ट आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन संत तुकाराम महाराज मंदिर, सेक्टर 36, कामोठे येथे बालदिनानिमित्त करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सुमारे 220 मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन, तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र …

Read More »

रेड डॉट फाऊंडेशनच्या उपक्रम हाय राईस अ‍ॅवॉर्डने सन्मानित

पनवेल : वार्ताहर प्रोजेक्ट रेड डॉट उपक्रम महिलांना गेल्या 18 महिन्यापासून वापरलेले पॅड, लाल वर्तुळ असलेल्या प्रोजेक्ट रेड डॉटच्या पिशवीत टाकण्यासाठी आवाहन करीत आहेत. मुंबईत सुरू झालेल्या या उपक्रमाने विविध शहरात त्याचे अ‍ॅम्बेसिडर नेमण्यात या उपक्रमाचे संस्थापक विकास मोतीराम कोळी यांना यश लाभले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कर्नाटकातील बेंगळुरू …

Read More »

सुकापूर रस्त्यालगत अतिक्रमण, ग्रामपंचायतीकडून कारवाईची मागणी

पनवेल : बातमीदार सुकापूर गावालगत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढू लागले आहे. त्यामुळे अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी पाली देवद ग्रामपंचायतीने केली आहे. नवीन पनवेल शहराला लागूनच असलेले सुकापूर या गावाजवळील जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. जागा शिल्लक नसल्याने अनेकांनी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटलेली आहेत. …

Read More »

तणाव व शारीरिक व्याधीमुक्तीसाठी योगसाधना उपयुक्त -सिद्धार्थ शिलवंत

कर्जत : प्रतिनिधी शरीर आणि मन एकत्र येणे योगाने शक्य होते. नित्य नियमाने योगा केल्यास आपले मन प्रसन्न राहतेच शिवाय शारीरिक व्याधी दूर होतात, असा दावा अंबिका योग कुटीरचे कल्याण शाखा संचालक सिद्धार्थ शिलवंत यांनी कर्जत येथे केले. श्री छत्रपती शिवाजी मंडळ आणि श्री अंबिका योग कुटीर (ठाणे) यांच्या संयुक्त …

Read More »

अंजुमन इस्लाम महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम

मुरुड : प्रतिनिधी तारुण्यात येणार्‍या मुलांनी स्वतः सक्षम बनून कोणत्याही अमिषाला बळी न पडता येणार्‍या पेचप्रसंगावर मात करण्यास शिकणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन  अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी मुरूड येथे केले. बाल सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने रायगड पोलीस दल, मुरुड पोलीस ठाणे व अंजुमन इस्लाम महाविद्यालयातील महिला विकास कक्ष …

Read More »

प्लास्टिक निर्मूलनासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा -सरपंच डॉ. धात्रक

नागोठणे : प्रतिनिधी प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मूलनाची जनजागृती करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, त्या करिता ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेलच. मात्र, या निर्मूलनाची सुरुवात प्रत्येक महिलेने आपल्या घरापासूनच करावी, असे आवाहन नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी केले. नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांची ग्रामसभा सोमवारी (दि. 18) बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी …

Read More »