पेण : प्रतिनिधी पेण-खोपोली मार्गावर धामणी गावाच्या हद्दीत एसटी बस अडवून बस चालकाला शिवीगाळी करून एसटी बसचे दोन्ही बाजूचे आरसे फोडून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी बस (एमएच-20,डी-8921) गुरूवारी (दि. 19) सकाळी 11 वाजता पेण-खोपोली मार्गाने जात होती. धामणी गावाच्या हद्दीत …
Read More »चाकूच्या धाकाने लुटणारी चौकडी जेरबंद, दीड लाखाचा माल हस्तगत
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी चाकूच्या धाक दाखवून चौक येथील कृष्णा सीताराम मुकादम (वय 43) यांच्या जवळील सोन्याची चेन, बाली आणि मोबाईल असा दिड लाखाचा ऐवज लुटणार्या चौकडीच्या खालापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चौकमधील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या नवरत्न हॉटेल येथे शनिवारी (दि. 18) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कृष्णा मुकादम यांना चार …
Read More »माणगाव भाजप अध्यक्षपदी संजय ढवळे यांची बिनविरोध फेरनिवड
माणगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या माणगाव तालुका अध्यक्षपदी संजयआप्पा ढवळे यांची शुक्रवारी (दि. 20) बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. भाजपची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून माणगाव तालुका भाजपची बैठक शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मुंढे यांच्या अधिपत्याखाली येथील खरे मंगल कार्यालयात घेण्यात आली. त्यात नामनिर्देशन …
Read More »नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत व कोळी बांधवांना डिझेल परतावा मिळावा, आमदार रविशेठ पाटील यांची अधिवेशनात मागणी
पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी त्याचबरोबर कोळी बांधवाना डिझेल परतावा मिळावा, अशी आग्रही मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. समुद्रामध्ये वारंवार होणार्या वादळांमुळे मच्छिमारांना मच्छी मिळणे मुश्किल झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करून रायगडमधील कोळीबांधवांना डिझेल परतावा मिळावा, तसेच शेतकर्यांना नुकसान भरपाईपोटी करण्यात …
Read More »कर्जतचे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बळीराजाकडे पाठ
कर्जत : बातमीदार पावसाळ्यातील भातपिकाच्या नुकसानीबद्दल मदतीचा पहिला टप्पा म्हणून राज्य शासनाने 27 नोव्हेंबर 2019 रोजी कर्जत तालुक्यातील 1612 शेतकर्यांना त्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत नुकसानग्रस्त असलेल्या आणि शेतीचे पंचनामे झालेल्या 8432 शेतकर्यांना अद्याप शासनाची मदत मिळालेली नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जत …
Read More »बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी लाच
अहमदनगर : प्रतिनिधी महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसंबंधी देशभर संतापाची लाट आहे. त्यातून हैद्राबाद येथे पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे समर्थनही केले जात आहे. नगरच्या पारनेर तालुक्यात मात्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला मदत करण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला गेला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी …
Read More »कितीही आंदोलने झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होणारच – रविशंकर प्रसाद
मुंबई : प्रतिनिधी नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात दिल्ली, पाटणा, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, मुंबईमध्ये आंदोलने करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडताहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी नागरिकत्व विधेयकावरून सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. कितीही आंदोलने झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. नागरिकत्व …
Read More »उद्धव ठाकरेंकडून खुर्ची वाचवण्याची कवायत; फडणवीसांचा प्रतिटोला
नागपूर ः प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ आपली खुर्ची वाचवण्याची कवायत करीत आहेत. आपल्या बाजूला बसलेले पक्ष कसे खूश राहतील, त्यांचे मन कसे राखले जाईल याचा विचार त्यांच्याकडून करण्यात येत आहे, मात्र शेतकर्यांच्या प्रश्नावर काहीही उत्तर दिले जात नाही. म्हणूनच आम्ही सभात्याग केला, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »सुधारित नागरिकत्व कायद्याचे विद्यार्थ्यांकडून समर्थन
पुणे ः प्रतिनिधी देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन होत असताना पुण्यात मात्र वेगळे चित्र दिसत आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, दुसरीकडे देशभरात मात्र सुधारित …
Read More »महिलांनी आपल्या मनातील भीती दूर करावी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उंचावले मनोबल, महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधी आज सर्वच क्षेत्रांत महिला उत्तुंग भरारी घेत आहेत. त्यामुळे व्यवसाय करताना महिलांनी मनातील भीती दूर करावी, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. अबोली रिक्षा महिला संघटनेच्या वतीने पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 19) करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper