सार्वजनिक जीवनात वावरणार्या व्यक्तीला निवृत्ती असते की नसते हा एक संशोधनाचाच विषय आहे. विशेषकरून राजकारणात वावरणार्या व्यक्ती बहुधा तहहयात सत्तेत राहण्याचा अट्टाहास का करतात हे एक न उलगडणारे कोडेच आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकीत बहुतांशी सर्वच राजकीय पक्षांनी ज्येष्ठांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात धन्यता मानली आहे. …
Read More »Monthly Archives: March 2019
पवारांची प्रतिष्ठा पणास
देशाच्या राजकारणातील जाणता राजा, बदलत्या हवेचा सर्वांत आधी अंदाज येणारा तज्ज्ञ, अचूक निर्णय घेणारा धुरंधर नेता म्हणजे शरद पवार. पवारांचे राजकीय गणित सहसा चुकत नाही किंबहुना क्लिष्ट समीकरणांची आपल्या अनुभवाच्या जोरावर ते उकल करतात, असा आजवरचा इतिहास आहे. अशा या ’पॉवर’फुल्ल नेत्याची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र कसोटी लागलेली दिसून येते. …
Read More »नांदगावमध्ये शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
मुरुड : प्रतिनिधी शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शनिवारी नांदगाव मराठी शाळा क्र.1 च्या पटांगणात शनिवारी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. पत्रकार उदय खोत यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषणे केली. संजय ठाकूर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. मंडळाचे अध्यक्ष महेश …
Read More »कुहीरेत साकारले भव्य देखणे शिवस्मारक
पाली : प्रतिनिधी पेण तालुक्यातील कुहीरे गावात गावदेवी क्रीडा मंडळ व महिला मंडळाच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून भव्य व देखणे शिवस्मारक साकारले आहे. गावाच्या प्रवेशद्वाराजवळच मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून शनिवारी (दि.23) या शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. गावात काढण्यात आलेल्या शिवप्रतिमेच्या मिरवणुकीत भगवे फेटे परिधान …
Read More »मारूती पाटील यांची शिवजयंतीला सायकल भ्रमंती
अलिबाग : प्रतिनिधी अंगात भगवे कपडे…सायकलला मागे-पुढे भगवे झेंडे आणि ध्वनिक्षेपकावर शिवरायांच्या जीवनावरील पोवाडे ऐकवित अलिबाग-रेवस रस्त्यावरून निघालेला एक सायकल स्वार सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. मारूती लक्ष्मण पाटील (45) असे या शिवभक्ताचे नाव आहे. अलिबाग तालुक्यातील सारळ-आदिवासी वाडी हे मारूती पाटील यांचे गाव. गेली 27 वर्षे मारूती पाटील शिवजयंतीच्या …
Read More »नेरळमध्ये शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत
कर्जत : बातमीदार शिवजयंतीनिमित्त येथील श्याम कडव आणि प्रथमेश कर्णिक हे शिवप्रेमी तरुण गेल्या चार वर्षांपासून वेगवेगळ्या किल्ल्यांवरून नेरळमध्ये शिवज्योत आणतात. यावर्षी त्यांनी 240 किलोमीटरचे अंतर पार करून सज्जनगड येथून शिवज्योत आणली होती. तिचे नेरळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथील स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेऊन 21 मार्च …
Read More »माणगावात शिवजयंती उत्साहात साजरी
माणगाव : प्रतिनिधी माणगांव नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी (दि. 23) उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शिवप्रेमींनी रायगडावरुन वाजत गाजत शिवज्योत आणली होती. खांदाड ग्रामस्थांनी सकाळी शिवप्रतिमेचे पूजन करुन छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष केला. खांदाड ग्रामस्थांनी शिवज्योतीसह माणगांव बाजारपेठेतून वाजत गाजत …
Read More »‘शिवचरित्राचे अध्ययन करुन ते आचरणात आणावे’
खोपोली : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे अध्ययन करुन तो इतिहास समजून घेऊन तरुण पिढीने आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शिवव्याख्याते प्रा. अविनाश मोरे यांनी कडाव येथे केले. अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या कडाव (ता. कर्जत) येथील शिशू मंदिरमधील व्याख्यानमालेत प्रा. मोरे बोलत होते. शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत कुडे, …
Read More »महाड येथे आरपीआय (डे)ची अभिवादन सभा
पनवेल : वार्ताहर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीक रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची जाहीर सभा रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली महाड येथे क्रांतीदिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. प्रथम महाड येथील चवदार तळ्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभेला सुरूवात करण्यात आली. . रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी यापुढे गट-तट …
Read More »नेरळमध्ये शिवप्रभुंच्या नूतन पुतळ्याची स्थापना,चौकाचेही नुतनीकरण
कर्जत : बातमीदार शिवजयंतीचे औचित्यसाधून नेरळ येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या शिवाजी महाराज चौकात शनिवारी महाराजांची नवीन मूर्ती प्रतिस्थापित करण्यात आली. यावेळी संपूर्ण शहरात काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीच्या निमित्ताने नेरळ भगवेमय झाले होते. सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने 1994 मध्ये प्रथम नेरळ गावात असलेल्या शिवाजी महाराज चौकाचा चौथरा उभा राहिला, तर त्यावर …
Read More »