Breaking News

Monthly Archives: March 2019

पनवेल मार्केटमध्ये तुकाराम बीज उत्सव

पनवेल : विठ्ठलाच्या जयघोषात आणि तुकोबाच्या सुरेल अभंगात पनवेल मार्केटमध्ये तुकाराम बीजोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तुकाराम महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली होती.

Read More »

गव्हाण कोपर हनुमान मंदिरात तुकाराम बीज उत्सव

गव्हाण : गव्हाण कोपर येथील हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे तुकाराम बीज उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. या वेळी पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत,  सरपंच हेमलता म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, योगिता भगत, उषा देशमुख, माई भोईर उपस्थित होते.

Read More »

विश्वास काथारा यांची निवड

पनवेल : तालुक्यातील नेवाळी येथील ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्षपदी विश्वास आत्माराम काथारा यांची निवड करण्यात आली.त्याबद्दल पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले. सोबत आदईचे उपसरपंच योगेश पाटील, नगरसेवक अनिल भगत, मयूर ठाकूर, अनंत तुकाराम काथारा हे दिसत आहेत.

Read More »

मतदारांसाठी आयोगाची हेल्पलाईन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने 1950 ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत 15 मदत केंद्रे कार्यरत असून, त्यामुळे मतदारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे. आचारसंहिता लागल्याच्या कालावधीपासून या हेल्पलाइनवर दररोज विचारणा केली जात आहे. कॉल …

Read More »

नवी मुंबईत पंधरा टन प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : बातमीदार स्वच्छ, सुंदर नवी मुंबईसाठी मनपाने जोरदार प्रयत्न सुरु केले असून, मनपा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मनपा हद्दीतील दोन कंपन्यावर धाडी टाकून सुमारे 15 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. स्वच्छतेसोबतच पर्यावरणशील दृष्टीकोन नजरेसमोर ठेऊन प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्याकडेही नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष …

Read More »

कर्नाळा ग्रामपंचायत निवडणूक; परिवर्तन आघाडीची प्रचार रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेपूर्वी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्यातचे मतदारांना आवाहन केले. या वेळी उरण मतदारसंघाचे आमदार मनोहर भोईर, भाजपचे …

Read More »

मुरूड लक्ष्मीखार येथे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

मुरूड : प्रतिनिधी : जागतिक पोषण आहार पंधरवड्यानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मुरूड लक्ष्मीखार येथे किशोरवयीन मुलींना वयात येताना होणार्‍या शारीरिक बदलाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मुरूड ग्रामीण रुग्णालयाच्या अधिपरिचारिका संजाली कुलकर्णी यांनी वयात येताना होणारे शारीरिक बदल व मासिक पाळीच्या काळातील घ्यावयाची काळजी, तसेच पूरक पोषण आहार याबद्दल या वेळी …

Read More »

रोहा भास्तेकरवाडीत मसाला पिके लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण

रोहे ः प्रतिनिधी : शासनाच्या एकात्मिक फलोद्यान विकास अभियान अंतर्गत कोकणातील मसाला पिकांचे लागवड क्षेत्र वाढविणे व प्रक्रिया व्यवसायास चालना देण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्रामार्फत भोस्तेकरवाडी (ता. रोहे) येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यास घोसाळे परिसरातील 120 शेतकरी, महिला व युवक उपस्थित होते. किल्ला रोहे येथील कृषी …

Read More »

पाली खोपोली मार्गावर सांडले ऑईल

कार अपघातासह मोटारसायकलस्वार कोसळून जखमी पाली : प्रतिनिधी : पाली-खोपोली मार्गावर सांडलेल्या ऑईलवरून शुक्रवारी (दि. 22) अनेक वाहने घसरल्याची घटना घडली. त्यात काही मोटारसायकलस्वार कोसळून जखमी झाले, तर एका कारचा अपघात झाला. पाली-खोपोली मार्गावर वजरोली गावानजीक एका वळणावर रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणावर ऑईल सांडले होते. रस्त्यावरून येणार्‍या मोटारसायकलस्वारांना ऑईल साडल्याचे …

Read More »

अलिबागसे आया है क्या? या वाक्यावर बंदी घाला

राजाभाऊ ठाकूर यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका अलिबाग : प्रतिनिधी : अलिबागसे आया है क्या, या वाक्यावर गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. अनेक राजकीय, सामाजिक संस्था, व्यक्तींनी यावर निदर्शने, मोहिमा राबविल्या, पण याचा सोक्षमोक्ष लावण्याचे काम राजेंद्र उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून …

Read More »