उरण : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदार पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेचा खासदार हे तीन विधानसभा मतदारसंघ ठरवणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार फेब्रुवारी 2008मध्ये राज्यात मावळ हा एक नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. खंडाळा घाटाच्या वरील मावळ, चिंचवड …
Read More »Monthly Archives: March 2019
‘मैं भी चौकीदार’; भाजपचा नवा प्रचार फंडा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, ‘चौकीदार चौर हैं’ला प्रत्युत्तर म्हणून ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीम सुरू केली आहे. शनिवारी (दि. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मोहिमेला आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सुरुवात करून दिली. ‘तुमचा चौकीदार इथे उभा आहे आणि देशाची सेवा करतोय, पण मी एकटा …
Read More »धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई : ना. सुभाष देसाई
महाड : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात युतीच्या प्रमुख पदाधिकार्यांची संयुक्त बैठक शनिवारी (दि. 16) महाड येथे झाली. या बैठकीत पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी, ही लढाई म्हणजे भ्रष्ट मार्गाने पैसा मिळविलेल्या तटकरेंच्या धनशक्तीविरोधात निष्कलंक गीतेंच्या जनशक्तीची आहे, …
Read More »‘अफाट’ लोकप्रिय असलेल्या कांती कडूंना आता पनवेल विधानसभेची उमेदवारी द्या!
जनतेची एकमुखी मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त खरे पाहता आयुष्यभर खस्ता खात केलेल्या (तथाकथित) समाजकार्यामुळे प्रसिद्ध ठरलेल्या कांती कडू हे 2006 साली झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला, तसेच 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहू न शकल्यामुळे पनवेलकर या अफाट लोकप्रियता लाभलेल्या लोकप्रतिनिधीला मुकले. केवळ त्यामुळेच प्रशांत ठाकूर हे नगराध्यक्ष …
Read More »रायगड जिल्ह्यात युतीच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना-रिपाइं युतीच्या प्रचाराचा शुभारंभ पनवेल येथे दोन्ही पक्षांतील प्रमुख नेतेगणांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 16) धडाक्यात करण्यात आला. या वेळी बोलताना रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी, तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी जोमाने कामाला लागावे, असे निर्देश दिले. राज्यात युतीचा निर्णय झाल्यानंतर रविवारी प्रथमच …
Read More »प्रवीण सावंत यांना शुभेच्छा!
पनवेल : भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे पनवेल तालुका चिटणीस प्रवीण सावंत यांना जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »ज्येष्ठ कार्यकर्ते धर्मा काकडे यांना शुभेच्छा!
पनवेल : आदई ग्रामपंचायत पाणीपुरवठा आणि स्वच्छता कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ कार्यकर्ते धर्मा काकडे यांना युवा कार्यकर्ता शेखर शेळके, उपसरपंच योगेश पाटील सदाशेठ पाटील, बांबु ऑफिस ग्रुप आणि ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »पप्पू साळवे यांचा वाढदिवस
पनवेल : भाजपचे पंचशिल झोपडपट्टी अध्यक्ष पप्पू साळवे यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पप्पू साळवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी विजय चव्हाण, सुरेश सरोज, विठ्ठल राठोड, सुरज मंजुळे, आकाश झुंजार आदी उपस्थित होते.
Read More »जेएनपीटी टाऊनशीपसमोर तातडीने गतिरोधक बसवा
सुधीर घरत यांची मागणी जेएनपीटी : वार्ताहर वाहनांची आणि माणसांची वर्दळ असलेल्या जेएनपीटी टाऊनशिप गेटसमोरील रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावी, अशी मागणी भाजप वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर घरत यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांकडे केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. आठ दिवसाच्या आत येथे …
Read More »पनवेलमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा
पनवेल : वार्ताहर अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज श्री अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका दर्शन व पालखी परिक्रमा सोहळा प.पू. सद्गुरु नाना महाराज परांजपे यांच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामी समर्थ मंदिर (मठ) गावदेवी पाडा पनवेल येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाला. या वेळी श्री स्वामींच्या पालखीचे आगमन झाले असता तिचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper