पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक काचबिंदू सप्ताहनिमित्त लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट पनवेल आणि लक्ष्मी आय क्लिनिक खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने अंधाराकडून उजेडाकडे या शिर्षकाखाली काचबिंदू या दृष्टीदोषाविषयी जनजागृती करण्यासाठी खारघर येथे जनजागृती रॅली उत्स्फूर्त प्रतिसादात झाली. खारघरमधील सेक्टर 4 येथून प्रारंभ झालेल्या रॅलीचा समारोप सेक्टर 11 येथील श्री साईबाबा मंदिरात झाला. …
Read More »Monthly Archives: March 2019
उरणमध्ये महिला मेळाव्यास प्रतिसाद
मान्यवरांचा सहभाग, कलागुणांचे झाले दर्शन उरण : वार्ताहर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था उरण यांच्या वतीने उरण येथे महिला मेळावा 2019चे आयोजन रविवारी (दि. 10) रोजी करण्यात आले होते. सुमारे 1300 महिलांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून ए. एफ एस. मिनी अब्राहम …
Read More »तायक्वॉन्डो कलर बेल्ट परीक्षेत 384 खेळाडूंचा सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड तायक्वॉन्डो असोसिएशनतर्फे पळस्पे येथील पी. जे. बी. स्कूल येथे तायक्वॉन्डो या खेळाच्या कलर बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत या स्कूलमधील 384 खेळाडू सहभागी झाले होते. सातवी डिग्री ब्लॅक बेल्ट तायक्वॉन्डोचे आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक सुभाष पाटील आणि सहाय्यक प्रशिक्षक रूपेश माळी, तेजस …
Read More »पुण्याच्या अवंतिकाला ‘सुवर्ण’
हाँगकाँग : वृत्तसंस्था गतवर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणार्या पुण्याच्या अवंतिका नराळेने शनिवारी (दि. 16) अभिमानास्पद कामगिरी केली. हाँगकाँग येथे सुरू असलेल्या युवा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत अवंतिकाने सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवला. तिने 11.97 सेकंदच्या वेळेसह 100 मीटर शर्यतीत बाजी मारली. खेलो इंडियामध्ये अवंतिकाने …
Read More »कोचीन पोर्ट ट्रस्टचे सलग 27वे जेतेपद
मुंबई : प्रतिनिधी कोचीन पोर्ट ट्रस्टने यजमान मुंबई पोर्ट ट्रस्टचा 25-22, 25-15, 25-23 असा तीन सरळ सेटमध्ये पराभव करीत सलग 27व्या अखिल भारतीय मेजर पोर्ट हॉलीबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. मुंबई पोर्ट ट्रस्टचा शुभम सिंग स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरला. अखिल भारतीय मेजर पोर्ट बोर्डच्या मान्यतेने मुंबई पोर्ट ट्रस्ट कौन्सिल बोर्डच्या विद्यमाने …
Read More »महाराष्ट्र संघाने जिंकला टी-20 दिव्यांग चषक
औरंगाबाद : प्रतिनिधी महाराष्ट्र संघाने अखिल भारतीय टी-20 दिव्यांग चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. दीपक जावळेने कर्णधाराला साजेल अशी केलेली फलंदाजी आणि अभिलाष लोखंडे याचा अष्टपैलू खेळ या बळावर महाराष्ट्राने गरवारे क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात राजस्थानवर पाच गडी राखून मात करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून …
Read More »ड्युमिनीची निवृत्ती
जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनीने वर्ल्ड कपनंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली, मात्र आफ्रिकेकडून ट्वेंटी-20 क्रिकेट संघासाठी उपलब्ध असल्याचे त्याने सांगितले. ड्युमिनीने सप्टेंबर 2017मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ‘गेले काही महिने मी संघाबाहेर आहे आणि आता मला पुन्हा संधी मिळाली आहे. विश्रांतीच्या …
Read More »…तर भारताचा संघच वर्ल्डकप जिंकेल -पाँटिंग
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची कामगिरी जबदरदस्त आहे. जर विराटचे नशीब चांगले राहिले; तर भारतच हा विश्वचषक जिंकेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने व्यक्त केला आहे. आयपीएलमध्ये यंदा दिल्लीला मार्गदर्शन करणार्या पाँटिंगने एका मुलाखतीमध्ये आपली मते दिलखुलासपणे व्यक्त केली. 2019 विश्वचषकाबद्दल प्रश्न …
Read More »2020 मध्ये फिफा अंडर 17 महिला वर्ल्डकप भारतात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतातील फुटबॉल रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताला आणखी एका फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. 2020मध्ये होणार्या फिफाच्या अंडर 17 महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी भारताला मिळाली आहे. ‘फिफा’कडून ही घोषणा करण्यात आली. मियामीमध्ये झालेल्या फिफाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी …
Read More »राष्ट्रवादी बोले, शेकाप डोले
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रायगडात राजकारण आता चढत्या उन्हाप्रमाणे तापू लागले आहे. या वेळीही जिल्ह्यात शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप असा रंगतदार सामना होणार आहे. युतीतर्फे अनंत गीतेंना या वेळीही उमेदवारी देण्यात आली आहे, तर सन 2014 मध्ये गीतेंकडून पराभव पत्करलेल्या सुनील तटकरेंना राष्ट्रवादीने पुन्हा मैदानात उतरविलेले आहे. त्यामुळे जुन्याच पैलवानांमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper