मोहोपाडा : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाईं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फं आप्पा बारणे यांच्या प्रचाराने रसायनी -पाताळगंगा परीसर ढवळून निघाला असून परीसरातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा विजयी करुन दिल्लीत पाठविण्यासाठी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी रसायनी व …
Read More »Monthly Archives: April 2019
गौतम गंभीर दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार
दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेला क्रिकेटपटू गौतम गंभीरची संपत्ती समोर आली आहे. गंभीर हा दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरला आहे. गौतम गंभीरची संपती 147 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. गौतम गंभीर भाजपच्या तिकिटावर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. गंभीरने 2017-18 साली भरलेल्या आयटी रिटर्न्समध्ये 12.40 कोटी …
Read More »सचिन आणि लक्ष्मण यांना बीसीसीआयची नोटीस
मुंबई : प्रतिनिधी बीसीसीआयचे नवनियुक्त लोकपाल डी. के. जैन यांनी बीसीसीआयच्या सल्लागार समितीतल्या सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या माजी कसोटीवीरांना हितसंबंधांच्या मुद्द्यावरून नोटीस बजावली आहे. सचिन तेंडुलकर हा आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्सचा, तर व्हीव्हीएस लक्ष्मण हा सनरायझर्स हैदराबादचा मेन्टॉर म्हणून सक्रिय आहे. याच मुद्द्यावरून बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि बीसीसीआयच्या …
Read More »सलग पाच वेळा भोपळाही न फोडता तंबूत; अॅहश्टन टर्नरच्या नावे लाजिरवाणा विक्रम
मुंबई : प्रतिनिधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अॅश्टन टर्नरच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा ‘डक’ स्कोअर करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. टर्नर सलग पाच सामन्यांमध्ये भोपळाही न फोडता बाद झाला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळणार्या टर्नरने दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळताना हा लाजिरवाणा विक्रम रचला. 9 …
Read More »कोहलीच्या सेलिब्रेशनवर अश्विन भडकला
बंगळुरू : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने बुधवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सेलिब्रेशन केले आणि त्यावर पंजाबचा कर्णधार आर. अश्विन चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना अश्विन फलंदाजीला आला होता. त्या वेळी अश्विनने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यानंतरच्या चेंडूवरही …
Read More »खासदार बारणेंसमवेत सदिच्छा भेट
कामोठे ः मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात भाजपचे पदाधिकारी महादेवशेठ पाटील, खानावले आणि विश्वनाथ कोळी सहभागी झाले होते. सोबत शिवसेना नेते बबन पाटील. कामोठे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या जाहीर सभेवेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमवेत टिपलेले छायाचित्र.
Read More »चिरनेर : लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून चिरनेरचे प्रा. दिलीप ठाकूर यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला. भाजप नेते तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, चिरनेर विभाग भाजप अध्यक्ष कुलदीप नाईक, नगरसेवक राजू ठाकूर, भाजप चिरनेर शाखाध्यक्ष रमेश फोफेरकर, नंदकुमार चिरनेरकर आदी …
Read More »खारघर परिसरात महायुतीतर्फे कॉर्नर सभा
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत उरण, पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात महायुतीतर्फे प्रचाराचा जोरदार धडाका सुरू असून, त्या प्रचाराला मतदारांकडूनदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गावागावात, वाड्यांवर उमेदवार बारणे यांचे जल्लोषात स्वागत केले जात असून, मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही …
Read More »बेंगळुरूचा ‘रॉयल’ विजय
पंजाबचा 17 धावांनी पराभव बेंगळुरू : वृत्तसंस्था एबी डिव्हिलियर्सच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 17 धावांनी विजय मिळवला. बुधवारी आयपीएल क्रिकेट सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर 203 धावांचे लक्ष्य ठेवले. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरूने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 202 धावांपर्यंत मजल मारली. चौथ्याच …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या झंझावाती प्रचार सभेने श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित; उपमहापौर विक्रांत पाटील यांचा दावा
पनवेल : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासाठी कामोठे येथे झालेली विजय संकल्प सभा व त्या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले दणदणीत मार्गदर्शन यामुळे बारणे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी केला आहे. मावळ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper