खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खालापूर हद्दीत हॉटेल व ढाबा चालकांनी रस्ता दुभाजक तोडल्यामुळे अपघाताची घटना घडली असून, अपघातानंतर मात्र कंत्राटदाराने तातडीने दुभाजक दुरूस्ती केली आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर ते खोपोली रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. खालापूर ते महडपर्यंत दोन्ही मार्गिका तयार झाल्या असून रस्त्याच्या मधोमध दुभाजक तयार करण्यात …
Read More »Monthly Archives: April 2019
मुरूडमध्ये पर्यटनाचा हंगाम फुलला
सध्या मुरूड तालुक्यात पर्यटनाचा हंगाम फुलला असून विविध पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. वार्षिक परीक्षा संपल्यामुळे पर्यटक आपल्या मुलांसह मुरूड समुद्रकिनारी येण्यास अधिक पसंती देत आहेत. विशेष करून शनिवार व रविवारची सुटी साधून पर्यटक मोठ्या संख्येने मुरूड व काशीद समुद्र किनारी येत आहेत. कोकणाला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला …
Read More »रालोआचे शक्तिप्रदर्शन
देशाच्या भवितव्यासाठी होणार्या लोकशाहीच्या उत्सवातील पाचव्या टप्प्याचे वेध आता देशवासीयांना लागले आहेत. या उत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही सज्ज झाले असून, शुक्रवारी त्यांनी वाराणसीमधून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी झालेले शक्तिप्रदर्शन निश्चितच विरोधकांना धडकी भरून टाकणारे ठरले आहे. लोकसभेच्या महासंग्रामास आता खर्या अर्थाने रंगत येऊ लागली आहे. …
Read More »ठाकूर पितापुत्रांमुळे बारणेंचा विजय निश्चित
पनवेल : प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मावळ मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित असल्याची ग्वाही शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी दिली आहे. पनवेल येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आमच्यासोबत भारतीय …
Read More »पनवेल ग्रामीण भागात तरुणाईचा तुफान प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल ग्रामीणमध्ये विश्वजीत बारणे आणि जिल्हाप्रमुख तथा आमदार मनोहर भोईर यांनी महायुतीच्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. प्रचारफेरी, कोपरा सभा, बैठका घेऊन पनवेल पिंजून काढत आहेत. विश्वजीत बारणे तरुण असल्याने तरुणांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. तरुणांमध्ये त्यांची मोठी ‘क्रेझ’ दिसून येत आहे. …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज मोहोपाड्यात सभा
पनवेल : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी, (दि. 26) सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथे केंद्रीय मंत्री विकासमूर्ती नितीन गडकरी यांची ‘विजय संकल्प सभा’ होणार आहे. अचानक मैदानावर होणार्या या सभेस रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते …
Read More »पेणची मिठागरे लुप्त होण्याच्या मार्गावर
पेण : अनिस मनियार : तालुक्याच्या खाडीपट्ट्यातील आगरी, कोळी लोकांचा पूर्वी मिठाच्या शेतीचा मूळ व्यवसाय होता. एकेकाळी कामगारांनी गजबजलेली येथील मिठागरे आता ओस पडली आहेत. पेण तालुक्यात 30 ते 40 मिठागरांतून आता जेमतेम 5 ते 6 आगारे शिल्लक राहिली आहेत. भविष्यात मिठागरांचा इतिहास पुसला जाणार आणि यापुढे शालेय जीवनात मिठागरे …
Read More »बोडणी गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य
अलिबाग : प्रतिनिधी : तालुक्यातील बोडणी कोळीवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथे पाण्यासाठी मारूतीच्या शेपटाप्रमाणे लागलेली लांबचलांब हंड्यांची रांग ही येथील पाणी टंचाईची तीव्रता दाखवित आहे. अलिबाग तालुक्यातील बोडणी हे गाव समुद्रालगत आहे. चारशेहून अधिक लोकवस्ती असलेल्या या गावात पाण्याची मुबलक सुविधा नाही. वाढत्या वस्तीला पुरेल इतके पाणी दररोज उपलब्ध होत …
Read More »पाली पोलीस ठाणे आवारात पक्ष्यांचा किलबिलाट
धान्य, पाण्याची व्यवस्था जांभूळपाडा : प्रतिनिधी : रणरणत्या उन्हाचा फटका संपूर्ण जीवनसृष्टीलाच बसत आहे. तापमानात होणारी कमालीची वाढ प्राणिमात्रांच्या जीवनावर बेतत आहे, मात्र पाली (ता. सुधागड) पोलीस ठाण्याच्या आवारात पशूपक्ष्यांच्या दाण्यापाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, पक्ष्यांसाठी झाडावर घरटीही बनविण्यात आली आहेत. त्यामुळे पाली पोलीस ठाण्याच्या आवारात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत …
Read More »कलोते मोकाशी धरण परिसरात फार्महाऊस मालकाचे अतिक्रमण
धरणपात्रातून माती आणि पाण्याची लूट खोपोली : प्रतिनिधी : खालापूर हद्दीतील कलोते मोकाशी धरणाच्या पाणीसाठ्यात झालेली घट अनेकांच्या फायद्याची ठरत असून, धरण पात्रात थेट पोकलन आणि डंपरचा मुक्त वावर सुरू झाला आहे. कर्जत जलसंपदा विभागाकडे असलेले खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी धरण 43 वर्षापूर्वी बांधण्यात आले. सिंचनासाठी तालुक्यातील शेतकर्यांना हे धरण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper