पनवेल : बातमीदार : अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणार्या राकेश हरकुळकर (35) याने गुन्हा मागे घ्यावा, यासाठी त्याला अज्ञात चौकडीने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री कामोठे येथे घडली. या मारहाणीत राकेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कळंबोली पोलिसांनी अज्ञात चौकडीवर मारहाणीचा गुन्हा दाखल …
Read More »Monthly Archives: May 2019
रिक्षाचालकांचा रस्त्यावर कब्जा
नागरिक, वाहनचालकांची गैरसोय पनवेल : बातमीदार : पनवेल एसटी स्थानकाबाहेर परिसरात वाहनांची कायम गर्दी असते. अशा प्रचंड गर्दीतही येथील एक मुख्य रस्ता इको आणि सहाआसनी रिक्षाचालकांनी गिळंकृत केला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहनांसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद झाल्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय होत आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेकडून कारवाई होऊनही पोलिसांचा …
Read More »रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 07 ते 09 जूनपर्यंत करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील बॅडमिंटनपटूंसाठी सुवर्णसंधी असलेली ही स्पर्धा 11, 13, 15, …
Read More »वर्ल्ड कप विजयाचे सेलिब्रेशन करणारा ‘तो’ खेळाडू भारतीय संघात
लंडन : वृत्तसंस्था प्रत्येक खेळाडूचे भारताकडून खेळायचे स्वप्न असते. त्याचबरोबर विश्वचषकाच्या संघात आपल्याला स्थान मिळावे आणि वर्ल्ड कप जिंकून तो आपल्या हातात घेऊन उंचवावा, असे प्रत्येक खेळाडूला वाटत असते. काही जणांची स्वप्ने खरी होतात, तर काहींची स्वप्न धुळीस मिळतात. असेच एक स्वप्न त्यानेही पाहिले होते आणि आज ते सत्यात उतरले …
Read More »ख्रिस गेल खेळणार पाचव्यांदा विश्वचषक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होताच पाच किंवा त्यापेक्षा अधिक विश्वकप स्पर्धेत खेळणार्या क्रिकेटपटूंच्या विशिष्ट क्लबमध्ये स्थान मिळवणारा जगातील 19 वा खेळाडू ठरेल. भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर व पाकिस्तानचा जावेद मियांदाद यांनी सर्वाधिक सहा विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत, पण 16 असे …
Read More »मेरीकोम, सरिता देवी यांची सुवर्ण कामगिरी
गुवाहाटी : वृत्तसंस्था सहा वेळच्या विश्व चॅम्पियन एमसी मेरीकोम आणि एल. सरिता देवी यांनी अपेक्षित कामगिरी करताना इंडियन ओपन मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याच वेळी, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण विजेत्या अमित पंघालनेही 52 किलो वजनी गटातून शानदार खेळ करताना जायंट किलर ठरलेल्या सचिन सिवाचचे आव्हान परतवून …
Read More »फिफा शिष्टमंडळाची गोवा केंद्राला भेट
मडगाव : वृत्तसंस्था भारतात पुढील वर्षी होणार्या फिफा 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी देशातील पाच केंद्रांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या केंद्रांत गोव्याचाही समावेश आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी फिफा शिष्टमंडळाने गुरुवारी केली. त्यांनी स्टेडियमच्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. केवळ ग्राऊंड पिच संदर्भात सुधारणा करण्यासाठी फिफा शिष्टमंडळाचे …
Read More »भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम
लंडन : वृत्तसंस्था भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही. वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात लोकेश राहुलला चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठवले होते, पण राहुलला फक्त सहाच धावा करता आल्या. त्यामुळे भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी भारताने महेंद्रसिंग …
Read More »भारतीय संघ खेळणार भगव्या रंगात
मुंबई : प्रतिनिधी ‘मेन इन ब्लू’ अशी ओळख असलेला भारताचा क्रिकेट संघ, इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होणार्या विश्वचषकात वेगळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. जर्सीबाबत आयसीसीने यंदाच्या विश्वचषकासाठी फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे असा नवा प्रस्ताव ठेवला आहे. या नियमानुसार यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार आहे, …
Read More »वडवली परिसरात सात गुरे दगावली
विषप्रयोग झाल्याचा शेतकर्यांचा आरोप कर्जत : बातमीदार तालुक्यातील वडवली परिसरामधील नाल्याच्या बाजूला शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी सहा-सात गुरे दगावल्याचे समोर आले. ही गुरे नेमकी कशी दगावली आहेत, याची माहिती मिळाली नसली तरी विषप्रयोग झाला असल्याचा संशय शेतकरी आणि स्थानिकांनी केला आहे. कर्जत पंचायत समितीचे अधिकारी आणि पोलिसांनी या घटनेची पाहणी …
Read More »