Saturday , December 3 2022

Monthly Archives: May 2019

कराटे स्पर्धेत पेणच्या कराटेपटूंचे यश

पेण : प्रतिनिधी गोवा आरपुरा येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पेण येथील युनायटेड शोतोकान असोसिएशनच्या कराटेपटूने यश मिळविले आहे. यात शिहान रवींद्र म्हात्रे (पप्पु सर) यांच्याकडे कराटेचे प्रशिक्षण घेत असलेल्या रितुल रवींद्र म्हात्रे (2 गोल्ड मेडल), आयुश भरत साळवी (2 गोल्ड मेडल), संस्कार सतीश यादव (2 गोल्ड मेडल), रविना रवींद्र …

Read More »

विंचूदंश विषयक सूचनांचे पालन होण्याची गरज

पोलादपूर तालुक्यात भातशेतीची कापणी सुरू झाली असताना विंचूदंशाने बाधित रूग्णांची संख्या वाढली असून पावसाळयापूवीर अनेक रूग्ण ग्रामीण रूग्णालयामध्ये होत असतात. दरम्यान, महाड येथील जागतिक किर्तीचे विंचूदंश उपचारपध्दतीचे संशोधक डॉ.हिंमतराव बावस्कर यांनी दिलेल्या सूचनांचे पोलादपूरच्या ग्रामीण भागात पालन होण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलादपूर तालुक्यात कार्तिकी एकादशीपूर्वीच भातशेती कापणीला सुरूवात झाली …

Read More »

विरोधकांचा रडीचा डाव

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणी करताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील मतपावत्यांची मोजणी करण्यात यावी असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये दिला. मात्र त्यानंतरही विरोधकांनी आपली व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीची मागणी अखेरपर्यंत लावून धरली. मतमोजणीच्या आधी मतपावत्या पडताळल्या जाव्यात ही विरोधकांची मागणीही आयोगाने अखेर बुधवारी फेटाळून लावली. भारतीय जनता पक्षाच्या …

Read More »

दोनशे देशांसह सात भारतीय भाषांमध्ये होणार वर्ल्ड कपचे प्रसारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांना इंग्लंडमधील वर्ल्ड कप स्पर्धा पाहता यावी, यासाठी आयसीसीने मंगळवारी प्रसारण आणि डिजिटल वितरण योजनेची घोषणा केली. यानुसार पहिल्यांदाच अफगानिस्तानमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे प्रसारण होणार आहे. या योजनेनुसार क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी टीव्ही, रेडिओ आणि डिजिटल माध्यमांशिवाय बातम्या, सिनेमा, फॅन पार्क आणि विविध मीडियाच्या भागिदारांची …

Read More »

ऑल इंडिया वॉटर पोलो स्पर्धेत रिलायन्स नागोठणे क्लबचे घवघवीत यश

पाली-बेणसे : प्रतिनिधी स्पिरीटो ठाणे क्लब ऑल इंडिया वॉटरपोलो स्पर्धा दि. 18 मे ते 21 मे 2019 या कालावधीत ठाणे येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. दोन ग्रुपमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत रिलायन्स नागोठणे क्लबने चमकदार कामगिरी करीत द्वितीय क्रमांक पटकाविला. ग्रुप ए मध्ये एअर फोर्स, आर्मी ग्रीन, ठाणे डेक्कन, पोलीस …

Read More »

…म्हणून मला समलैंगिक असल्याचा खुलासा करावा लागला -द्युती चंद

भुवनेश्वर : वृत्तसंस्था देशाची स्टार धावपटू द्युती चंद सध्या तिच्या समलैंगिकतेबाबत चर्चेत आहे. द्युतीने नुकताच आपण समलैंगिक असल्याचा खुलासा केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर क्रीडा जगतात खळबळ उडाली. आपली मोठी बहीण आपल्याला ब्लॅकमेल करत असल्यामुळेच आपल्याला हा खुलासा करावा लागला असल्याचे द्युतीने स्पष्ट केले आहे. द्युतीची बहीण तिला ब्लॅकमेल करत …

Read More »

पनवेल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत चिताज सुपरकिंग्ज विजेता

पनवेल : प्रतिनिधी पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अ‍ॅकेडमीच्या वतीने झालेल्या 23 वर्षाखालील पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेत चिताज सुपर किंग्ज संघ अंतिम विजेता ठरला. ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर पनवेल येथील महात्मा फुले आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या भव्य क्रीडांगणावर झाली. स्पर्धेत लावाज रॉयल्स, चिताज सुपरकिंग्ज, शामशेठ सुपरकिंग्ज, हायरीच सुपरस्ट्रायकर्स, विराज सुपरकिंग्ज, शिवम …

Read More »

‘परे’ची वाहतूक विस्कळीत

मुंबई ः काल पश्चिम रेल्वेवरील वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे उशिराने सुरू होती. गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी साडेसातच्या सुमारास गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पश्चिम  रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली …

Read More »

चालकाच्या सतर्कतेने टळला रेल्वे अपघात

नागपूर ः प्रतिनिधी शेतशिवारात आग लावल्याने जळालेले बाभळीचे झाड रेल्वे रुळावर पडले होते. दरम्यान, या रेल्वे रुळावरून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इतवारी नागपूर रेल्वे स्थानक ते नागभीडकडे जाणारी पॅसेंजर धावत होती. अशातच कारगाव शिवारात झाड रेल्वे रुळावर पडल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच ब्रेक लावत रेल्वे थांबविण्यात आली. अगदी झाडाच्या काही …

Read More »

शेतीच्या वादातून शेतकर्याची हत्या

सात जणांविरोधात गुन्हा दाखल हिंगोली ः प्रतिनिधी तालुक्यातील राहुली बु. येथे शेतीच्या वादातून एकाची संगनमत करून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शंकर लक्ष्मण डोरले (35) असे मृत शेतकर्‍याचे नाव असून या प्रकरणी सात जणांविरोधात ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण डोरले यांचे शेतीच्या प्रकरणात काही शेजार्‍यांसोबत जुने …

Read More »