Breaking News

Monthly Archives: May 2019

आठ लाखांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर खारघर येथे भाड्याने घेतलेला टँकर व त्याचे भाडे न देता तब्बल आठ लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा आरोपी विरोधात दाखल करण्यात आला आहे. गुरुनाथ मोतीराम पाटील (वय 45 वर्षे) यांचा दूध विक्रीचा व्यवसाय असून ते मदर डेरी येथील कंपनीमधून दूध घेऊन नेहमीप्रमाणे मानखुर्द, चेंबूर, गोवंडी येथे जाऊन …

Read More »

मोदीजी, अख्खा देश तुमच्यासोबत : सचिन तेंडुलकर

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिकांसोबतच संपूर्ण जगाचे लक्ष विश्वचषक स्पर्धेकडे आहे, पण याच दरम्यान भारताने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारला निवडून दिले. सात …

Read More »

उसने पैसे मिळविण्यासाठी तरुणाला ठेवले ओलिस

पनवेल : वार्ताहर उसनवारीने घेतलेली दोन लाख 83 हजार रुपयांची रोख रक्कम परत करण्यास टाळाटाळ करणार्‍या तरुणाला बेदम मारहाण करून त्याला एका खोलीत डांबून ठेवून त्याच्या जवळची रोख रक्कम आणि एटीएम कार्ड लुटणार्‍या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. साहिल नावडेकर आणि अराफत पटेल, असे अटक करण्यात आलेल्या दोघा …

Read More »

द्रोणागिरीमधील सिडकोच्या बागेत आंबेचोरांचा सुळसुळाट

उरण : प्रतिनिधी उरण द्रोणागिरी नोडमध्ये शहराजवळ सिडकोच्या मालकीच्या असणार्‍या आंब्याच्या वाडीमधून मोठ्या प्रमाणात आंब्यांच्या फळांची चोरी होत आहे. कुंपणाने शेत खाल्ले ही म्हण सार्थ करीत आंब्यांची चोरी या ठिकाणी सिडकोने नेमलेले सुरक्षा रक्षकच करीत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या सुरक्षा रक्षकांना उरण द्रोणागिरी नोडच्या कार्यालयातील अभियंत्यांचा अर्थपूर्ण …

Read More »

काँग्रेसला 17 राज्यांत फक्त भोपळाच

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 350 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) फक्त 86, तर अन्य पक्षांना 106 जागा मिळाल्या आहेत. सलग दुसर्‍या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या. यंदा …

Read More »

सुरतमध्ये भीषण आग विद्यार्थ्यांसह 19 मृत्युमुखी

सुरत ः वृत्तसंस्था येथील सरथाना भागातील तक्षशिला कॉम्प्लेक्स इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 19 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या इमारतीत एक डान्स क्लास आणि फॅशन इन्स्टिट्यूट आहे. …

Read More »

खोपोलीत युतीच्या गोटात जल्लोष, तर आघाडीच्या कार्यकर्त्यांत सन्नाटा

खोपोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदार संघाचा निवडणुक निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यात महायुतीच्या श्रीरंग बारणे यांच्या दणदणीत विजयाने शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांकडून गुरुवारी संध्याकाळपासून सुरू असलेला विजयोत्सव दुसर्‍या दिवशी शुक्रवारी ही साजरा करण्यात आला. दुसरीकडे  पार्थ पवार यांच्या पराभवाने आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे  खोपोलीत आघाडीच्या गोटात सन्नाटा तर …

Read More »

सचिन तेंडुलकरला गोलंदाजांची चिंता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘वनडे क्रिकेटमध्ये तुम्ही अखेरचा रिव्हर्स स्विंग केव्हा पाहिला होता? दोन नव्या चेंडूंचा नियम आल्याने चेंडू अगदी अखेरपर्यंत टणक राहतो. गोलंदाजांची जणू कत्तलच होते आहे अन् क्रिकेट फलंदाजांचा एकसूरी खेळ झाला आहे. त्यामुळे रिव्हर्स स्विंग हा गोलंदाजीचा प्रकारच संपत चालला आहे…’ अशी हळहळ कुणा गोलंदाजाने नव्हे, तर …

Read More »

निरा आणि ताडगोळे ठरताहेत वरदान; थकवा दूर करण्यासाठी नैसर्गिक उपाय

पाली : धम्मशील सावंत राज्यात सध्या उष्म्याची लाट आहे. रायगड जिल्ह्यातही  उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेकजण आरोग्यवर्धक निरा आणि ताडगोळ्यांना  पसंती देत आहेत. परिणामी निरा आणि ताडगोळ्यांची मागणी वाढली आहे. मुबंई – गोवा महामार्ग, पनवेल – खोपोली तसेच मुंबई -अलिबाग या मार्गांवर निरा विक्रेत्यांच्या …

Read More »

भारतीय संघाने घेतली माजी कर्णधाराची भेट

लंडन : वृत्तसंस्था भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 साली इंग्लंडमध्येच वर्ल्ड कप जिंकला होता. आता पुन्हा एकदा इंग्लंडमध्येच क्रिकेटचा वर्ल्ड कप भरवला जात आहे. त्यामुळे मिशन वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने देशाला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणार्‍या कपिल देव यांची खास भेट घेतली. भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो, …

Read More »