Breaking News

Monthly Archives: October 2020

हे आहेत सर्वात मोठ्या कंपनीचे व्यवसाय!

रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे.ती कोणकोणते व्यवसाय करून 15 लाख कोटी रुपये बाजारमूल्य असलेली कंपनी झाली आहे, हे समजून घेतले की पैसा नेमका कोठे फिरतो आहे, हे समजण्यास मदत होते.आजच्या मितीस भारतीय शेअरबाजारामधील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लि. म्युच्युअल फंडांकडं रिलायन्स इंडस्ट्रीजचे एकूण 15.41 …

Read More »

आत्मनिर्भर: भारत म्हणजे जगाची केवळ बाजारपेठ नव्हे!

चीनचे आक्रमक व्यापार धोरण आणि जागतिकीकरणामुळे आपली हक्काची भारतीय क्रयशक्ती इतर देशांना समृद्ध करत होती. आत्मनिर्भर धोरणामुळे पुरवठ्यासोबत मागणीला बळ मिळू लागले असून त्यातून नव्या रोजगार संधी निर्माण होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. या धोरणाची अंमलबजावणी केली नसती तर भारताचे अस्तित्व पुन्हा एकदा जगाची एक बाजारपेठ म्हणूनच राहिले असते. आयात-निर्यात व्यापाराची …

Read More »

दसर्याचे खरे सोने

अत्यंत अभूतपूर्व परिस्थितीमध्ये यंदाचा दसरा उंबरठ्यावर आला आहे. एरव्ही दसरा-दिवाळीचे दिवस आले की बाजारपेठा फुलून गेलेल्या असतात. विविध प्रकारच्या चीजवस्तू, कपडे, दागदागिने, मिठाया यांच्या खरेदीसाठी गर्दी करणार्‍या सर्वसामान्यांनी दुकाने गजबजून गेलेली असतात. शेतकरी असो वा चाकरमानी खिशात थोडाफार पैसा खुळखुळू लागलेला असतो. दसर्‍याच्या शिलंगणासाठी संपूर्ण देशच आतुर झालेला असतो. यंदा …

Read More »

तळोजा एमआयडीसीतील आठ कंपन्यांवर कारवाई

नवी मुंबई : तळोजा एमआयडीसीमध्ये अनलॉकनंतर सुरू करण्यात आलेल्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात प्रदूषण करण्यास सुरुवात केली आहे. हवा आणि पाणी प्रदूषण पातळीत वाढ झाल्याने परिसरात त्याचा विपरित परिणाम होत आहे. याबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर प्रदूषण करणार्‍या आठ कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारवाई केली आहे. यातील चार कंपन्यांचे पाणी आणि …

Read More »

रायगड जिल्ह्यात 169 नवे कोरोना पॉझिटिव्ह; सहा रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, शुक्रवारी (दि. 23) नव्या 169 रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 218 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 91 व ग्रामीण 34) तालुक्यातील 125, अलिबाग 13, पेण 10, खालापूर सात, महाड …

Read More »

रायगडात ग्रामपंचायतींचा रणसंग्राम; 87 ठिकाणी डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याच्या हालचाली

अलिबाग ः प्रतिनिधी जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात घेण्याच्या द़ृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये कोविड-19ची परिस्थिती काय आहे याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने मागविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनदेखील या रणसंग्रामाच्या तयारीला लागले …

Read More »

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले पॅकेज शेतकर्यांच्या दाढेलाही पुरणार नाही; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

पोलादपूर : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले 10 हजार कोटींचे पॅकेज अपुरे असून, ही मदत शेतकर्‍यांच्या दाढेलाही पुरणार नाही. कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात शेतकर्‍यांकडे असलेली जमीन धारणा अत्यल्प आहे. परिणामी शेतकर्‍यांपर्यंत गुंठ्याला 100 रुपये मदत जरी पोहोचली तरी शेतातील पिकाची नासाडी साफ करण्यासाठीच त्यापैकी 50 रुपये जातील. शेतकरीवर्ग …

Read More »

कोरोना संकटात भाजप कार्यकर्त्यांकडून जनतेसाठी जबाबदारीने काम; आमदार प्रशांत ठाकूर यांचे गौरवोद्गार

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप कार्यकर्त्यांनी कोणतेही राजकारण न करता कोरोना काळात लोकांसाठी जबाबदारीने काम केले, असे गौरवोद्गार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 23) येथे काढले. ते ई-पुस्तिका प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात देण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …

Read More »

वीज पडून दोघांचा मृत्यू

कर्जत, पनवेल ः प्रतिनिधी, वार्ताहर रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि पनवेल तालुक्यात वीज अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 23) घडली. नागोठणे येथेही एकाचा मृत्यू झालेला आहे. कर्जत तालुक्यात गुरुवारी (दि. 22) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या वेळी पाटगाव तागवाडी येथे घरात बसलेल्या कीर्ती मेंगाळ (वय …

Read More »

आग्राव येथे जुगार अड्डा उद्ध्वस्त

सात जणांवर गुन्हा दाखल रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील आग्राव येथे भरदिवसा मंदिराच्या सार्वजनिक जागेत सुरू असलेला जुगाराचा अड्डा रेवदंडा पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन नवरात्रोत्सवात आग्रावमधील बापदेव मंदिराच्या सार्वजनिक जागेत तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची खबर रेवदंडा पोलिसांना …

Read More »