कामोठे : रामप्रहर वृत्त कोरोनाचे वाढते संक्रमण आणि रक्तासाठी सर्वसामान्य जनतेची होणारी धावपळ पाहून कामोठ्यातील दिशा महिला मंच आणि झेंडा सामाजिक संस्था कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने सुषमा पाटील विद्यालय कामोठे येथे रविवारी (दि. 11) एमजीएम हॉस्पिटल ब्लड बँक कामोठे रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योग्य ती …
Read More »Monthly Archives: October 2020
जासईच्या शेतकर्यांचे सिडकोविरोधात आंदोलन
उरण : वार्ताहर जासई गावच्या 270 शेतकर्यांना सिडकोकडून भूमी संपादनाच्या नोटीसा आल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ शेतकर्यांनी बुधवारी (दि. 14) सकाळी 11.30 वाजता डेप्युटी कलेक्टर तथा भूसंपादन अधिकारी अश्विनी पाटील यांच्या कार्यालयात शेतकर्यांवर होणार्या अन्यायाविरुद्ध प्रश्न उपस्थित केले. पहिल्या मागण्या पूर्ण करा, तरच भूमी संपादन करा, असा नारा देत शेतकर्यांनी सिडकोविरोधात …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांना राज्यपालांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार प्रदान
मुंबई : कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे कोरोना देवदूत पुरस्कार प्रदान करून बुधवारी सन्मानित करण्यात आले. या समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह तसेच आयोजक …
Read More »राज्यात पावसाचा कहर; पंढरपूरमध्ये भिंत कोसळून सहा जण मृत्युमुखी
मुंबई, पंढरपूर : प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, या वेळी ग्रामीण भागासह शहरांनाही याचा मोठा फटका बसला आहे. अगदी तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पंढरपूर शहरात चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत बुधवारी (दि. 15) दुपारी दीडच्या सुमारास …
Read More »पनवेल महापालिकेच्या 945 कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीची मंजुरी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या सन 2020-21च्या 945 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी (दि. 13) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये महापालिका उद्याने विकास, वैद्यकीय सेवा व झोपडपट्टीत नागरी सुविधा देणे आणि नवीन गटारे बांधकाम व दुरूस्तीसाठी सन 2020-21च्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याने पनवेल शहर स्वच्छ होण्यास मदत होऊन …
Read More »सांगडेत पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन, आरिवली येथे रस्त्याचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सांगडे येथे पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन आणि आरिवली येथे डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 14) करण्यात आले. सांगडे येथे रायगड जिल्हा परिषद राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत जलकुंभ नळ योजनेतून पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. त्याचा …
Read More »‘मेट्रो कारशेड कांजूरला नेल्याने सरकारी तिजोरीवर ताण येणार’
मुंबई : प्रतिनिधी मेट्रोचे कारशेड आरेमधून कांजूरला हलविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे हा प्रकल्प तर लांबणारच शिवाय सरकारी तिजोरीवर ताणही येणार आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, कारशेड कांजूरमार्ग येथे स्थानांतरित करून मेट्रो-3चे प्रश्न सुटणार …
Read More »मंदिरावरून शंखनाद
कोरोना विषाणूच्या विळख्यात संपूर्ण महाराष्ट्र पुरता अडकला त्याला आता उणेपुरे सात महिने होतील. या सात महिन्यांमध्ये बर्याच उलथापालथी घडल्या. अनेक कुटुंबे देशोधडीला लागली. कित्येकांना आपल्या आप्तेष्टांना मुकावे लागले. महाराष्ट्रातील गावोगावी अशा हजारो शोकांतिका आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत जीव हतबल होतो हे खरेच. अशा असाह्य अवस्थेत कुठल्याही सामान्य माणसाला सर्वप्रथम देव …
Read More »युवकांबाबत राज्य सरकार उदासीन -विक्रांत पाटील
पनवेल : वार्ताहर विद्यार्थ्यांसह युवा पिढीचे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रात युवा मोर्चाचे काम करताना लाखो किलोमीटरचा प्रवास राज्यभरात मी केला. युवक-युवतींशी आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांचे अनेक प्रश्न समजून घेतले. राज्य सरकारने या बाबतीत संवेदनशील विचार असणे अपेक्षित आहे, मात्र तो महाविकास आघाडी सरकारमध्ये नसल्याने युवकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर असंतोष …
Read More »भाजपकडून नागरिकांना मोती साबणाचे वाटप
पनवेल : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत, युनिसेफ, हिंदुस्तान लिव्हर आणि व शेल्टर या संस्थांच्या माध्यमातून पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील, प्रभाग क्रमांक 17 मधील मालधक्का परिसरातील नागरिकांना शारीरिक स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले आणि हात धुणे व शारीरिक स्वच्छता राखणे कामी प्रत्येक कुटुंबाला पाच मोती साबणाचे वाटप सोमवारी करण्यात आले. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper