Breaking News

Yearly Archives: 2020

टाकाऊ प्लास्टिकमधून पेट्रोल-डिझेलनिर्मिती

अलिबाग : प्रतिनिधी – टाकाऊ आणि निसर्गाला हानिकारक ठरणार्‍या प्लास्टिकपासून अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील सर्वेश पाटील आणि संकेत जाधव या दोन तरुणांनी पेट्रोल- डिझेलची निर्मिती करून दाखविली आहे. कणकेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या मापगाव या छोट्याशा गावात राहणारे हे तरुण केवळ 27-28 वर्षांचे आहेत. संकेत जाधव हा बॉयलर ऑपरेटर आहे, तर सर्वेशने  …

Read More »

कर्जत ते गोवा सायकल प्रवास

ऋषिकेश शिंदेने सहा दिवसांत केले 1200 किलोमीटर अंतर पार कडाव : प्रतिनिधी – कोरोना योद्ध्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी कडाव येथील ऋषिकेश शिंदे याने कर्जत ते गोवा हे 1200 किलोमीटर अंतर अवघ्या सहा दिवसांत पार केले. कोरोना संक्रमण काळात पोलीस, प्रशासन व आरोग्य विभाग यांनी कौतुकास्पद काम केले. ऋषिकेश शिंदेने कर्जत …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूक : कर्जत तालुक्यात सदस्यपदाच्या 89 जागांसाठी 297 उमेदवारी अर्ज

कर्जत : प्रतिनिधी – तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाला असून  त्यानुसार बुधवारी (दि, 30) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.  तोपर्यंत ग्रामपंचायत सदस्य पदाच्या एकूण 89 जागांसाठी 297 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. कर्जत तालुक्यात कोल्हारे, जिते, पोशीर, साळोख तर्फे …

Read More »

कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे हे रायगडकरांनी ठरवावे!

रायगडकरांसाठी 2020 हे नैसर्गिक आपत्तीचे वर्ष ठरले. आधी कोरोनाचा शिरकाव, टाळेबंदी, निसर्ग चक्रीवादळ, शेवटी अतिवृष्टी अशा समस्यांना रायगडकरांना तोंड द्यावे लागले. जून महिन्यात निसर्ग वादळाने रायगडला जोरदार तडाखा दिला. घरे पडली, बागा  उद्ध्वस्त झाल्या. त्यानंतर अतिवृष्टी झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात 29 जणांना प्राण गमवावे लागले. …

Read More »

पनवेल मनपा स्थायी समितीमध्ये विविध विषयांना मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 30) स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करुन त्यांना मंजूरी देण्यात आली. या सभेत नियमीत खर्चाची व विकासकामांची देयक अदा करण्यासाठी मुदतसाठी मुदतपूर्व वटविणे, आणि सण 2020-21 व 2021-22 वित्तीय वर्षासाठी …

Read More »

सरत्या वर्षाला निरोप

तसे पाहता कुठलेच वर्ष चांगले अथवा वाईट नसते. आपल्या सोयीसाठी मानवाने आखून घेतलेल्या कालगणनेचा तो एक प्रकार आहे. काळ हा काळ असतो व तो प्रवाही असतो. सहस्त्रक, शतक, दशक, वर्ष ही त्या काळाची आपल्या सोयीची रूपे. तथापि काळाचे 2020 सालातील हे बारा तुकडे संपूर्ण मानवी इतिहासात बदनाम ठरले. या वर्षातील …

Read More »

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 29) संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उलवे नोडे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या सभेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या मुख्याध्यापिका …

Read More »

सांगुर्ली ग्रामपंचायतमधील भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सांगुर्ली ग्रामपंचायतीत चार प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 29) आणि बुधवारी (दि. 30) आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल केले. यामध्ये प्रभाग क्र. 2मध्ये सांगुर्लीतून भाजपचे संतोष पारधी, निर्मला ठोकळ, वनिता कातकरी, संगीता वाघमारे; प्रभाग क्र. 3मध्ये तुरमाळे, चिरवत येथून यशवंत हातमोडे, अस्मिता …

Read More »

राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा

गृहमंत्री राजीनामा द्या; भाजयुमोची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला, मुलींवर होणार्‍या अत्याचारांंमध्ये वाढ झाली असून, महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तरुणीवरील या अत्याचाराचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे उत्तर रायगड …

Read More »

ज्यांनी खादाडासारखे खाल्ले त्यांनाच अपचन झालेय!

भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजवणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटीशीनंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर अश्लाघ्य भाषेत टीका करण्यात आली आहे. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप नेत्यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.भाजप नेते आमदार आशिष शेलार …

Read More »