पेण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, निष्पाप जीवावर अत्याचार करून तिचा खून करण्याची ही हृदय हेलावणारी घटना आहे. हा एक प्रकारे अतिरेक असून, कायद्याचा जो धाक पाहिजे, जो दरारा पाहिजे तो महाराष्ट्रात दिसत नाही. …
Read More »Yearly Archives: 2020
पेणसह रायगड हादरला! महाराष्ट्र सुन्न!!
चिमुरडीवर बलात्कार करून हत्या पेण : प्रतिनिधीमाणुसकीला कलंक लावणारा प्रकार सरत्या वर्षाअखेरीस पेणमध्ये घडला आहे. पेणजवळील आदिवासी वाडीतील तीन वर्षीय बालिकेवर एका नराधमाने बुधवारी (दि. 30) पहाटेच्या सुमारास पाशवी अत्याचार करून तिचा खून केला. या संतापजनक घटनेने पेण तालुक्यासह रायगड जिल्हा हादरला असून, अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे.या प्रकरणी 34 …
Read More »कोरोना काळातही बीसीटी विधी महाविद्यालयाचे उत्तम कार्य
पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतात कोविड 19 साथीच्या आजाराच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू झाले आणि तेव्हापासून अजूनही महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीस मनाई आहे. मार्चपासून लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची वर्गात होणारी दैनंदिन लेक्चर्स बंद केली असतानासुध्दा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भागूबाई …
Read More »ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले
पनवेल : वार्ताहर – आपण कुठेतरी कामात असताना अचानक फोन येतो आणि पलीकडून सांगितले जाते, “मी अमुक बँकेतून बोलत आहे, तुमचे एटीएम कार्ड एक्स्पायर्ड झाले आहे, ते ब्लॉक होऊ शकते. त्याला अपडेट करावे लागेल, व्हेरिफिकेशन करायचे आहे.” यावर विश्वास ठेवून विचारल्याप्रमाणे आपण नंबर सांगत बसलो तर थोड्या वेळातच मोबाइलवर तुमच्या …
Read More »परदेशी नागरिकांना लुटणारी टोळी जेरबंद
खालापूर पोलिसांची कामगिरी खालापूर : प्रतिनिधी मेडिकल व्हिसा पासपोर्टवर भारतात आलेल्या परदेशी नागरिकांची मुंबई विमानतळावर दिशाभूल करून त्यांना लुटणार्या टोळीचा म्होरक्या बंड्या उर्फ महेश लोखंडे (वय 40, रा. केगाव, ता. उरण) याच्यासह चार साथीदारांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. महेश लोखंडे हा काही वर्षे अमेरिकेत राहून आल्यामुळे त्याला इंग्रजीसह इतर …
Read More »आंदोलनकर्ता जगदिश वारगुडेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
नागोठणे : प्रतिनिधी रिलायन्स कंपनीविरोधात सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या जगदिश वारगुडे याचा 21 डिसेंबर रोजी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मृतावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, असा पवित्रा लोकशासन आंदोलन समितीने घेतल्याने मृतदेह पनवेल येथील शवागारात ठेवण्यात …
Read More »रोह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता रोहे तहसिल कार्यालयात बुधवारी (दि. 30) उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक, वरसे, रोठ खुर्द, तळाघर, घोसाळे, शेणवई, खांब, गोवे, चिंचवली तर्फे दिवाळी, …
Read More »वेश्वी ग्रामपंचायतीसाठी ग्रामविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल
उरण ः रामप्रहर वृत्त – वेश्वी ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीतर्फे वॉर्ड क्र. 2मधून अजित पाटील, सोनाली पाटील, सुनील तांबोळी, विलास पाटील, गणेश पाटील, सविता पाटील, तर वॉर्ड क्र. 3मधून संदीप पाटील, नूतन मुंबईकर, प्रमिला मुंबईकर यांनी मंगळवारी (दि. 29) निवडणूक निर्णय अधिकारी भस्मे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी भाजप …
Read More »मनसे पनवेल शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
पनवेल ः रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांचे शुक्रवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानिमित्त पनवेल येथील तथास्तू हॉलमध्ये सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगडच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शोभसभेला …
Read More »मुंबईत स्वबळावरच लढणार!
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे जगताप ठाम मुंबई ः प्रतिनिधी – मुंबई महापालिका निवडणुकीला अजून दोन वर्षांचा अवधी असला तरी राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सर्वच पक्षांनी आतापासूनच या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत सत्तेत असला तरी मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे येथे स्वबळावर निवडणुका लढण्याचा …
Read More »