Breaking News

Yearly Archives: 2020

भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली : भारतात कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांचा दर वाढत आहे. हा दर 95.12 टक्क्यांपर्यंत पोहचला असून, तो जगात सर्वाधिक आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. कोरोनाची अ‍ॅक्टिव्ह प्रकरणेही कमी झाली आहेत. सध्या देशात कोरोनाचे फक्त 3,39,820 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे परिणाम आमच्यासमोर आहेत, …

Read More »

जेलीफिशमुळे मच्छीमारांची डोकेदुखी वाढली

मुरूड : प्रतिनिधी मासळी पकडण्यासाठी मच्छीमारांनाखोल समुद्रात जावे लागते. मात्र मासळीच्या जाळ्यात सध्या जेलीफिश मोठ्या प्रमाणात अडकत असल्याने स्थानीक मच्छीमारांची डोकेदुखी वाढली आहे. जेलीफिशच्या स्पर्शाने हाताला खाज व सूज येत असल्याने मच्छीमारांच्या आरोग्याचा धोका वाढला आहे. जेलीफिश हे माशांची अंडी आणि पिल्लांना खातात. त्यामुळे सागरी मत्स्य साठ्यावर आणि वाढीवर परिणाम …

Read More »

द्रुतगती मार्ग बनला धोकादायक

 अनेक ठिकाणी लेन खचली; आयआरबीकडून कानावर हात खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील आडोशी गावाच्या हद्दीत काही ठिकाणी मार्गिका खचल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. भारतातील पहिला सहापदरी द्रूतगती मार्ग म्हणून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ओळखला जात होता. सुरक्षित आणि जलद प्रवास या हेतुने बांधण्यात आलेला हा महामार्ग सध्या अपघात, लूटमार …

Read More »

रायगडात 55 नवे कोरोना पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

पनवेल ः रायगड जिल्ह्यात सोेमवारी (दि. 14) नव्या 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 22 व ग्रामीण 15) तालुक्यातील 37, पेण सात, रोहा चार, अलिबाग तीन, पोलादपूर दोन आणि कर्जत व मुरूड तालुक्यातील …

Read More »

राज्य सरकारची दादागिरी मोडून काढू!; आमदार गोपीचंद पडळकर यांचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारी (दि. 14) पहिल्याच दिवशी भाजप आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात ढोल बांधून सभागृह परिसरात पोहचले. या वेळी पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्यांच्या पाठीवर लावलेला मागण्यांचा बोर्ड काढत मोडून टाकला. त्यामुळे गोंधळ उडाला. यावरून प्रसारमाध्यमांशी संवाद …

Read More »

मंत्र्यांचे न्यारे बंगले!

कुठल्याच प्रश्नाबाबत महाआघाडी सरकारमधील मंत्री गंभीर नाहीत हे तर स्पष्टच दिसते आहे. या मंत्री महोदयांना ना कोरोना बळींची चिंता आहे, ना शेतकर्‍यांची. राज्याची आर्थिक व्यवस्था पार कोलमडलेली आहे. अशा परिस्थितीत एखादे संवेदनशील सरकार असते तर परिस्थिती खचितच वेगळी असती. पण महाआघाडीतील मंत्र्यांना आपल्या सरकारी बंगल्यांच्या सुशोभिकरणातच अधिक रस आहे असे …

Read More »

विद्यार्थी वाहतूकदारांचे लाक्षणिक उपोषण; भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा; कोरोनामुळे बंद असलेल्या व्यवसायासाठी राज्य शासनाकडे भरपाईची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त कोविडच्या महामारीमुळे सर्व शाळा बंद आहेत. परिणामी विद्यार्थी वाहतूकदारांच्या प्रश्नांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यार्थी वाहतूकदारांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यभर उपोषण केले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ व विद्यार्थी वाहतूक संस्था, पनवेल यांच्या वतीने सोमवारी (दि. 14) पनवेल तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण …

Read More »

रायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 14) सकाळी  पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.रायगडमध्ये रिमझिम रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 14) सकाळी  पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण …

Read More »

शेतकरी संघटनांचे कृषी कायद्यांना समर्थन

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाएकीकडे हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी सुधारित कृषी कायद्यांबाबत निदर्शने करीत असताना दुसरीकडे विविध राज्यांतील सुमारे 10 शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची सोमवारी (दि. 14) भेट घेतली आणि कृषी कायद्यांना पाठिंबा देत असल्याबाबतची पत्रे तोमर यांच्याकडे सुपूर्द केली.याबद्दल माध्यमांशी बोलताना तोमर …

Read More »

कृषी कायद्यांच्या आडून देशात अराजक माजविण्याचा विरोधकांचा प्रयत्न

भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा आरोप पनवेल : रामप्रहर वृत्तसुधारित कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे, तसेच या आंदोलनाच्या आडून काही विरोधी शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न …

Read More »