नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महांडळातर्फे भूखंडांच्या विक्रीसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये अंतर्गत सर्वोत्तम बोली लावलेल्या अर्जदारांना विहित मुदतीत हफ्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशत: रक्कम ऑनलाइन माध्यमातून भरण्यास मुभा देण्यात यावी, या निर्णयास सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली आहे. कोरोना विषाणूचा …
Read More »Yearly Archives: 2020
आलिशान गाडीसह मद्यसाठा हस्तगत
पनवेल : वार्ताहर आलिशान गाडीसह देशी-विदेशी मद्याचे दोन बॉक्स जवळ बाळगणे तसेच विक्री करणे या गुन्ह्यांतर्गत पनवेल शहर पोलिसांनी दोघा विरोधात कारवाई केली आहे. तालुक्यातील कोळखे गाव परिसरात आरोपी रोहन म्हात्रे (33) व मिरज मोरया (25) हे त्यांच्या स्वतःजवळ देशी-विदेशी मद्यसाठा बाळगून असून तसेच त्याची विक्री करीत असल्याची खबर पनवेल …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ऑनलाइन साजरी
पनवेल : प्रतिनिधी देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने सरकारने संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. संचारबंदी असल्याने कोणतेही सण, समारंभ जाहीर कार्यक्रम न करण्याचे आवाहन असल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती नवीन पनवेलमधील डी. डी. विसपुते महाविद्यालयात प्रथमच पुस्तक वाचन करून ऑनलाइन साजरी करण्यात …
Read More »आदिवासींचे उत्पन्नाचे साधन रानमेवा कोरोनामुळे दुर्मीळ
मोहोपाडा : प्रतिनिधी दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उन्हाच्या चटक्यापासून थकवा कमी व्हावा, यासाठी निसर्गाने या ऋतूमध्ये रसाळ फळे व रानमेव्याची निर्मिती केली असावी. यामुळे दरवर्षी विविध बाजारात पेठांत जंगलातील रानमेवा दाखल होत असतो. मात्र या वर्षी कोरोनासारखे संकट आल्यामुळे आणि त्यातच संचारबंदीमुळे …
Read More »श्री साई नारायणबाबा मंदिराच्या वतीने पेपरविक्रेते, रिक्षाचालकांना धान्याचे वाटप
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदतीचा हात म्हणून श्री साई नारायणबाबा मंदिर, पनवेल रेल्वे स्टेशनच्या वतीने बुधवारी पनवेल परिसरात पेपर विक्री करणार्या काही विक्रेत्यांसह गरजू रिक्षाचालक आणि गरजवंतांना धान्याचे वाटप करण्यात आले. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पेपर विक्रेते आपला व्यवसाय करीत असतात. परंतु लॉकडाऊनमुळे पेपर विक्री सुद्धा …
Read More »पाय धुवूनच महापालिकेत प्रवेश
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर, कोरोनाला पळवून लावण्यासाठी अनेकांना अनेक युक्त्या सुचल्या, काही जण डॉक्टर होऊन उपाय सुचवू लागले आहेत. असेच पनवेल महानगरपालिकामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. पालिकेत येण्यापूर्वी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर, तीन प्लास्टिकची भांडी पाण्याने भरून ठेवली आहेत. त्या पाण्यात काही केमिकल …
Read More »पाताळगंगा एमआयडीसीत वाहनचालकांना अन्नदान
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते दशरथ गायकर यांनी रसायनी पाताळगंगा येथील पार्किंगमधील वाहनचालकांना अन्नदान केले. रसायनी पाताळगंगा हे औद्योगिक क्षेत्र आहे. या परीसरात कच्च्या व पक्क्या मालाची ने-आण करण्यासाठी कंटेनर, टँकर अशा मोठमोठ्या वाहनांची आवश्यकता असते. हि वाहने रसायनी पाताळगंगा परीसरात आल्यानंतर पाताळगंगा पार्कींगमध्ये थांबतात. परंतु लॉकडाऊमुळे बरीचशी …
Read More »उलवे केमिस्ट असोसिएशनतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र अहोरात्र सेवा बजावत आहेत. देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हे कर्मचारी देवदूतच ठरले आहेत. या देवदूतांना केमिस्ट असोसिएशन उलवे संघटनेच्या वतीने एनआरआय पोलीस व न्हावा शेवा पोलीस यांना बिसलेरी मिनरल वॉटर, मास्क, सॅनिटायझर आणि इलेक्ट्रॉल सॅनिटायझर यांचे नुकतेच वाटप …
Read More »विधाता फाऊंडेशनच्या वतीने ‘एमजीएम’मध्ये रक्तदान शिबिर
पनवेल : वार्ताहर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त विधाता फाऊंडेशन यांच्या वतीने कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी विधाता फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन गायकवाड सचिव पत्रकार पंचशील शिरसाट, सहचिटणीस सुनील भोईर, उपाध्यक्ष जमिल खान, सुभाष गायकवाड, खजिनदार …
Read More »लग्नसराईला कोरोनामुळे ब्रेक; पूर्वनियोजित समारंभाचे वेळापत्रक कोलमडले
उरण : रामप्रहर वृत्त एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वच ठिकाणी लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोनामुळे देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे पूर्व नियोजित लग्न समारंभ आणि साखरपुडा यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. जास्त लोकांना एकत्रित जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ खुली नसल्याने सध्या लग्नसराईला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper