Breaking News

Yearly Archives: 2020

नाका कामगारांना धान्यवाटप

नवी मुंबई : बातमीदार कोरोनामुळे बांधकाम साइट, विविध ठिकाणी सुरू असलेली कंत्राटी कामे आणि मोलमजुरीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे नाका कामगार अडचणीत आले आहेत. सकाळपासून ताटकळत नाक्यावर थांबून काम न मिळाल्यामुळे या कामगारांना रिकाम्या हाताने घरी जावे लागत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी …

Read More »

पनवेल शहर पोलिसांना रोटरीचे मास्क

पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून शासकीय पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्याकरीता पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करीत असताना कोरोना रोगा विरोधात लढा देणार्‍या पनवेल शहर पोलिसांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोना हा महामारी रोग पनवेल …

Read More »

कोरोनाला रोखण्यासाठी वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीचा पुढाकार

मोहोपाडा : प्रतिनिधी प्रत्येकाला कोरोना रोगाची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी ग्रुप ग्रामपंचायत वासांबे-मोहोपाडा यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. परिसरात जनजागृती करुन योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच मोफत मास्कचेही वाटप करण्यात आले. कोरोना हे नाव आता प्रत्येकांच्या मुखावरती आहे. यामुळे तो आजार पसरु …

Read More »

पनवेल, उरण तालुक्यांत सर्वत्र कडकडीत बंद

जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : वार्ताहर शासनाने जाहीर केलेल्या रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्ताने सर्वत्र निरव शांतता व शुकशुकाट होता. बंद असतानाही अतिशहाणपणा करून रस्त्यावर उतरणार्‍या अविचारी नागरिकांना चांगलाच पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला पनवेलकरांनी …

Read More »

कोरोनाविरोधात आज संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाला देशात प्रतिबंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. 22) संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. अनेकांनी पंतप्रधानांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून, यात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.कोरोना विषाणूचा प्रसार सर्वत्र होत असून, भारतातही काही रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

कोरोना धोका वाढतोय

राज्यासह देशभरातील रुग्णांचा आकडा वाढला मुंबई, नवी दिल्ली : प्रतिनिधी, वृत्तसंस्थाचीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला असून, भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारने शनिवारी (दि. 21) जाहीर केलेल्या आकड्यांनुसार आतापर्यंत संपूर्ण देशभर 298 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी ही संख्या 258 होती. म्हणजेच 40 जणांची भर …

Read More »

जनता कर्फ्यूत सहभागी व्हा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : कोरोनाविरोधात लढा देण्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी सर्व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, तसेच सर्वांनी मनात भीती न बाळगता स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन …

Read More »

कामोठे येथील होम क्वारंटाईन केलेल्या तिघांवर गुन्हा दाखल

बाहेर फिरताना आढळल्याने कारवाई पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील ज्या सदस्यांना होम क्वारंटाईन केले होते ते शनिवारी (दि. 21) सकाळी महापालिका आयुक्त आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या तपासणीवेळी बाहेर फिरताना आढळले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना खारघर येथील ग्राम विकास भवनात 14 दिवसांसाठी पुन्हा …

Read More »

खोपोलीत ऑनलाइन फसवणूक; 88 हजारांचा गंडा

खालापूर : प्रतिनिधी पेटीएममधून बोलत असून, आपली ग्राहक ओळख (केवायसी) मुदत संपत असल्याचे सांगून, बनावट लिंकद्वारे एका ग्राहकाला 88 हजार 500 रुपयांना गंडा घातल्याची घटना खोपोलीत घडली आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वासरंग येथे राहणार्‍या सुनील यांना त्यांच्या मोबाइलवर विजय नावाच्या माणसाने संदेश पाठविला की, पेटीएममधून विजय बोलत आहे. तुमच्या …

Read More »

नागोठणे बाजारपेठही ओस

नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील बाजारपेठ शनिवारी (दि. 21) दुपारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जैन यांनी सांगितले. यात मेडिकल तसेच दूध आणि किराणा विक्री करणार्‍या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सर्व किराणा दुकाने रोजच्या रोज न उघडता साखळी पद्धतीने उघडली जातील, असे संघटनेचे …

Read More »