Breaking News

Yearly Archives: 2020

करोना वायरचा फटका चार वर्षांनी होणार्‍या ऑलिम्पिकलाही?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ’करोना’ वायरसचा फटका आता चार वर्षांनी होणार्‍या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेवरही होणार असल्याचे दिसत आहे. जर ’करोना’ वायरस आटोक्यात आणला नाही तर ऑलिम्पकही रद्द होऊ शकते, असे म्हटले जात आहे. दर चार वर्षांनी क्रीडा जगताचा महाकुंभ समजल्या जाणार्‍या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी ऑलिम्पिकचे आयोजन जपानमधील …

Read More »

कमळ पुन्हा हसले!

ज्योतिरादित्य हे एका मातब्बर राजघराण्याचे वारसदार आहेत. या घराण्याची नाळ महाराष्ट्रात पुरलेली आहे. संपूर्ण आयुष्य मध्यप्रदेशात व्यतीत करूनही त्यांनी महाराष्ट्राशी असलेले आपले नाते तोडलेले नाही. आपल्या वडिलांप्रमाणेच ज्योतिरादित्य देखील उच्चविद्याविभूषित आणि सुसंस्कारी आहेत. गेली जवळपास दोन वर्षे ज्याची प्रतीक्षा होती ते घडते आहे. होलिकोत्सवाच्या शुभमुहुर्तावर मध्यप्रदेशात कमळ पुन्हा एकदा हसते …

Read More »

उरण तालुका भाजप महिला अध्यक्षपदी अ‍ॅड. राणी म्हात्रे

उरण : प्रतिनिधी उरण तालुका भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या असून भाजपच्या महिला कमिटी तालुकाध्यक्ष पदी अ‍ॅड. राणी सुरज म्हात्रे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने महिला वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. भाजप पदाधिकार्‍यांच्या नव्याने नियुक्त्या करण्याचे धोरण पक्षाने सुरू केले आहे. पक्षातील इतर कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी …

Read More »

उरण : नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या कुटुंबियांनी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली. या उत्साहात सविन म्हात्रे, समीर म्हात्रे व मित्र मंडळ सहभागी झाले होते.

Read More »

शासकीय अध्यापक महाविद्यालयात वारली चित्रकला कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इतिहास मंडळाने रविवारी (दि. 8) वारली चित्रकला कार्यशाळा आयोजित केली होती. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दोन सत्रात झाली. प्रथम सत्रातील उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले, इतिहास मंडळ प्रमुख डॉ. …

Read More »

ब्राह्मण सभेतर्फे महिला मॅरेथॉन व वॉकेथान

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवीन पनवेल ब्राह्मण सभेच्या वतीने महिला मॅरेथॉन/वॉकेथान तसेच मनःशांती समुपदेशन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याला नवीन पनवेल परिसरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. मधुमेहतज्ञ डॉ. कीर्ती समुद्र यांनी कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले. तरुण …

Read More »

खारघर येथे कॅन्सर जागरूकता शिबिर

पनवेल : बातमीदार जागतिक महिला दिनानिमित्त सीआरपीएफ कॅम्प खारघर मुंबई, अखिल भारतीय स्त्री रोगतज्ञ संघटना, अखिल महाराष्ट्र स्त्री रोगतज्ञ संघटना, नवी मुंबई स्त्री रोगतज्ञ संघटना, रायगड स्त्री रोगतज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सीआरपीएफ पोलीस पत्नी व महिला पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता कर्करोग निदान व जनजागृती शिबिराचे आयोजन सीआरपीएफ खारघर येथे बुधवारी …

Read More »

गावागावात होळीचा आनंदोत्सव

उरण : प्रतिनिधी उरण शहरासह संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण परिसरातील गावागावात होलिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींसह तरुणाईने विविध प्रकारच्या वेशभूषा करून ढोलताशांच्या गजरातील नाचगाण्यात सहभागी होऊन होळीचा आनंदोत्सव साजरा केला. सावडीच्या ओल्या ताज्या वृक्षाची साकारण्यात आलेली हवालुबाई आणि तिच्या समवेत असलेला मुलारी यांना कागदी रंगीबेरंगी पताका आणि फुलपानांनी …

Read More »

आमदार महेश बालदी मित्र मंडळाचे धूलिवंदन

उरण : वार्ताहर उरण शहरासह ग्रामीण भागात होळी व धुळवड मोठ्या उत्साहात सण साजरा करण्यात आला. उरण शहरात ठिकठिकाणी मोक्याच्या भागात, सोसायट्यांमध्ये होळी सण साजरा करण्यात आला. होळी सण साजरा केल्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी (दि. 10) धुळवड सण साजरा करण्यात आला. विविध रंगांनी लहान बच्चे कंपनीपासून युवती-युवक ते सर्व वयोगटातील …

Read More »

पनवेल व उरण तालुक्यात होलिकोत्सव, धुळवड उत्साहात; उधळुणी रंग, रंगात झाली तरुणाई दंग

पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात होलिकोत्सव, धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यात आबालवृद्ध, युवक, युवती सहभागी झाले होते. करोनाच्या सावटामुळे काही ठिकाणी नागरिकांमध्ये निरुत्साह दिसून आला. शहरात विविध ठिकाणी चौकाचौकात होळी उभारण्यात आल्या होत्या. होळीला ’शिमगा’ देखील म्हटले जाते. संध्याकाळपासून महिलांनी नैवेद्य दाखवून होळीची पूजा …

Read More »