मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परिसरातील शिवनगर मोहोपाडा येथील कौशल विनायक गायकवाड याने एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. मेकॅनिकल इंजिनियरचा डिप्लोमा केलेला हा संगीतप्रेमी लहान वयातच संगीतक्षेत्राकडे वळलेला आहे. त्याने मोहोपाडा प्रिया स्कुलमध्ये शिक्षण घेत असतानाच त्याला संगीताची आवड निर्माण झाली होती. कॉलेज जिवनात असतानाच त्याने कविता लिहण्यास सुरुवात केली. …
Read More »Yearly Archives: 2020
पालिका हद्दीत शौचालये बांधण्याची मागणी
नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी दिले आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीत शिवाजी नगर व नवनाथ नगर झोपडपट्टीमध्ये नव्याने शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी भाजप नगरसेविका वृशाली जितेंद्र वाघमारे यांनी केली आहे. यासाठी पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका हद्दीतील शिवाजी …
Read More »जयहिन्द कप क्रिकेट स्पर्धा
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त खारघरच्या जयहिन्द क्रीडा मंडळाच्या वतीने व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खारघर शहर मंडळ भारतीय जनता पक्ष पुरस्कृत जयहिन्द कप 2020 क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी (दि. 24) प्रारंभ झाला. या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष …
Read More »पोदी भुयारी मार्गाचे लोकार्पण
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक नगरसेवकांनी पोदीहून पनवेलला जोडणार्या भुयारी मार्गाच्या (रेल्वे अंडर पास) कामासंदर्भात केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश आले आहे. या मार्गाचे काम अखेर पूर्ण झाले असून, महापौर डॉ. कविता …
Read More »जीएसटीनंतर आता ‘एक देश, एक रस्ता कर’!
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासन 2017मध्ये देशभरात एक करप्रणाली लागू करण्यात आली. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून देशभरातील वस्तूंचे विभाजन करून त्याप्रमाणे कर आकारणी करण्यात आली. जीएसटीनंतर आता देशभरात एक देश एक रस्ता कर योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.या …
Read More »प्रजासत्ताक दिनी कान्होजी आंग्रेंचा चित्ररथ
मुंबई : प्रतिनिधीस्वराज्याचे सरखेल दर्यासारंग कान्होजी आंग्रे या विषयावरील चित्ररथ प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथील संचलनात सहभागी होणार आहे. कान्होजींच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा करणार्या या चित्ररथाची बांधणी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आहे.ज्यांचे अश्वदल त्यांची पृथ्वी अन् ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे लक्षात …
Read More »पनवेल परंपरा फेस्टिवलमधे ‘सूर प्रभात’
खारघर : रामप्रहर वृत्तप्रसिद्ध तबलावादक किशोर पांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पनवेल परंपरा फेस्टिवलमधे सूरप्रभात या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल मार्केड यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या संगीतसभेचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ गायकांचे शास्त्रीय गायन …
Read More »फोन टॅपिंग : फडणवीसांनी आरोप फेटाळले
चौकशी करण्याचे आव्हान मुंबई : प्रतिनिधीभाजप सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याच्या आरोपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार खंडन केले आहे. ’राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आरोप करण्यापेक्षा तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करा. वाटल्यास इस्रायलला जाऊन चौकशी करा,’ असे आव्हान फडणवीस यांनी …
Read More »‘भगव्या’ची पळवापळवी
वर्षभरापूर्वी ‘चलो अयोध्या’ असा नारा देणारी शिवसेना आज राष्ट्रवादीच्या तालावर नाचताना पाहून अनेक जुन्या-जाणत्या शिवसैनिकांना देखील दु:ख होत असेल. आमचे रंग आणि अंतरंग अजूनही भगवेच असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी वचनपूर्ती सोहळ्याच्या मंचावरून केला, तो किती पोकळ आहे हे तेथील गर्दीला देखील उमगले असेल. उक्ती आणि कृतीमध्ये विसंगती दिसली तर …
Read More »गगनगिरी महाराज समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात
खोपोलीत हजारो भाविकांनी घेतले दर्शन खोपोली : प्रतिनिधी पूज्य गगनगिरी महाराज यांचा 12 वा समाधी सोहळा मंगळवार व बुधवारी खोपोली येथील गगनगिरी महाराज मठात विविध सामाजिक उपक्रम व हजारो भाविकांच्या दर्शनाने संपन्न झाला. मठाचे मुख्य आशिष भाई महाराज यांच्या देखरेखीखाली हा समाधी सोहळा पार पडला. नगरपालिकेकडूनही आवश्यक सुविधा या निमित्ताने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper