Breaking News

Monthly Archives: August 2021

दरडग्रस्त सुतारवाडी, केवनाळे गावांत केली आर्थिक मदत

पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील देवळे ग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे आणि साखर ग्रामपंचायत हद्दीतील सुतारवाडी येथे 22 जुलै रोजी दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (दि. 7) या दरडग्रस्त गावांचा पुन्हा एकदा दौरा केला. या वेळी त्यांनी दरडबाधित व्यक्तींच्या …

Read More »

नीरज चोप्राने इतिहास रचला!

भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकाविले टोकियो ः वृत्तसंस्था भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचत सुवर्णपदक पटकाविले. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. भारताने पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेच्याभालाफेक प्रकारात पदक जिंकले आहे. 23 वर्षीय नीरजने पहिली फेक 87.03 मीटर, दुसरी  …

Read More »

विविध कंपन्यांकडून पनवेलमध्ये कोरोना लसीकरण मोहीम

पनवेल : वार्ताहर डाऊ केमिकल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, क्रोडा, एविनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ओवेन्स कॉर्ननिग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीच्या सहकार्याने आणि फ्रीडम फॉर यु फाऊंडेशन यांच्या माध्यमातुन पनवेलमध्ये रिक्षा चालकांचे लसीकरण तसेच, बिगारी कामगार, एस टी ड्राइवर, ट्रान्सपोर्ट चे ड्राइव्हार, आदिवासी नागरिक यांना पनवेल येथील पटवर्धन हॉस्पिटल येथे कॅम्प …

Read More »

रस्त्यावरील ड्रेनेजचे धोकादायक झाकण बदलले

पनवेल : वार्ताहर गार्डन हॉटेल ते पनवेल महानगरपालिका कार्यालय या स्वामी नित्यानंद मार्गावरील सिजलर कोबे हॉटेल समोरील ड्रेनेजचे झाकण कमकुवत झाले होते. कोणत्याही क्षणी जे तुटण्याची शक्यता होती. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून नगरसेवक विक्रांत पाटील यांनी ते ड्रेनेजचे मोडकळीस आलेले झाकणतातडीने बदलून घेतले. स्वामी नित्यानंद मार्गावरील कमकुवत झालेल्या ड्रेनेजचे …

Read More »

पेणचे सुप्रसिद्ध गणपती उरणमध्ये दाखल

उरण : वार्ताहर अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री गणेशाचा गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला असल्याने गणपती कारखान्यात मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. उरण तालुक्यात चिरनेर, उरण, बोकडवीरा, डाऊरनगर, केगाव आंबीलवाडी, चाणजे, करंजा आदी ठिकाणी  असलेल्या  कारखान्यात कारागीर मग्न झाले आहेत. उरण शहरात, किशोर जगे यांचे सिद्धीविनायक कलाकेंद्र, बाजार पेठ येथील …

Read More »

काळसेकर पॉलिटेक्निकच्या ऑनलाइन करिअर मार्गदशन शिबिराला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त अंजुमन-ए-इस्लाम या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या एन.बी.ए. मानांकित पनवेल येथील अब्दुल रझाक काळसेकर पॉलिटेक्निकद्वारे नुकतेच दहावी, बारावी आणि आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क करीअर मार्गदर्शनपर ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यार्थी वर्गातून उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या नवी मुंबई शिक्षण संस्थांचे एक्झिक्युटिव्ह …

Read More »

‘सह्याद्री’तर्फे पूरग्रस्तांना मदत

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर पंधरा दिवसांपूर्वी महाड, पोलादपूर, चिपळूणसह अनेक भागात पावसाने पूराच्या रुपाने रौद्र रुप दाखवले. पूर एक दोन दिवसांत ओसरला, पण मागे कायमस्वरूपी कोकणवासियांच्या मनांवर चिखलाचा गाळ साठला. या पूराला आता दोन आठवडे उलटत आल्यानंतरदेखील काही भागांत कोणतीही मदत पोहचली नसल्याचे स्थानिक मित्र परिवार, रहिवाशी यांच्याकडून कळल्यानंतर याच …

Read More »

‘एलटीपीसीटी’कडून पूरग्र्रस्तांना वैद्यकीय युनिट्स आणि मनुष्यबळ

पनवेल : रामप्रहर वृत्त एल अ‍ॅण्ड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने (एलटीपीसीटी) तातडीने महाडमध्ये चार वैद्यकीय युनिट्स कार्यरत करून पूरग्रस्तांना सेवा पोहचविण्याचे काम केले जात आहे. या आपत्ती प्रतिसाद उपक्रमाला रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि पनवेलचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले यांनी हिरवा झेंडा दाखवून तत्काळ सेवा कार्यान्वित केली.  एलटीपीसीटीची चार वैद्यकीय …

Read More »

नुकसानग्रस्त शिक्षकांना मदत

कळंबोली : प्रतिनिधी नुकत्याच आलेल्या पुराच्या तडाख्यात महाड, खरीवली, पोलादपूरमधील शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. या शाळांमधील कर्मचारी व शाळांना आवश्यक असणारी साधनसामग्री देण्याचा मनोदय रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनेने हाती घेतला. यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या शाळांना शैक्षणिक साहित्याची मदत सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली मराठी शाळेतील शिक्षक बांधवांनी …

Read More »

अपंग पूरग्रस्तांना मदतीचा हात

रसायनी : प्रतिनिधी महाड येथे आलेल्या पुरामध्ये नुकसान झालेल्या अपंग कुटुंबीयांना शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही यासाठी महाड येथील बिरगाव येथे 50 अपंग कुटुंबीयांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप लीव्ह टू गीव्ह यांच्या वतीने अन्नधान्य आणि बीयूएसएस मुंबई यांच्या वतीने कपडे, पाणी आणि दैनादिन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.  ह्यावेळी लीव्ह टू …

Read More »