Breaking News

Yearly Archives: 2021

अतिवृष्टीबाधितांसाठी अखेर मदत जाहीर; भाजपच्या सातत्यपूर्ण मागणीला यश

मुंबई ः प्रतिनिधीभाजपने सातत्याने लावून धरलेल्या मागणीमुळे राज्यातील पूरग्रस्त, तसेच अतिवृष्टीबाधितांसाठी अखेर ठाकरे सरकारने मदत जाहीर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 13) झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार अतिवृष्टीबाधित आणि पूरग्रस्तांना 10 हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 या काळात आलेल्या पुरामुळे, …

Read More »

भटके विमुक्त महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी विद्या तामखडे

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप भटके विमुक्त महिला आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी कामोठे येथील विद्या तामखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 13) तामखडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, …

Read More »

कर्जतमधील शिवसेना, शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेकडे आकर्षित होऊन कर्जत तालुक्यामधील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 12) भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. खांदा कॉलनीत झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश …

Read More »

शिवसेना आमदारावर टीका करीत शेकापचा अलिबागेत ‘रास्ता रोको’

अलिबाग ः प्रतिनिधीअलिबाग-रोहा रस्त्याचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी शेकाप पुरोगामी युवक संघटनेने बुधवारी (दि. 13) खानाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका केली. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्र्रस आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या महाविकास आघाडीला ज्या इतर …

Read More »

सीकेटी विद्यालयात सरस्वतीपूजन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय, इंग्रजी माध्यमात मंगळवारी (दि. 12) सप्तमीला सरस्वती पूजन करण्यात आले. पर्यवेक्षिका निरजा मॅडम यांनी सरस्वतीची पूजा केली. तर सर्व शिक्षकांनी दीपप्रज्वलन करून देवीला वंदन केले. कार्यक्रमाची सुरूवात जिनल वालावलकर हिने दुर्गा …

Read More »

सुकापूरमध्ये कोरोना लसीकरण शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना प्रादूर्भाव तसेच त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर सुकापुर येथील अन्नपुर्णामंदिर औम शिवा सोसायटीमध्ये कोविड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी जि. प. सदस्य अमित जाधव, पालीदेवद ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता राजेश पाटील, माजी …

Read More »

उरणमधील अपघात रोखण्यासाठी भाजपचा पुढाकार

विविध उपाययोजनांसंदर्भात चर्चा आणि पत्रव्यवहार उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरणमधील सातत्याने होणार्‍या अपघातांवर आळा घालण्यासाठी अथवा रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्ष पूर्व विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पदाधिकार्‍यांनी आमदार महेश बालदी, तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, ग्रामपंचायत खोपटे-बांधपाडा आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून निवेदन देण्यात आले आहे. …

Read More »

खोपोलीतील लव्हेज शाळेची दुरवस्था; भाजप युवा मोर्चा आक्रमक, मुख्याधिकार्‍यांना निवेदन

खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील लव्हेज शाळेच्या दुरवस्थेबाबत भाजप व युवा मोर्चा पदाधिकार्‍यांनी बुधवारी (दि. 13) मुख्याधिकारी अनुप दुरे यांची भेट घेऊन जाब विचारला. या वेळी शिष्टमंडळाने त्यांना निवेदनही दिले. लव्हेज गावातील शाळा क्रमांक 8च्या छतावरील पत्रे वादळात उडाल्यामुळे, पावसाचे पाणी पडून वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. काही वर्गात दगड विटांचा …

Read More »

निवासी झोनचे आरक्षण आमच्या कालावधीत झालेले नाही!; नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांचा खुलासा

मुरूड : प्रतिनिधी शहरातील शेगवाडा परिसरातील क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव अथवा ठराव शिवसेनेच्या काळात झालेला नाही, तो त्या पूर्वीच्या काळात झाला असून या घटनेशी आमचा कोणताही संबंध नाही, असा खुलासा मुरूडच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. शहरातील शेगवाडा परिसरात क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलून …

Read More »

महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचे खालापूर तहसीलदारांना निवेदन

खोपोली : प्रतिनिधी भटके विमुक्त जाती जमातीच्या शासकीय पदोन्नतीमधील आरक्षण सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ खोपोली शहर भाजपच्या  भटके-विमुक्त सेल तर्फे खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांना निवेदन देण्यात आले. भाजपचे खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, भाजप भटके-विमुक्त अध्यक्ष संतोष लोहार, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंदुलकर, …

Read More »