Breaking News

Yearly Archives: 2021

कोरोना लसीकरणांसाठी सोसायट्यांना आवाहन

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका काही दिवसांपासून लसीकरणांवर भर देत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी पालिका क्षेत्रातील सोसायट्यांनी पुढाकार घेऊन आपल्या सोसायटीतील नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख केले आहे. शनिवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत लसीकरणाबरोबरच पालिका क्षेत्रात सुरू …

Read More »

डेंग्यू नियंत्रणासाठी नवी मुंबई पालिका सज्ज

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सध्या एमएमआर क्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत असून या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांना योग्य दिशेने गती देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विशेष बैठक आयोजित करीत महापालिका क्षेत्रातील डेंग्यूच्या स्थितीचा नागरी आरोग्य केंद्रनिहाय सविस्तर आढावा घेतला व डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना अ‍ॅक्शन …

Read More »

पनवेलमध्ये चालक दिन साजरा

पनवेल : वार्ताहर शासनाने 17 सप्टेंबर हा चालक दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे व रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व प्रादेशिक परिवहन कार्यालय …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेची पाहणी

रतलाम : वृत्तसेवा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. शुक्रवारी खुद्द गडकरींनी मध्य प्रदेशातल्या रतलाममध्ये रस्त्याचे परीक्षण केले. गडकरींनी एका कारमधून रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्या वेळी त्यांची कार 170 प्रतिकिमी वेगाने धावत होती. गडकरींनी द्रुतगती महामार्गाच्या घेतलेल्या चाचणीचा व्हिडीओ आता …

Read More »

आरोग्य कर्मचार्‍यांवर मानसिक परिणाम; कोरोनाबाबत ‘आयसीएमआर’च्या अभ्यासाचा निष्कर्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना साथीचा आरोग्य कर्मचार्‍यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या अहवालात समोर आला आहे. आयसीएमआरने केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कामाचे तास आणि तीव्रता, लोकांचे गैरवर्तन आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांच्या असलेल्या अतिरिक्त जबाबदार्‍या ज्यात त्यांना नवीन प्रोटोकॉलशी जुळवून घ्यावे …

Read More »

खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने शालोम एज्युकेशन या दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि. 17) खाऊचे वाटप तसेच भेटवस्तू देण्यात आल्या.  भाजपचे खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजय इंगुळकर, उपाध्यक्ष पूनित तन्ना, सरचिटणीस विनायक माडपे, कार्यकर्ते सिद्धेश पाटील, …

Read More »

महाडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात

नऊ प्रवासी जखमी महाड : प्रतिनिधी तालुक्यातील विन्हेरे-तुळशीखिंड मार्गावरील कुर्ला गावाजवळ महाड दिशेने येणारा टेम्पो ट्रॅव्हलर बस रस्त्याकडेला पलटी झाली. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. खेडकडून मुंबईच्या दिशेने निघालेली टेम्पो ट्रॅव्हलर बस (एमएच-04, जेयु-6484) कुर्ला गावाजवळ आली असता एक उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने ही बस रस्त्याकडेला पलटी झाली. या …

Read More »

रायगडात मुबलक पाणीसाठा

26 धरणे ओव्हरफ्लो, दोन धरणांत 90 टक्के पाणीसाठा रोहे ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाची रायगड जिल्ह्यातील 28 पैकी 26 धरणे तुडूंब भरून वाहू लागली आहेत. तर उर्वरित दोन धरणात 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला असून ही दोन्ही धरणे भरून वाहण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे …

Read More »

सुकापूरमध्ये शासकीय दाखले वाटप शिबिर उत्साहात

कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राचेही उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार तालुक्यात सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत …

Read More »

भाजप ओबीसी मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी राजेश गायकर

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी कामोठे येथील राजेश गायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांची नियुक्ती जाहीर करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी (दि. 17) झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उत्तर …

Read More »