Breaking News

Yearly Archives: 2021

वावड्यांचा धुरळा

राजकारणामध्ये वावड्यांचे पतंग उडायला लागले की थांबता थांबत नाहीत. कुणाची पतंग किती उंच जाते आणि अन्य किती पतंगांचा मांजा काटते याचीच उत्सुकता लागून राहते. समाजमाध्यमे शिरजोर झाल्यानंतर असल्या प्रकारच्या राजकीय वावड्या हा मनोरंजनाचाच भाग झालेला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत राजकारणाकडे मनोरंजन अथवा विरंगुळ्याचे साधन म्हणून कुणी पाहात नव्हते. आता मात्र परिस्थिती …

Read More »

किराणा घराण्याच्या गायिका डॉ. प्रभा अत्रे

गुरु चरण नित लाभो प्रभो, मांगत एकहि दान तुम्हीसो प्रभो नाद समिंदर अतहि कठिण, पार उतरु कैसे गुरु बिन प्रभो किराणा घराण्याच्या अष्टपैलू गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखंच आहे. तरीही एक शिष्या म्हणून मी माझ्या गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. विज्ञान आणि कायदा …

Read More »

दहशतवादाचा विषाणू

ऐन सणासुदीच्या हंगामात देशात घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. यामुळे देशवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतर काही आठवड्यांच्या आतच भारतात पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडले ही निश्चितच काळजीची बाब आहे. मुंबई पोलिसांना पत्ताही लागू न देता दिल्ली पोलिसांनी धारावी येथील रहिवासी असलेल्या …

Read More »

पनवेलमध्ये वकिलांनी घेतला ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या वतीने भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व पनवेल बारचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या मागणीवरून गुरुवारी (दि. 16) कोविशिल्डचा दुसरा डोस वकिलांना देण्यात आला. या वेळी बार असोसिएशनच्या 175 वकिलांनी त्याचा लाभ घेतला. पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, उपाध्यक्ष अ‍ॅड. जे. …

Read More »

…तर ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक ठरेल -चंद्रकांत पाटील

पुणे : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारकडून काढण्यात येणारा अध्यादेश न्यायालयात टिकावा अशी आपली इच्छा आहे, पण हा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते देहू येथे पत्रकारांशी बोलत होते. …

Read More »

आता तरी जागे व्हा!

संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा जालना : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत या नैराश्यातून सदाशिव शिवाजी भुंबर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जालन्यातील परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली आहे. या घटनेच्या …

Read More »

बँकिंग क्षेत्रासाठी केंद्राकडून 30,600 कोटींची तरतूद

नवी दिल्ली : कोरोना महामारीतून सावरत असताना देशातील एकूण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला पाठबळ देण्याकरिता नॅशनल अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची (एनएआरसीएल) उभारणी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यामार्फत संकटात असलेल्या बँकिंग क्षेत्रासाठी तब्बल 30 हजार 600 कोटींच्या निधीची घोषणा बुधवारी (दि. 16) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात …

Read More »

जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच करायला हवे होते, ते आज आम्ही करतोय!

पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन संरक्षण कार्यालय संकुलांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) करण्यात आले. या वेळी पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पावरून टीका करणार्‍यांना विरोधकांवर निशाणा साधला. जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच करायला हवे होते, ते आज आम्ही करीत आहोत, …

Read More »

शासकीय दाखले वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार तालुक्यात सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत गुरुवारी (दि. 16) पहिले शिबिर …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सेवा व समर्पण अभियान

मुंबई ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त विविध सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या अभियानाचे प्रमुख राज पुरोहित व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …

Read More »