Breaking News

Yearly Archives: 2021

दिलासा! उपचाराधीन रुग्णांत घट; नवी मुंबईतील कोरोना आकडेवारी स्थिर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतील निर्बंध शिथिलीकरणानंतर 50 वर स्थिर असलेली कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत ती 100 पर्यंत गेली होती. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खरेदीसाठी झालेली गर्दी पाहता रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत होती, मात्र 100 वर असलेली दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर राहिली आहे. तर उपचाराधीन रुग्णही कमी होत …

Read More »

खबरदारीला पर्याय नाही

गेल्या दोन आठवड्यांत अमेरिकेतील कोरोनासंबंधी परिस्थिती आणखीनच गंभीर होत असल्याचे समोर आले आहे. आपल्याकडे केरळमध्ये अद्याप दुसरी लाटही पुरती ओसरलेली नाही. देशभरात कदाचित ऑक्टोबरच्या अखेरीस तिसरी लाट येईल असे सांगितले जाते. वेगाने लसीकरण राबवल्यास व सातत्याने कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेतल्यास आपण तिसर्‍या लाटेचा वेग आणि तीव्रता दोन्ही थोपवू शकू या …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा मराठा ठोक मोर्चातर्फे इशारा; प्रलंबित मागण्यांसाठी पवित्रा

औरंगाबाद : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला तीन महिने उलटूनही निर्णय घेतला नाही. त्यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा अडवणार आहोत, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. …

Read More »

अनिल देशमुखांची याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई : प्रतिनिधीराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तातडीचा कोणताही दिलासा न देता हायकोर्टाने त्यांची याचिका ऐकण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी देशमुखांना त्यांची याचिका सुनावणीसाठी खंडपीठाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेवर हायकोर्ट रजिस्ट्रीने घेतलेला आक्षेप आणि ईडीने उठवलेला सवाल हा योग्यच असल्याचे न्यायमूर्ती शिंदे यांनी …

Read More »

रायगडात गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप

अलिबाग, पनवेल : प्रतिनिधीलाडक्या गणपतीबाप्पाची पाच दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर रायगडकरांनी मंगळवारी (दि. 14) पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्याला निरोपही दिला. पाहुण्या आलेल्या गौराईचा पाहुणचार झाल्यानंतर मंगळवारी त्यांचेही विसर्जन करण्यात आले. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 56 हजार 535 गणेशमूर्ती, तर 14 हजार 429 गौरींचे विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी …

Read More »

अमरावतीमध्ये नदीत बोट उलटून 11 जण बुडाले; तीन जणांचे मृतदेह हाती

अमरावती : प्रतिनिधीअमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 15) सकाळी घडली. आतापर्यंत नावाड्यासह तिघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांचा शोध घेऊन उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला त्यांचे नातेवाईक सोमवारी तेथे पोहचले …

Read More »

आघाडी सरकारविरोधात आज आंदोलन; ओबीसी आरक्षणावरून भाजपची आक्रमक भूमिका, सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? खुलासा करण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणार्‍या आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी (दि. 15) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात उत्तर रायगड जिल्हाही सहभागी होणार आहे, अशी घोषणा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू …

Read More »

राज्य सरकारची सावकारासारखी वसुली -फडणवीस

मुंबई : एकीकडे कोरोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक तो अडचणीत आहे आणि तो अडचणीत असताना त्यांना मदत करण्याच्या ऐवजी, त्याच्याकडून जबरदस्ती वसुली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसुली करायची आहे. म्हणून हे सगळे नाटक सुरू आहे, अशी टीका महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 14) …

Read More »

पाली सुधागडात गौरी गणपतीला निरोप

नदी, तलावांत मूर्तींचे विसर्जन पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात मंगळवारी पाच दिवसांच्या गणरायाला भावपुर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत बदल करून विसर्जन स्थळी होणारी पूजा घरीच करण्यात आली.  सुधागड तालुक्यातील अनेक गणेशमुर्तींचे विसर्जन गावाच्या जवळील नदी व तलावात करण्यात आले. अनेकांनी श्रीची मूर्ती शाडू व …

Read More »

कोतवाल खुर्द येथील नवसाच्या गणपतीचे विसर्जन

पोलादपूर तहसीलदारांकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची भेट पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कोतवाल खुर्द गावातील उतेकर, सकपाळ परिवाराच्या नवसाच्या गणपतीचे दुपारी विसर्जन करण्यात आले. या गणेशोत्सवाचे यंदा 101 वे वर्ष असल्याने संपूर्ण उतेकर, सकपाळ परिवार या वेळी उपस्थित होता. तत्पुर्वी पोलादपूरच्या तहसीलदार दिप्ती देसाई यांच्याकडे तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे एक युनिट भेट …

Read More »