Breaking News

Yearly Archives: 2021

बोर्ली परिसरात अतिवृष्टी

बाजारपेठ पाण्याखाली; साळाव चेकपोस्टजवळ दरड कोसळली रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील येसदे, साळाव, सुरई  परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बोर्ली बाजारपेठ पाण्याखाली गेली, त्यात व्यापार्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. साळाव चेकपोस्ट येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळली, तर येसदे ते शिरगाव या मुख्य रस्त्यावर पाणी व मातीचा चिखल झाला. …

Read More »

गणेशोत्सवासाठी साहित्य खरेदीची पेण बाजारपेठेत लगबग

पेण : प्रतिनिधी गणेशाचे आगमन चार दिवसांवर आले असून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणार्‍या साहित्य खरेदीसाठी भाविकांनी पेण बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरे आणि आठवडा बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवासाठी लागणार्‍या डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीमुळे पेणची बाजारपेठ इकोफ्रेंडली साहित्यांनी सजली आहे. …

Read More »

‘अंनिस’च्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला रोह्यात प्रतिसाद

रोहे : प्रतिनिधी निसर्गातील कुठल्याही घटनेला कार्यकारण भाव असतोच, तो शोधला पाहिजे. तसे न केल्यास बाबा, बुवा यांचे फावते व त्यांची संस्थाने उभी राहतात, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) चे रायगड जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर यांनी रविवारी (दि. 5) येथे केले. अंनिसतर्फे रोह्यात रविवारी एक दिवसाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात …

Read More »

कोकण रेल्वेने रायगडकरांना दिलासा द्यावा

कोकणची माणसे साधी भोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी म्हणतात, ते खरेच आहे. म्हणूनच त्याचा फायदा कोकण रेल्वे प्रशासनाने घेऊन त्यांच्यावर सतत अन्याय केला आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळत असतानाही प्रकल्पग्रस्त रायगड जिल्ह्याला रेल्वेने सापत्नभावाची वागणूक दिली आहे. गणेशोत्सव तोंडावर आला तरी दिवा-रोहा गाडीही सुरू करण्यास टाळाटाळ करण्यात …

Read More »

काळुंद्रे गावात जाणार्या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात

नगरसेवक तेजस कांडपिळे यांचा पाठपुरावा पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील काळुंद्रे गावात जाणार्‍या रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवण्याची मागणी नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पत्र देऊन केली होती. त्याची दखल घेऊन मंगळवारी (दि. 7) तेथील खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पनवेल महापालिका स्थापन झाली …

Read More »

चिपळे-विहीघर रस्त्याची डागडुजी धोकादायक

खड्ड्यांमध्ये टाकलेली खडी म्हणजे रोगापेक्षा इलाज भारी! पनवेल : वार्ताहर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भगतवाडी, चिपळे-नेरे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याबाबत आवाज उठवल्यानंतर येथील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली, मात्र हे खड्डे बुजवणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भारी असेच म्हणावे लागेल. खड्ड्यामध्ये टाकलेली खडी वर आली आहे. त्यामुळे अपघात होण्याचा …

Read More »

केदार भगत यांच्या रुग्णवाहिकेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे युवा नेते केदार भगत यांच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 7) करण्यात आले. या कार्यक्रमास सचिन भगत, राजेंद्र भगत, सुमित दसवते, प्रशांत शेटे, राजे प्रतिष्ठानचे केवल महाडिक, भाजप शिववाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता केंद्रे, …

Read More »

कळंबोलीतील जम्बो कोविड सेंटर लवकरच सेवेत

आमदार प्रशांत ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा; पनवेल महापालिका व सिडको अधिकार्‍यांकडून पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीमुळे कळंबोली येथे जम्बो कोविड सेंटर कार्यान्वित होत आहे. 29 कोटी रुपये खर्च करून कोरोना साथरोगाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी बनविण्यात आलेले कळंबोली सीसीआय गोदामात 635 खाटांचे जम्बो कोरोना रुग्णालय …

Read More »

निर्बंधांचा बागुलबुवा

गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना अपेक्षेप्रमाणेच सत्ताधारी पक्षाचे नेते पुन्हा एकदा निर्बंध लादण्याची भाषा करू लागले आहेत. याची अटकळ बहुतेकांना होतीच. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे भय दाखवून लोकांच्या वावरण्यावर निर्बंध लादण्याचे महाविकास आघाडी सरकारचे धोरण काही नवीन नाही. अशा प्रकारच्या भयाच्या राजकारणाचा पुरेपूर अनुभव महाराष्ट्राची जनता घेतच आली आहे. कोरोनाचे संकट अजून …

Read More »

टीम इंडियाचा इंग्लंडवर शानदार विजय

लंडन ः येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने विजयी तिरंगा फडकावला आहे. अत्यंत रोमांचक ठरलेल्या चौथ्या कसोटीत विराटसेनेने इंग्लंडला 157 धावांनी हरवले आणि 50 वर्षांचा दुष्काळ संपवला. पाचव्या दिवसअखेर इंग्लंडला 291 धावांची गरज होती, शिवाय त्यांच्याकडे संपूर्ण संघ फलंदाजीसाठी शिल्लक होता, पण भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त आक्रमण करीत इंग्लंडच्या फलंदाजांना …

Read More »