Breaking News

Monthly Archives: July 2022

मुंबई ते खारघरदरम्यान बससेवा सुरू

खारघर : रामप्रहर वृत्त बेस्ट प्रशासनाकडून मुंबई विमानतळ ते खारघरदरम्यान सोमवारपासून (दि.11) बस सेवा सुरू झाली आहे. ही सेवा सुरू व्हावी, यासाठी अनेक प्रवाशांनी मागणी केली होती. थेट विमानतळापर्यंत बेस्टची सेवा सुरू झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. बेस्ट प्रशासनाकडून मुंबई विमानतळ ते वाशी डेपोदरम्यान वातानुकूलित बससेवा सुरू …

Read More »

पिक विमा योजनेत सहभागी व्हावे

मुरूड तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ मुरूड : प्रतिनिधी राज्य शासनाने  खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली असून, मुरूड तालुक्यात भारतीय कृषी विमा कंपनीकडून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेत सहभागीसाठी 31 जुलैपर्यंत मुदत असून अधिकाधिक शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी …

Read More »

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी साधला पत्रकारांशी संवाद

पेण : प्रतिनिधी मनसे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून संपर्क अभियान सुरु केला असून, रविवारी (दि. 10) त्यांचे पेणमध्ये फटाक्याच्या आतषबाजीत मनसे पदाधिकार्‍यांनी  स्वागत केले. यावेळी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली होती. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अमित ठाकरे यांनी अभिवादन …

Read More »

रोह्यात पावसाचा जोर कायम

रोहे : प्रतिनिधी शहरासह रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम असल्याचे सोमवारी (दि. 11) दिसून आले आहे. सोमवार सकाळपासून अधुनमधून पावसाच्या जोरदार सरी येत होत्या. वातावरण ढगाळ होते. जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसर्‍या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतीला अनकूल पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे जोरात सुरू आहेत. …

Read More »

माथेरान जुम्मापट्टीजवळ वटवृक्ष कोसळला

कर्जत : प्रतिनिधी माथेरान-नेरळ घाटरस्त्यावर सायंकाळी  साडेचार वाजण्याच्या सुमारास सुमारे शंभर वर्षापूर्वीचे मोठे वडाचे झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. माथेरानमध्ये गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे घाटातील धबधबे मोठ्या प्रमाणात कोसळताना दिसत आहेत. धबधब्याच्या आकर्षणामुळे माथेरानमध्ये पर्यटक येत असल्याने नेरळ-माथेरान घाटात वाहतूक वाढली …

Read More »

पाली सबपोस्ट ऑफिसमध्ये पाच जागा रिक्त

अपूरे कर्मचारी व सुविधांच्या अभावाने नागरिकांची ग़ैरसोय पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील सबपोस्ट ऑफिसमध्ये (उप डाकघर) कर्मचार्‍यांची वानवा आहे. येथे एक पोस्टमास्तर व चार क्लार्क या पाच जागा रिक्त आहेत. परिणामी उपलब्ध कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. तसेच लवकर काम न झाल्याने नागरिकांना एका कामासाठीसुद्धा …

Read More »

मुरुड तालुक्यात भातशेतीच्या लावणीला प्रारंभ

मुरूड : प्रतिनिधी पावसाने मुरूड तालुक्यात दमदार हजेरी लावली असून, आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. जुलै महिन्यात झालेल्या या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने मुरूड परिसरातील शेतकर्‍यांनी सोमवार (दि. 11) पासून लावणीला सुरुवात केली आहे. मुरुडमध्ये आतापर्यंत सरासरी 1089  मिमी.पावसाची नोंद झाली आहे. मुरूड तालुक्यातील 3900 हेक्टर क्षेत्रावर …

Read More »

पाल्हे पुलावर धोकादायक खड्डे

रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील नागाव बायपास रस्त्यावरील    पाल्हे पुलावर व परिसरात मोठमोठे  खड्डे पडले असून, मात्र तेथून बिनधोकपणे वाहतूक सुरू आहे. अलिबाग-रेवदंडा मार्गावरील नागाव बायपास रस्त्यावर पाल्हे गावाजवळ पूल आहे. हा पूल कमकुवत असल्याचा फलक सार्वजनिक बांधकाम खात्याने लावला आहे. ऐन पावसाळ्यात या पुलावर आणि पुलाच्या दोन्हीबाजूकडील रस्त्यावर मोठमोठ …

Read More »

चौकमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

चौक : रामप्रहर वृत्त विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील प्राथमिक विद्यामंदिर व शिशूमंदिर शाळेमध्ये शनिवारी (दि. 9) आषाढी एकादशी कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री देवानंद कांबळे यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाशजी देशमुख यांनी वारीची परंपरा सांगितली. या वेळी सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिरच्या …

Read More »

कर्जतमध्ये एनएमएनटीच्या बसेस थांबतात रस्त्यावर

कर्जत : बातमीदार एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरु असताना प्रवाशांच्या सेवेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने आपली परिवहन सेवा (एनएमएनटी) कर्जतपर्यंत सुरू केली. मात्र एनएमएनटीच्या बसेस उभ्या करण्यासाठी त्यांना कर्जतमध्ये हक्काची जागा (स्थानक) नाही. परिणामी त्या बसेस एसटी आगाराबाहेर रस्त्यावर थांबत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे. कोरोना काळात कर्मचार्‍यांनी संप केल्याने कर्जत …

Read More »