मुरूडमधील आदिवासी महिलांचे तहसीलदारांना निवेदन मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत बेलीवाडी आदिवासी भागात गावठी दारूचे धंदे तेजीत असून त्याचा नाहक त्रास तेथील आदिवासी महिलांना सहन करावा लागत आहे. घरातील कर्ते पुरुष दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले असल्याने दारूचे धंदे बंद करावेत, अशी मागणी बेलीवाडी परिसरातील महिलांनी निवेदनाद्वारे तहसीलदार …
Read More »Monthly Archives: July 2022
राष्ट्रपतींचा अपमान ः काँग्रेसविरोधात भाजप आक्रमक
देशाची माफी मागून प्रायश्चित्त घ्या -अश्विनी पाटील पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी अत्यंत असंस्कृत आणि असभ्य टिप्पणी करून काँग्रेसच्या हीन संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. चौधरी यांच्या या वक्तव्यास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रोत्साहन दिल्याने देशातील महिलांचा, समृद्ध परंपरा …
Read More »सिकेटी महाविद्यालयात महाआरोग्य शिबिराला प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात (सिकेटी) मेडिकव्हर हॉस्पिटल, भारतीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांच्या हस्ते झाले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू …
Read More »शिंदे समर्थक रुपेश पाटील यांच्या कार्यालयावर हल्ला
उरण ः रामप्रहर वृत्त आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला झटका दिल्याचा राग मनात धरून अज्ञातांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थक रुपेश पाटील यांच्या उरण येथील कार्यालयावर भ्याड हल्ला करीत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला व ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिवसेनेचे खासदार, आमदार, …
Read More »मच्छिमार बोटींवर खलाशांची लगबग
करंजा-मोरा-कसारा ससून डॉक बंदरात सज्ज होतायेत बोटी उरण : प्रतिनिधी शासनाच्या खोल समुद्रातील 60 दिवसांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या आदेशानंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. आता अवघ्या दोन दिवसांचाच अवधी उरल्याने मासेमारीच्या पूर्वतयारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससून डॉक बंदरात मच्छिमारांची लगबग सुरू झाली आहे. खोल समुद्रातील मासेमारी 50 ते 60 वाव खोलीपर्यंत …
Read More »पालीत भव्य हिंदू जनजागृती रॅली
तहसीलदारांना मागणीचे निवेदन पाली : प्रतिनिधी समस्त सुधागडमधील हिंदू बांधवांच्या वतीने शुक्रवारी (दि. 29) पालीमध्ये हिंदू जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय शिवाजी जय भवानी या घोषणांनी पाली शहर दणाणून निघाले. या रॅलीत सुधागडसह पेण, रोहा तालुक्यातील हिंदू बांधव, विशेषतः युवक मोठ्या …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर मिनीबस घसरली
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील खालापूरजवळ हॉटेल रिंकीसमोर गोरेगाव मुंबई येथून लोणावळा येथे वर्षा सहलीसाठी जाणारी मिनीबस घसरून पलटी झाली. शुक्रवारी (दि. 29) संध्याकाळी झालेल्या या अपघातात मिनीबसमधील बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. वर्षा सहलीसाठी पर्यटकांना घेऊन मिनीबस गोरेगाव मुंबई येथून …
Read More »स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत पतसंस्थांच्या वसुली अधिकार्यांचे आदर्शमध्ये प्रशिक्षण शिबिर
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडेरेशन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-रायगड आणि आदर्श नागरी सहकारी पतसंस्था-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे बुधवारी (दि. 27 ) जिल्ह्यातील पतसंस्थांमधील वसुली अधिकार्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत अलिबागमधील आदर्श भवनामघ्ये बुधवारी घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्ह्यातील …
Read More »जागतिक शोतोकॉन स्पर्धेसाठी पनवेलच्या उर्वी जोशीची निवड
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये राहाणारी उर्वी विनायक जोशी हिची 1 ते 7 ऑगस्टदरम्यान जपानच्या टोकियो शहरात होणार्या 15व्या जागतिक शोतोकान स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल बावन बंगलो चेअरमन राहुल नाईक यांनी उर्वीचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. टोकियोत होणार्या जागतिक शोतोकान स्पर्धेत उर्वी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. …
Read More »‘सीकेटी’त इन्वेस्टिचर समारंभ उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यमात इन्वेस्टिचर समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय हॅण्डबॉल खेळाडू तथा मुंबई युनिर्व्हसिटी विमेन्स हॅण्डबॉल कोच आणि एक उत्कृष्ट स्कूबा डायव्हर असलेले राजेंद्र सिंग आणि विद्यालयाची माजी विद्यार्थिनी तथा उत्कृष्ट …
Read More »