Breaking News

Monthly Archives: July 2022

दिव्या ठाकूरचे मॅरेथॉन स्पर्धेत यश

उरण ः वार्ताहर जेएनपीए येथील सेंट मेरी स्कूलमधील विद्यार्थीनी दिव्या महेंद्र ठाकूर हिने नवीन पनवेल येथे आयोजित मॅरेथॉनमधे दुसरा क्रमांक तसेच पुणे मॅरेथॉनमधे चौथा क्रमांक मिळविला. याबद्दल सेंट मेरी स्कूलचे प्रिन्सिपल राजेश अल्फान्सो, क्रीडा शिक्षक हरिश्चंद्र धोंडकर, लुक्की स्पोर्ट्स अकादमीचे लक्ष्मण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन दिव्या ठाकूर हिचे कौतुक केले. …

Read More »

फूटबॉल स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश

खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील कर्नाळा क्रीडा अकादमीत झालेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन 17 वर्षाखालील वयोगटात व्दितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विद्यार्थिनींचे …

Read More »

उल्हास नदीवरील दहिवली पुलाला भगदाड

कर्जत : बातमीदार तालुक्यातील उल्हास नदीवरील दहिवली-मालेगाव पुलावर गुरुवारी (दि. 28) रात्री मोठे भगदाड पडले असून, त्यामुळे पुलावरून मोठी गाडी जाण्यास अडथळे येत आहेत. या खड्ड्यात झाडाच्या फांद्या तोडून उभ्या केल्या आहेत. नेरळ-कळंब राज्यमार्गावरील दहिवली-मालेगाव येथे उल्हास नदीवर 1970च्या दशकात हा पूल बांधण्यात आला. कमी उंचीच्या आणि 150 मीटर लांब …

Read More »

आषाणे धबधबा ठरतोय गर्दीचे केंद्र

कर्जत : बातमीदार तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आषाणे येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. हा धबधबा पावसाळ्यातील चार महिन्यात लाखो पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरतो. त्याबरोबरच हा धबधबा अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधनही ठरला आहे. कर्जत-कल्याण रस्त्यावर आषाणे गावाच्यामागील बाजूस असलेल्या डोंगरावरून उडणारे पाण्याचे तुषार  झेलण्यासाठी पर्यटक वर्षा सहलीच्या …

Read More »

नेरळमध्ये 101वे नेत्रचिकित्सा शिबिर

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व कांदळगावकर दाम्पत्याचा उपक्रम कर्जत : बातमीदार पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नेरळ येथील नितीन कांदळगावकर, नम्रता कांदळगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ येथील जेनी टूलीप शाळेत नुकताच 101वे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 80रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली, त्यापैकी मोतीबिंदू दोष आढळल्याने …

Read More »

कारगिल युद्धातील जवानांनी खोपोलीत दिला रोमहर्षक आठवणींना उजाळा

खोपोली : प्रतिनिधी माजी सैनिक सेवा संघटना-खोपोली आणि सैनिक फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कारगील विजय दिनानिमित्त येथील माध्यमिक शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय स्थलसेना, वायुसेना व नौसेना दलातील माजी सैनिकांनी भारत-पाक युद्धातील साहसी, थरार अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अमर जवान ज्योत प्रज्वलित करून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पूर्व वायुसेना …

Read More »

जि.प. आरक्षणात प्रस्थापितांना धक्का

अलिबाग : प्रतिनिधी आगामी निवडणुकांकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या जागांसाठी गुरुवारी (दि. 28)आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनेकांनी पूर्वतयारी केली होती, परंतु आरक्षणामुळे त्यांच्या पदरी नाराजी पडली आहे. अनेकांचे मतदार संघ राखीव झाल्याने त्यांना पर्यायी मतदार संघ शोधावा लागणार आहे. जिल्हा परिषदेचे …

Read More »

सुधागड तालुक्यातील आरोग्य सेवा सलाईनवर

रायगड़ जिल्ह्यातील  सुधागड़ तालुक्यात गोरगरीब सर्वसामान्य  रुग्ण, नागरिक व गर्भवती महिलांना आधार असलेल्या आरोग्य केंद्राला घरघर लागली आहे. या ठिकाणची आरोग्य सेवा सलाईनवर असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होताहेत.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत, साथीचे आजार उद्भवत आहेत. गोरगरीब जनतेची मदार ज्या आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांच्यावर आहे, तेथे आज महत्त्वाची पदे …

Read More »

ही गुर्मी येते कुठून?

गेल्या आठ वर्षांत इतके फटके खाऊनदेखील काँग्रेसजनांना अजुन शहाणपण येत नाही, याला काय म्हणावे? राष्ट्रपतींच्या अपमानावरून देशभर संतापाची लाट उसळूनही अधीर रंजन चौधरी आणि श्रीमती सोनिया गांधी यांनी संसदेची माफी मागितली नाही. जनतेने वारंवार लाथाडूनही या पक्षाच्या नेत्यांमधील उर्मटपणा काही कमी होताना दिसत नाही असे वारंवार घडताना दिसते. काल-परवापर्यंत महागाई …

Read More »

माणगावात एकाचा तलावात बुडून मृत्यू

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील मांजुरणे गावातील एका 38 वर्षीय व्यक्तीचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 27) सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती संदीप जनार्दन रणपिसे रा. मांजुरणे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. दिलीप जनार्दन रणपिसे (वय 38) हा मंगळवारी (दि. 26) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास …

Read More »