Breaking News

Yearly Archives: 2022

रानसई आदिवासीवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

उरण : बातमीदार उरण तालुक्यातील रानसई वाडीतील रा.जि.प.शाळा रानसई आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते चौथी मुला-मुलींना शालेय वस्तूंचे वाटप व खोपटे (बांधपाडा) गावातील विद्यार्थ्यांना आयडी कार्डचे वाटप सुधाकर केशव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. सुधाकर ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त राबविलेल्या या उपक्रमात त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारती ठाकूर, निकिता तेजस …

Read More »

ब्यूटिफुल मॉलतर्फे मेडिकल कॅम्प

पनवेल : वार्ताहर ब्यूटिफुल मॉलतर्फे पनवेलमध्ये मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जवळपास 110 स्टाफचा मेडिकल हेल्थ चेकअप करण्यात आले. याच्यामध्ये ईसीजी सोनोग्राफी, एक्स-रे, ब्लड ग्रुप यासह अनेक प्रकारे तपासणी करण्यात आली. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी सुदृढ राहिले पाहिजे. आपले शरीर चांगले असेल तर आपण कोणतेही काम वेळेत करू …

Read More »

नेरेपाड्यात शैक्षणिक साहित्याचे वाटप

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, नेरेपाडा येथे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. आजही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंची गरज आहे, त्या अनुषंगाने विहीघर येथील मरीआई हॉटेलचे प्रोप्रायटर सुजित सुरेश फडके यांनी नेरे पाडा येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, चॉकलेटचे वाटप केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक …

Read More »

करावे गावचा लवकरच होणार सर्वांगीण विकास

भाजप नेते विनोद म्हात्रेंच्या प्रयत्नाने भूखंडांवर आरक्षण नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा कार्यान्वित होण्यास 27 वर्षानंतर मुहूर्त मिळाला आहे. मनपाची पहिली विकास योजना  प्रशासनाने 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केली. यात नवी मुंबई मनपा क्षेत्रात 625 आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. नवी मुंबईतील संगीतप्रेमी व उच्च …

Read More »

पोलादपूर चोळई येथे चोरी; दुचाकी, मोबाइलसह रोख रक्कम लंपास

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील चोळई येथे सोमवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास एका घराबाहेरील दुचाकी, घरातील मोबाइल व रोख रक्कम तसेच बॅकेचे पासबुक, आधार कार्ड आदी कागदपत्रांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलादपूर तालुक्यातील चोळई येथील बांधकाम व्यवसायीक रोहिदास सदाशिव मोहिते यांच्या घरासमोरील हिरो होण्डा पॅशन …

Read More »

आदिवासींना विजेच्या मीटरची जोडणी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तविंधणे कातकरीवाडीमध्ये उपक्रम उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील विंधणे कातकरीवाडी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी (दि. 29) तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते विजेच्या मीटरचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील कातकरी उत्थान अभियानाच्या सप्तसुत्री उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्या …

Read More »

माणगावातील शिक्षक कॉलनीत घरफोडी

सोन्याचे मंगळसूत्र घेऊन अज्ञात चोरटा फरार माणगाव : प्रतिनिधी माणगाव दत्तनगर भागातील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोमवारी (दि. 29) सायंकाळी घरातील 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून पोबारा केला. विश्वनाथ हुल्लनाईक तालिमकर (वय 52, रा. शिक्षक कॉलनी, दत्तनगर, माणगाव) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा सोमवारी सायंकाळी …

Read More »

माणगावात एसटी चालक, वाहकावर गुन्हा

  माणगाव : प्रतिनिधी कर्तव्यावर असताना सोमवारी (दि.29) सकाळी अंमली पदार्थाचे सेवन केल्याने तसेच शासकीय पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एसटी चालक व वाहकावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एसटी बस (एमएच-13,सीयू-8185) चा  चालक  ज्ञानेश्वर अशोक कापडी (वय 31, सध्या रा. भिवंडी, …

Read More »

सागवानी दरवाजांमुळे कुलाबा किल्ल्याच्या सौंदर्यात भर

अलिबाग : प्रतिनिधी मराठा आरमाराचे केंद्र राहिलेल्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याला दोन सागवानी दरवाजे बसवण्यात आले आहेत. खार्‍या पाण्यापासून हे दरवाजे सुरक्षीत रहावेत म्हणून यावर विशेष लेप लावण्यात आला असून या दरवाजांना ऐतिहासीक रुप देताना टोकदार खिळे, लोखंडी पट्ट्यासह चार इंचाच्या सागवानी मजबूत पट्ट्या लावण्यात आल्या आहेत. भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून …

Read More »

प्रेम प्रकरणात तरुणाने स्वतःला घेतले पेटवून

नागोठणे, पाली : प्रतिनिधी नागोठणे जवळील आंबेघर येथील प्रणय केशव बडे (वय 27) या तरुणाने सोमवारी (दि. 29) संध्याकाळी स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना पालीमध्ये घडली आहे. त्यात तो 90 टक्के भाजल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. प्रणय याचे पाली येथील प्रिती (वय 26, नाव बदलले आहे) सोबत पाच वर्षापासून प्रेम …

Read More »