Breaking News

Yearly Archives: 2022

आमदार महेश बालदी यांच्या मध्यस्थीने चौक गावातील अंतर्गत रस्त्याचे काम मार्गी

चौक ः रामप्रहर वृत्त चौक गाव बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम येथील ग्रामस्थांनी थांबविले होते. गटारांचे काम केल्यानंतरच रस्त्याचे बांधकाम करा, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने आमदार महेश बालदी यांनी येथे सोमवारी (दि. 2) भेट घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. नियोजित काम पूर्ण करून पुढील वेळी आमदार निधीतून किंवा अन्य निधीतून सहाय्य …

Read More »

रायगड पोलिसांची सायबर साक्षर सुरक्षित गाव मोहीम पोहचली म्हसळा तालुक्यात; खरसई गावाची केली निवड

म्हसळा : प्रतिनिधी सायबर फसवणुकीबाबत सर्वांना जागरूक करण्यासाठी रायगड पोलीस दालातर्फे जिल्ह्यांतील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायबर साक्षर सुरक्षित गाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी तालुक्यातील खरसई गावाची निवड केली असल्याची माहिती म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक उध्दव सुर्वे यांनी दिली.घरफोडी आणि लुटमारीपेक्षा दरवर्षी सायबर फसवणुकीच्या घटना जास्त होत …

Read More »

लाकडाची अनधिकृत वाहतूक रोखली

महाड वन विभागाची कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल महाड : प्रतिनिधी बेकायदेशीर वृक्षतोड करुन लाकडाची अनधिकृत वाहतूक करणारी गाडी महाड वन विभागाने ताब्यात घेतली असून या प्रकरणी वाहतूक करणारा ट्रक आणि लाकडे  जप्त करण्यात आली आहेत. गुप्त माहितीनुसार आकेशिया जातीची वृक्षाची विनापरवाना तोड करून अनधिकृतपणे वाहतूक करणारा ट्रक (केए-56, 0622) वन विभागाच्या …

Read More »

ईद मुबारक!

इस्लामी शाबान महिन्यानंतर रमजान महिन्याला प्रारंभ होतो. हा महिना इस्लाम धर्मियांत अत्यंत पवित्र महिना समजला जातो. यावर्षी 2 एप्रिल रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर रमजान महिन्याला सुरुवात होऊन दि.3 एप्रिलपासून पवित्र रमजान महिन्याचे रोजे (उपवास) सुरु झाले. गेली दोन वर्षे रमजान महिन्यात कोरोना महामारीचे संकट असल्याने कोविड नियमांचे पालन करीत मुस्लिम …

Read More »

पोर्तुगीज राजवटीतील कोर्लईचे माऊंट कार्मेल चर्च

प्राचीन काळात व्यापारी बंदर म्हणून प्रसिध्दीस असलेल्या चौलमध्ये पोर्तुगिजांनी सन 1505 मध्ये व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश केला. चौल व रेवदंडासह कोर्लई या भागावर  पोर्तुगिजांचे वर्चस्व होते. कोर्लई किल्ला निजामाच्या ताब्यातून हिसकावून घेत सन 1594 मध्ये कोर्लई किल्ला काबीज केला. कुंडलिका समुद्र खाडीत प्रवेश करणार्‍या जहाजावर लक्ष्य ठेवणे कोर्लईच्या टेकडी किल्लावरून सोपे …

Read More »

तोफा धडाडल्या!

राज्यात सध्या उष्णतेचा पारा चढत असताना राजकीय वातावरणही तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत चलो अयोध्याचा नारा दिला आहे. त्यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत भोंग्यांच्या विषयाचा पुनरूच्चार केला, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजधानी मुंबईतील सभेत बाबरी मशीद पतनावरून सत्ताधारी शिवसेनेवर शरसंधान …

Read More »

झिराड येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दिवलांग, पनवेल, नांदईचा पाडा संघ विजेते

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील झिराड येथील साई क्रीडा मंडळ, महिला मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय  कबड्डी स्पर्धेत पुरुष खुल्या गटात श्री गणेश दिवलांग, तर महिलांमध्ये पनवेल संघाने विजेतेपद मिळवले. पंचक्रोशी गटात नांदई देवी नांदईचा पाडा हा संघ विजेता ठरला. खुल्या गटात अमिर धुमाळ, महिलांमध्ये रचना म्हात्रे, पंचक्रोशी गटात तुषार पाटील …

Read More »

आगरदांडा संघाने भंडारी चषक जिंकला

मुरूड : प्रतिनिधी 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुरूड तालुक्यातील ग्रामस्थ डोंगरी सुभा संस्था आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात आगरदांड्याच्या जय बापदेव संघाने खारीकवाड्याच्या वादळ संघाचा पराभव करीत मानाचा भंडारी चषक जिंकला. जय हनुमान खार आंबोली संघाने तृतीय, तर जय हनुमान डोंगरी संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविला. विजेत्या …

Read More »

महाराष्ट्र दिन उत्साहात; पनवेल मनपातर्फे ध्वजारोहण सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम तसेच ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन सर्व शासकीय कार्यालयांत रविवारी (दि. 1) करण्यात आले होते. पनवेल महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानात ध्वजारोहणाचा सोहळा झाला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण सोहळ्याला उपमहापौर …

Read More »

पनवेल ः मिलिंद राणे यांनी खांदा कॉलनीतील तीर्थराज सोयायटीमध्ये अथर्व ट्रॅव्हल्स हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही या ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी उपमहापौर …

Read More »