खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस खारघर मंडलच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन खारघर शहर उपाध्यक्ष रमेश खडकर यांच्या निवासस्थानी खारघरच्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऐकले. या वेळही खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर, …
Read More »Yearly Archives: 2022
वेअर हाउसमधील माल चोरणारे जेरबंद
लाखोंचा माल पोलिसांनी केला हस्तगत पनवेल : वार्ताहर उरण व कळंबोली येथील वेअर हाउसचे शटर उचकटुन घरफोडी करुन माल घेवुन जाणार्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना गोधा, गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा 35,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल यांनी …
Read More »भूखंडाचे श्रीखंड
संजय राऊत यांना तपासयंत्रणांबाबत संशय असेल तर त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावावेत आणि आपले निर्दोषत्व सिद्ध करावे. कर नाही त्याला डर कशाला? परंतु न्यायालयाचा मार्ग न निवडता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेण्यापलीकडे राऊत आणि महाविकास आघाडीचे नेते फारसे काही करताना दिसत नाहीत. नुकताच गुढीपाडवा होऊन गेला असल्यामुळे श्रीखंडाची थोडीफार चव …
Read More »भिवंडीवाला ट्रस्ट जमीन गैरव्यवहाराचे वृत्त निराधार
आमदार महेश बालदी यांनी नतद्रष्टांचा घेतला समाचार उरण : रामप्रहर वृत्त भिवंडीवाला ट्रस्ट जमीन गैरव्यवहार अशा आशयाचे वृत्त दै. सामना आणि एका स्थानिक वर्तमानपत्राने मंगळवारच्या (दि. 5) अंकात प्रसिद्ध केले आहे, मात्र हे वृत्त पूर्णत: निराधार असून उरण विधानसभा मतदारसंघात होत असलेला विकास पाहून माझी बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेलमध्ये जलवाहिनीचे उद्घाटन
नगरसेविका सुशीला घरत यांच्या स्वखर्चातून सुविधा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमार्फत विकासाची अनेक कामे प्रभागांमध्ये सुरू आहेत. त्यालाच अनुसरून प्रभाग समिती ‘ड’च्या माजी सभापती तथा विद्यमान नगरसेविका सुशीला घरत यांनी स्वखर्चातून नवीन पनवेलच्या ए टाईपमधील चाळींमध्ये पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बसवून दिली आहे. या पाइपलाइनचे …
Read More »टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची टार्गेट ऑफ ऑलिम्पिक पोडियम अंतर्गत निवड
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक होणार असून त्यासाठी भारतातून प्रतिभावंत खेळाडूंची निवड होणार आहे. त्यानुसार भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर स्पोर्ट्सच्या वतीने टार्गेट ऑफ ऑलिम्पिक पोडियम अंतर्गत डेव्हलोपमेंट स्कीम आणि कोड ग्रुप स्कीमसाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची विद्यार्थिनी टेबल टेनिस …
Read More »मुरूडमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेच लोकार्पण
मुरूड : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गोरगरीब लोकांसाठी अनेक योजना राबवित आहे. भाजपमधील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकार्याने या सरकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत. मग यातून आपला पक्षही मजबूत होईल, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 5) मुरूड येथे केले. …
Read More »व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यास आलेली टोळी गजाआड
पेण पोलिसांकडून पाच आरोपींना अटक पेण : प्रतिनिधी व्हेल माशाच्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या उलटीची विक्री करण्यासाठी पेणमध्ये आलेल्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणी पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. व्हेल माशाच्या उलटीची विक्री पेण येथे होणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. …
Read More »आदिवासी महिलांसाठी ‘होपमिरर’चा प्रकल्प
महिलांना दिले जातेय विविध व्यवसायांचे प्रशिक्षण खारघर : रामप्रहर वृत्त होपमिरर फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी होपमिररच्या टीमने खारघर शहराजवळ असलेल्या दोन आदिवासी वाडी घोलवाडी आणि आंबावाडी यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये येथील महिला वर्गाला आर्थिकदृष्ट्या …
Read More »उरण नगर परिषद ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू
उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी उरणमध्ये तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या प्रत्यक्षकृती दर्शक सहभागामुळे नगरपरिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात गरूडझेप स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. या अभ्यासिकेचे उद्घाटन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी मार्गदर्शन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper