Breaking News

Monthly Archives: October 2023

सातार्‍यातील पवारवाडी शाळेत ‘रयत’चा वर्धापन दिन साजरा

सातारा : रामप्रहर वृत्त ज्या ज्या गावांना डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पाय लागले त्या गावांचा उद्धार झाला, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. सातारा जिल्ह्यातील पवारवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित संस्थेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. रयत शिक्षण …

Read More »

महाडच्या प्रसोल कारखान्यात पुन्हा वायूगळती; एक ठार, चार कामगार जखमी

महाड : प्रतिनिधी महाड एमआयडीसीमधील प्रसोल या रासायनिक कारखान्यात गुरुवारी (दि. 5) सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास वायुगळती होऊन एका कामगाराचा मृत्यू आणि चार कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांवर महाडमधील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातील एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात …

Read More »

शिवशौर्य यात्रेचे पनवेलमध्ये भाजपकडून जोरदार स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवराज्याभिषेकाचे 350वे वर्ष व विश्व हिंदू परिषद षष्टीपूर्तीनिमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पनवेल प्रखंडच्या साथीने आयोजित करण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रेचे पनवेलमध्ये भाजपच्या वतीने पुष्पवृष्टी, वाद्यांच्या गजरात आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 5) जोरदार स्वागत करण्यात आले. या यात्रेची सुरुवात सिंधुदुर्ग येथून …

Read More »

वैद्यकीय प्रवेश मिळवून देतो सांगून फसवणूक चौघांना पश्चिम बंगालमधून अटक; तिघांचा शोध सुरूच

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग येथील जिल्हा वैद्यकीय महाविद्यालात प्रवेश मिळवून देतो म्हणून सांगून 32 लाख रुपयांना गंडा घालणार्‍या टोळीतील चार जणांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे, तसेच त्यांच्याकडून 20 लाख रू. रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वषण शाखेने ही कामगिरी केली. सौरभ सौम्य …

Read More »

पनवेल महापालिकेची अल्पावधीतच विकासकामांत भरारी

आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आणि सहकार्‍यांची सकारात्मक भूमिका ठरली उपयुक्त पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेची सन 2016 साली स्थापन झाली. पालिकेने अल्पावधीतच विकासकामांच्या दृष्टिकोनातून भरारी घेतली. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आणि सहकार्‍यांची सकारात्मक भूमिका उपयुक्त ठरली आहे. आरोग्य, शिक्षण, आणि पायाभूत सुविधा महत्त्वाच्या मानून आमदार …

Read More »

दुर्दैवाचा घाला

नांदेड येथील सरकारी रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी निश्चितच धक्कादायक आहे. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी ठाण्यानजीकच्या छत्रपती शिवाजी सरकारी इस्पितळामध्ये एका रात्रीत 18 रुग्ण दगावले होते. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर पडणारे हे दुर्दैवाचे घाले तातडीने थांबायला हवेत यात शंकाच नाही. इस्पितळामधील हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याची चौकशी …

Read More »

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पनवेल विकास विशेष अंकाचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदी विवेक मासिकाच्या पनवेल विकास विशेष या अंकाचे प्रकाशन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी येथे करण्यात आले. पनवेल मार्केट यार्ड येधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, …

Read More »

हरिग्रामच्या शेकाप सरपंच निर्मला वाघमारे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला असून हरिग्राम ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मला रामदास वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसह मंगळवारी (दि. 3) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

मिशन मोडवर काम करा -मंत्री रवींद्र चव्हाण

उत्तर रायगड जिल्हा भाजपची कार्यसमिती बैठक उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त प्रत्येक राजकीय लढाई जिंकायची आहे आणि ती जिंकण्यासाठी ताकदीने उतरायचे आहे. विजय एवढा मोठा असला पाहिजे की विरोधकाला हिंमत होता कामा नाही, त्यासाठी मिशन मोडवर काम करा, अशी सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. 2) येथे …

Read More »

पनवेलमध्ये स्वच्छता मोहीम; आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वच्छतेला प्राधान्य देणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पनवेल परिसरातही रविवारी (दि. 1) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः हाती झाडू घेऊन पनवेल शहरातील कृष्णाळे तलाव येथे या मोहिमेत सहभाग घेतला. महापालिका तसेच भाजपच्या वतीने एक तारीख एक तास …

Read More »