Breaking News

Monthly Archives: October 2023

सत्य लवकर बाहेर यावे

रुग्णालय प्रशासन व तुरुंगातील सदोष यंत्रणा तसेच या सार्‍याचा प्रशासकीय यंत्रणेकडून होणारा गैरवापर ही गुन्हेगारीशी संबंधित चित्रपटांत दर्शवली जाणारी स्थिती वास्तवातही असल्याचे ललित पाटील प्रकरणात दिसते. सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे अलीकडच्या काळात मुंबई-पुण्यासारख्या शहरांत महाविद्यालयांच्या परिसरात व उच्चभ्रू समाजात ड्रग्जचा अगदी सुळसुळाट झाल्याचे सगळीकडेच बोलले जात होते. त्यापाठोपाठच हे अवघे …

Read More »

स्वच्छ हवा दुरापास्त

गेली काही वर्षे ऑक्टोबर ते जानेवारी या काळात देशातील नवी दिल्ली, मुंबई व कोलकाता या शहरांमधील हवेच्या दर्जाने अतिधोकादायक पातळी गाठणे नित्याचे झाले आहे. परिस्थिती बिकट होताच तातडीची उपाययोजना अवश्य केली जाते, परंतु अशी परिस्थिती ओढवूच नये या दिशेने मात्र फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. यापैकी वाहनप्रदूषणाच्या विरोधातील उपाययोजना जनतेच्या …

Read More »

व्यापक चर्चा आवश्यक

समलिंगी संबंध ही केवळ शहरी अभिजनांमधील संकल्पना आहे याबद्दल घटनापीठाने असहमती दर्शवली असली तरी आजच्या घडीला तरी बहुसंख्य भारतीयांना हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा वाटतो. घटनापीठातील पाच न्यायाधीशांनी यासंदर्भात चार वेगवेगळी निकालपत्रे दिली यावरून या विषयासंदर्भातील विभिन्न बाबींविषयी समाजातही केवढी मतभिन्नता असावी याचा प्रत्यय येतो. विशेष विवाह कायद्यांंतर्गत समलिंगी विवाहांना कायदेशीर …

Read More »

रायगडात भाजप महायुतीचा खासदार निवडून येईल -प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

अलिबाग ः प्रतिनिधी भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून जनतेकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 45 खासदार भाजप महायुतीचे निवडून येतील. रायगड लोकसभा मतदारसंघातूनदेखील भाजप महायुतीचाच खासदार निवडून येईल, असा विश्वास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपतर्फे महाविजय 2024 अंतर्गत अलिबाग येथे …

Read More »

राजकारणाचाच शाप

काही भीषण अपघातांमुळे लोकांच्या मनात समृद्धी महामार्गाविषयी गैरसमज निर्माण झाले असून विरोधकांनी केलेली बेजबाबदार विधाने त्यात भरच घालू शकतात. प्रत्यक्षात या महामार्गावरून प्रवास करण्याचा अनुभव घेतलेले लोक मात्र समृद्धी महामार्गावरील प्रवास सुखकर असल्याचेच सांगतात. महामार्गाच्या बांधणीत कुठलाही दोष नसून महामार्ग गुणवत्तापूर्ण असल्याची ग्वाही तज्ज्ञ जाणकारांनीही यापूर्वीच दिली आहे. आपल्या वाहनाचा …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या वेळेत वाढ

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे दोन हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि दोन हजार 950 सदस्यपदांच्या, तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 …

Read More »

सेंट्रल पार्क नावामध्ये ’मुर्बी’ गावाचा उल्लेख करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे तातडीने कार्यवाहीची पुनर्मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वे उन्नत मार्गावरील ’सेंट्रल पार्क स्थानक’ या नावामध्ये ’मुर्बी’ गावाचा उल्लेख करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 16) सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची …

Read More »

शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उलवे नोडमध्ये देवीचे पूजन उलवे नोड ः रामप्रहर वृत्त भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार (दि. 15)पासून सुरुवात झाली आहे. उलवे नोड खारकोपर येथे जय बजरंग कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळांच्या वतीनेही नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणच्या देवीचे पूजन माजी खासदार लोकनेते …

Read More »

पनवेलमधील दुंदरे, रिटघर, शिवणसईतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामध्ये ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली आहे. दुंदरे ग्रामपंचायत हद्दीतील दुंदरेसह रिटघर, शिवणसई येथील शेकाप कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. भाजप पनवेल तालुका व शहर …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी विवेक पाटलांची 152 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी बँक घोटाळाप्रकरणी तुरूंगात असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या सुमारे 152 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) टाच आणली आहे. त्यामुळे विवेक पाटलांना आणखी एक दणका बसला आहे. कर्नाळा बँकेत तब्बल 540 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. या …

Read More »