अलिबाग : प्रकाश सोनवडेकर यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात 98 हजार 36 हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे, तर तीन हजार 37 हेक्टरवर नाचणीची लागवड केली जाणार आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हा नियेाजन भवन येथे झाली. त्या वेळी ही …
Read More »Yearly Archives: 2023
फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची संख्या वाढली
मुरूड : संजय करडे सध्या वातावरणात मोठा बदल झाला असून उन्हाची तीव्र किरणे जमिनीवर पडू लागल्याने भूतलावरील तापमानात मोठी वाढ झाली आहे. एप्रिल-मे महिन्यात तापमान सध्या 36 अंश सेल्सियसपेक्षा जास्त झाल्याने लोकांना घामाच्या धारा लागल्या आहेत. अशा कडक उन्हात वन्यजीवांनाही मुबलक पाणी मिळावे यासाठी फणसाड अभयारण्य प्रशासनाने विविध उपाययोजना करून …
Read More »थेरोंडा खंडोबा मंंदिरातील चांदीच्या मूर्तीवर चोरट्यांचा डल्ला
रेवदंडा ः प्रतिनिधी थेरोंडा खंडेरावपाड्यातील भरवस्तीत असलेल्या खंडोबा मंदिरातील पाच किलो 360 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्ती अज्ञात चोरट्याने बुधवारी (दि. 17) रात्रीचे वेळी लंपास केल्या. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाणे येथे अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी पहाटे पूजाअर्चा करण्यास गेलेल्या ग्रामस्थांच्या …
Read More »युवा वॉरियर्स कबड्डी लीगचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा वॉरियर्स कबड्डी लीग स्पर्धेच्या निमित्ताने जपान विरुद्ध पनवेल असा प्रेक्षणीय सामना रसिकांना अनुभवयास मिळाला. समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता …
Read More »कामोठे येथील बांगलादेशींवर कारवाई
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील एका चाळीत बेकायदेशीर वास्तव्य करणार्या आठ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चार महिला आणि चार पुरुषांचा समावेश असून ते 22 ते 48 वयोगटातील आरोपी आहेत. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केली आहे. इरशाद मुल्ली, जनुअल इस्लम, अनिउल आलम, कोकन शेख, पिंकी …
Read More »पावसाळ्यापूर्वी खवय्यांचा सुकी मच्छी खरेदीकडे कल
पनवेल : वार्ताहर पावसाळ्यापूर्वी खवय्यांचा सुकी मच्छी खरेदी करण्याकडे कल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यासाठी सुकी मच्छी साठवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. प्रजनन काळात ओल्या मच्छीला बंदी असते अशावेळी ओली मच्छी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मांसाहारी वर्ग …
Read More »केंद्र सरकारच्या उपक्रमासाठी नवी मुंबई सज्ज
थ्री आर संकल्पनेच्या कार्यवाहीला सुरुवात नवी मुंबई : बातमीदार केंद्र सरकारने ‘21 दिवस चॅलेंज’ हा अभिनव उपक्रम दि.15 मे ते 05 जून या कालावधीत राबविण्याचे जाहीर केले असून यामध्ये ‘थ्री आर’ ही मुख्य संकल्पना आहे. ‘थ्री आर’ अर्थात – कचरा कमी करणे (रेड्यूस), कचर्याचा पुनर्वापर करणे (रियूज) व कचर्यावर पुनर्प्रक्रिया …
Read More »मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध -केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला
उरण : रामप्रहर वृत्त आपल्या देशाला लांबच लांब समुद्रकिनारे लाभले आहेत. या सामुद्रिक संपत्तीवर उपजीविका करणार्या आमच्या मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासन कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री परषोत्तम रूपाला यांनी येथे दिली. सागर परिक्रमा कार्यक्रम 2023 अंतर्गत पाचव्या …
Read More »माणगावच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे राजेश मेहता
माणगाव : प्रतिनिधी येथील नगरपंचायत उपनगराध्यक्षपदाच्या बुधवारी (दि. 17) झालेल्या निवडणुकीत माणगाव विकास आघाडीतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेश गोकुळदास मेहता विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका हर्षदा सुमित काळे यांचा पराभव केला. उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल मेहता त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक …
Read More »नैना परिक्षेत्रातील शेतकर्यांच्या हितासाठी सकारात्मक भूमिका -पालकमंत्री उदय सामंत
पनवेल : रामप्रहर वृत्त नैना परिक्षेत्रातील शेतकर्यांच्या समस्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार प्रशांत ठाकूर व शिष्टमंडळाला दिले. नैना क्षेत्रातील शेतकर्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. त्या अनुषंगाने व त्यांच्या मागणीनुसार …
Read More »