Breaking News

संपादकीय

बहुजनांचा भरवसा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आणि अन्य सर्व समाजांचाही विचार केला जाईल याची खात्री बाळगावी, असा शब्द मुख्यमंत्र्यांनीही दिला आहे. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारच्या …

Read More »

हवा संवादाचा पूल

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सुरू केलेले सर्वेक्षण आणि विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत दिलेले आश्वासन लक्षात घेऊन मनोज जरांगे-पाटील यांनी दोन पावले माघार घ्यायला हवी होती. अशा प्रकारची माघार पराभव मानण्याचे कारण नसते, परंतु या सार्‍याचा कुठलाही विचार न करता जरांगे यांनी मराठा समाजाचा विशाल मोर्चा मुंबईच्या दारापर्यंत आणला आहे. मराठा …

Read More »

अवघा देश राममय

रामभक्तांची, कारसेवकांची गेल्या अनेक वर्षांची मेहनतरूपी तपश्चर्या आज फळाला येत आहे, कारण शरयू तिरी वसलेल्या अयोध्या नगरीत प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. प्रदीर्घ संघर्ष व लढ्यातून, त्यागातून, प्रतीक्षेतून आज हा सुवर्णाक्षरांत लिहून ठेवण्याचा दिवस उगवला आहे. यानिमित्ताने संपूर्ण भारतभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून सर्वजण रामनामात …

Read More »

अवघे विश्व राममय!

मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीत त्यांच्या जन्मस्थळी प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराची निर्मिती केली जाते आहे. जवळपास पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 22 जानेवारीला श्री रामप्रभू पुन्हा आपल्या जन्मस्थळाच्या गर्भगृहात विराजमान होतील. निश्चितपणे भारताच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण असून देशभरातीलच काय तर जगभरात पसरलेले भारतीय वंशाचे लोक तसेच अन्य …

Read More »

आता आठवली जनता?

स्वत:च केलेल्या राजकीय घोडचुकीची किंमत मोजायला लागल्यानंतर ठाकरे गटाला आता जनतेचे न्यायालय आठवले आहे. गेली दोनपेक्षा अधिक वर्षे जे कोर्टकज्जे करावे लागले, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्यांना कुणी विचारला तर त्याचे उत्तर त्यांना देता येणार नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात …

Read More »

विजय सत्याचाच

खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच ठरते असा ऐतिहासिक निकाल देत, शिंदे गटाने नेमलेले भरत गोगावले यांची प्रतोदपदी झालेली निवड विधानसभाध्यक्षांनी वैध ठरवली, तसेच शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही असा निर्वाळाही दिला. एकंदरीत सगळाच निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या वैधतेवर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे. ठाकरे गटाला हा …

Read More »

क्रिकेटचा खेळखंडोबा

केपटाऊनमध्ये गुरुवारी झालेल्या भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेट सामन्याचे धड ना कुणाला विश्लेषण करता आले, ना कुणाला अभिजात क्रिकेटचा आस्वाद घेता आला. पाच दिवसांची ही कसोटी लढत अवघ्या 642 चेंडूंमध्ये संपली. हा खेळपट्टीचा दोष मानायचा की खेळाडूंच्या बदलत चाललेल्या मानसिकतेचा याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. कुणी म्हणेल वर्षभर …

Read More »

आंदोलन नको, चर्चा हवी

दुरुस्तीनंतरच्या भारतीय न्यायसंहिता 2023 मध्ये हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी दोषी ठरलेल्या वाहनचालकांना सात लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याला आक्षेप घेत ट्रकचालक आणि वाहतूकदार संघटनांनी ठिकठिकाणी चक्काजाम केल्यामुळे पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होतो आहे. हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणांमधील दोषी ट्रकचालकांना कठोर शिक्षा …

Read More »

राजकीय युद्धाचे वर्ष

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. मावळत्या वर्षाने आपल्याला नेमके काय दिले याचा हिशेब घेण्याचे हे दिवस. तथापि, मावळत्या वर्षाचा हिशेब करण्यापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे ती येत्या वर्षातील सार्वत्रिक निवडणुकांची सज्जता. लोकसभेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांतच जाहीर होतील. पाठोपाठ विधानसभेसाठीही रणांगण गजबजू लागेल. मुंबई महापालिकेसह अनेक स्वराज्य …

Read More »

भीती नको, दक्षता हवी

जगभरात पुन्हा एकदा नव्या कोविड-19 विषाणू उपप्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. भारतही याला अपवाद नाही. कोविड-19च्या देशातील ताज्या केसेसची संख्या बुधवारी चार हजारांच्या वर पोहोचली. यात केरळमधील रुग्णसंख्या सर्वाधिक असून सुटीमुळे गोव्यात पर्यटकांची गर्दी झाल्यामुळे की काय, दिवसभरातील सर्वाधिक रुग्ण गोव्यात नोंदले गेले. या सर्व रुग्णांमध्ये कोविड-19चा नवा उपप्रकार जेएन.1 …

Read More »