पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणार्यांची संख्या अधिक नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात मागील काही दिवस सलग दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्यी ही कोरोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा देशभरात रोज आढळून येणार्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप …
Read More »नीरज चोप्राने इतिहास रचला!
भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकाविले टोकियो ः वृत्तसंस्था भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचत सुवर्णपदक पटकाविले. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. भारताने पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेच्याभालाफेक प्रकारात पदक जिंकले आहे. 23 वर्षीय नीरजने पहिली फेक 87.03 मीटर, दुसरी …
Read More »15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणार ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्या खेळाडूंना भेटणार आहेत. या कार्यक्रमात ऑलिम्पिक स्पर्धेत 130 कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणार्या 127 खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त हे सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. या संदर्भातील वृत्त …
Read More »खोटे बोलणारे सरकार
चंद्रकांत पाटील यांची ‘मविआ’वर हल्लाबोल पुणे : प्रतिनिधी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या नियुक्त्यांबाबत अद्याप राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या मुद्द्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोटे बोलणारे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार, असा हल्लाबोल केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या …
Read More »भारताची डिजिटल क्रांती; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई-रूपी’चा शुभारंभ
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतातील नवे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ई रूपी सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 2) शुभारंभ करण्यात आला. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने वित्तीय सेवा विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मदतीने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाऊचर आहे, जे डिजिटल पेमेंटचे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ई-रूपीचा होणार शुभारंभ
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था डिजिटल क्रांतीकडे आणखी एक पाऊल पुढे टाकत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 2) डिजिटल व्यवहारासाठी उपयोगी ठरणार्या ई-रूपीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली असून ई-रूपी आर्थिक व्यवहारासाठी कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे.
Read More »गणपतराव देशमुख पंचत्वात विलीन; सांगोला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सोलापूर ः प्रतिनिधी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री सोलापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. 31) सांगोला येथील शेतकरी सहकारी सुतगिरणी या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पुत्र पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, नातू डॉ. बाबासाहेब व …
Read More »कोरोना लढ्यासाठी केंद्राकडून राज्यांना आतापर्यंत 1827 कोटी; आरोग्यमंत्र्यांची माहिती
नवी दिल्ली ः प्रतिनिधी कोरोनाविरोधात लढ्यासाठी केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळून एकूण एक हजार 827 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. केंद्राकडून मंजूर केला गेलेला हा निधी इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स पॅकेजच्या 15 टक्के इतका आहे. आरोग्यमंत्री मांडवीय पुढे म्हणाले की, …
Read More »राष्ट्रभावना सदैव महत्त्वाची -पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आपण एक भारत, श्रेष्ठ भारताचे ध्वजवाहक असून आपल्या प्रत्येक कृतीमधून राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम ही भावना परावर्तीत झाली पाहिजे, असा बहुमोल सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकार्यांना दिला आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकार्यांशी …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतुक
नागपूर ः प्रतिनिधी येथील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 31) झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. या वेळी त्यांनी गडकरी यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. गडकरींचे कौतुक करताना ठाकरे म्हणाले की, स्वप्न पाहायलाही धाडस लागते आणि स्वप्न …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper