Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

भारतीय तरुणांना सैन्यदलात सेवेची सुवर्णसंधी!

केंद्र सरकारकडून अग्निपथ योजनेची घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय सैन्यात अग्निपथ भरती योजनेची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या अंतर्गत तिन्ही संरक्षण दलांमध्ये चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे नाव देण्यात आले आहे. सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने मंगळवारी (दि. 14) ऐतिहासिक निर्णय घेऊन अग्निपथ …

Read More »

शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

17 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांना मोठी भेट दिली आहे. एकूण 17 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (दि. 8) हा निर्णय घेतला. यानुसार 2022-23 पीक वर्षासाठी 17 पिकांचा एमएसपी 100 रुपयांनी वाढवून 2,040 रुपये …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील समस्यांकडे लक्ष द्यावे

आमदार नितेश राणे यांनी साधला निशाणा नाशिक ः प्रतिनिधी भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही राज्यातील समस्यांकडे लक्ष द्या, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. सोशल मीडियावर शिवलिंगाची विटंबना केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मंगळवारी (दि. …

Read More »

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी विविध लाभ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली महत्त्वपूर्ण घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 30) पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पीएम केअर फंडातून अनाथ मुलांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती पाठविण्यात येणार आहे. …

Read More »

आयपीएल फायनल; पंतप्रधान मोदी, शाह राहणार उपस्थित

नवी दिल्ली : आयपीएलचा 2022 स्पर्धा आता जवळपास संपत आली आहे. क्वॉलीफायर 2 सामना राजस्थान आणि बंगळुरू संघात होत असून विजेता संघ गुजरातविरुद्ध फायलन खेळेल. 29 मे रोजी हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दरम्यान, यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आयपीएलची सांगता जंगी होणार आहे. त्यामुळे 29 मे …

Read More »

लाल महालात लावणीप्रकरणी डान्सरसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर आधारित रिल्सचे शुटिंग केल्याप्रकरणी डान्सर वैष्णवी पाटील हिच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या लाल महाल पुणे महापालिकेने पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. असे असताना या ठिकाणी तमाशाप्रधान चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्यावर आधारित रिल्सचे शुटिंगचे करण्यात आले. यावर संभाजी …

Read More »

‘सोनेरी’ कामगिरीबद्दल निखतवर अभिनंदनाचा वर्षाव

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने (52 किलो) इस्तंबुल येथे झालेल्या 12व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेत सोनेरी मोहोर उमटवणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे. याबद्दल देशभरातून तिचे अभिनंदन होत आहे. निझामाबाद (तेलंगणा) येथे जन्मलेल्या निखतने गुरुवारी झालेल्या 52 किलो वजनी गटाच्या …

Read More »

मुलीला वाचविताना पाच जणींचा बुडून मृत्यू; लातूरमधील घटना

लातूर ः प्रतिनिधी कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या तीन महिला व दोन तरुणी अशा पाच जणींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 14) लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात किनगाव येथे घडली. मृत महिला या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्यातील …

Read More »

रयत शिक्षण संस्थेची डिजिटल शिक्षणामध्ये सरस कामगिरी; चेअरमन डॉ. अनिल पाटील यांचे प्रतिपादन

सातारा ः हरेश साठे कोरोनाने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आव्हाने निर्माण केली. असे असले तरी रयत शिक्षण संस्थेने या आव्हानांना सामोरे जात डिजिटल शिक्षणात सरस कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी येथे केले. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने गुणवंत रयतसेवक आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा …

Read More »

पनवेलमध्ये रोटरी उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठा डेंस ग्रीन फॉरेस्ट प्रकल्प

महापालिकेच्या विशेष सभेची परवानगी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत प्रभाग क्रमांक 19मध्ये हळदीपूरकर हॉस्पिटलजवळ डेंस ग्रीन मियावाकी फॉरेस्टचा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा प्रकल्प उभारण्यासाठी रोटरी क्लबला भूखंड देण्यास बुधवारी (दि. 27) झालेल्या विशेष सभेत अनुमती देण्यात आली. यामुळे हा परिसर हिरवागार तर होईलच, शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षांचा रहिवास …

Read More »