नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) रिटेल डायरेक्ट स्कीम आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजनेचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 12) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले. या वेळी पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात आरबीआयने केलेल्या कामाचे कौतुक केले. या कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरबीआयचे गव्हर्नर …
Read More »त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद; अनेक शहरांमध्ये हिंसाचार, दगडफेक, तोडफोड
अमरावती ः प्रतिनिधी त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात शुक्रवारी (दि. 12) महाराष्ट्रात मोर्चे काढण्यात आले होते. त्याला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागून परिस्थिती तणावपूर्ण बनली. बांगलादेशात नवरात्रोत्सवादरम्यान दुर्गापूजेचे काही मंडप उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्याच रागातून त्रिपुरामध्ये हिंसाचार उसळला. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. अमरावतीत मुस्लीम बांधवांनी …
Read More »पंढरपुरात पालखी मार्गाचे भूमिपूजन; पंतप्रधान मोदींची ऑनलाइन उपस्थिती
पंढरपूर : प्रतिनिधीपंढरपूरला जोडणार्या सुमारे 225 किलोमीटर लांबीच्या पालखी मार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह वारकर्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वरूपात उपस्थिती लावली. या वेळी पंतप्रधान मोदींनी ‘माझे …
Read More »नवाब मलिकांना कोर्टाचा दणका; अब्रुनुकसानीचा खटला चालवण्याचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी मुंबई ड्रग्स केसप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह भाजप नेते मोहीत कंबोज यांच्यावर आरोप केले होते. या विरोधात कंबोज यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना सोमवारी (दि. 8) कोर्टाने नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश …
Read More »हे नाच-गाणे करण्यात मग्न; फडणवीसांची धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका
अक्कलकोट : प्रतिनिधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळीत आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिच्या नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे नाच गाणे करण्यात मग्न आहेत, अशी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी भाजपवर टीका केली होती. …
Read More »राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पद्म पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी (दि. 8) राजधानी दिल्लीत झाला. यंदा सात मान्यवरांचा ‘पद्मविभूषण’, 10 मान्यवरांचा ‘पद्मभूषण’ आणि 102 जणांचा ‘पद्मश्री’ पुरस्कारासहीत गौरव करण्यात आला आहे. तर 16 जणांना मरणोत्तर ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार …
Read More »कुपोषित बालकांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कुपोषण ही समस्या देशाला दीर्घकाळापासून भेडसावत आहे. गरिबी आणि अन्य कारणांमुळे लहान वयात मुलांना आणि मातेला योग्य आहार न मिळाल्याने ही समस्या उद्भवत आहे. गरिबीमुळे लाखो मुलांना आणि मातेलाही पोषक आहार मिळत नसल्याने जन्मतः कुपोषणाची शिकार ठरणार्या बालकांचे प्रमाण मोठे आहे. याबाबतीत नुकतीच माहितीच्या अधिकाराखाली सरकारने …
Read More »मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली ः केंद्र सरकारने अहमदाबादच्या जायडस कॅडिला या कंपनीच्या ‘जायकोव-डी’ या तीन डोसच्या लसीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच या महिन्यात होणार्या राष्ट्रीय करोनाविरोधी लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश करण्यात येणार आहे. अधिकृत सूत्रांनी रविवारी (दि. 7) ही माहिती दिली. जायकोव-डी ही 12 वर्षांची मुले …
Read More »मोदींमुळेच भारत मजबूत स्थितीत; जेपी नड्डा यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारी (दि. 7) पार पडली. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच आपण आज कोरोनामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीवर मात करू शकलो. कोरोना काळात लॉकडाऊन लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदींनी घेतला. लॉकडाऊमुळे …
Read More »जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी सर्वांत पुढे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशातच नाही, तर परदेशातही सर्वाधिक आहे. अप्रुव्हल रेटिंग एजन्सीच्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील अनेक बड्या नेत्यांना मागे टाकले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही त्यांनी मागे टाकले आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper