Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक निकाल अंदाज स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी 23 मे हा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे तसतसे लोकसभा निवडणूक निकालांबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असून केवळ राजकीय निरिक्षक किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीच नव्हे तर सुजाण नागरिकही निवडणूक निकालांबाबतची आपली भाकिते मोठ्या विश्वासाने व्यक्त करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघाने मुंबईसह महाराष्ट्रातील …

Read More »

तिहेरी अपघातात मुंबईतील सहा जणांचा मृत्यू

मुंबई ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एका बाइकचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणार्‍या भरधाव कारसमोर बाइकस्वार आल्याने हा …

Read More »

‘आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका’

मुंबई ः प्रतिनिधी दुष्काळी भागातील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे, रोहयोमधील कामे यांना आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने आचारसंहितेचे कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नयेत. प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात …

Read More »

कोपरखैरणेत घराचे छत कोसळले

नवी मुंबई : प्रतिनिधी कोपरखैरणे सेक्टर 10 येथील सागर सोसायटीत राहणार्‍या चित्रलेखा अरुरू यांच्या घरातील छताचे प्लॅस्टर मंगळवारी (दि. 7) दुपारी कोसळले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसले, तरी सिडकोच्या  धोकादायक घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सेक्टर 10 मधील सागर को-ऑपरेटीव्ही सोसायटीत अरुरू कुटुंब राहते. चित्रलेखा अरुरू या घरात असताना …

Read More »

हक्काच्या रजेसाठीही द्यावी लागतेय चिरीमिरी

एनएमएमटी प्रशासनातील धक्कादायक प्रकार नवी मुंबई : प्रतिनिधी आपल्या हक्काची रजा शिल्लक असताना व ती मंजूर करून घेताना चिरीमिरी दिल्याशिवाय वरिष्ठ रजा मंजूर करत नसल्याने मनपाच्या कर्मचारी व अधिकार्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जवळचा अधिकारी व कर्मचारी असेल, तर त्याला तत्काळ रजा मिळते, पण निकटचा नसेल, तर …

Read More »

मोबाइल अॅ8पद्वारे होणार पशूधन नोंदी ; राज्यातील 1284 छावण्यांत साडेआठ लाख पशूधन

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे जिल्ह्यांत 1284 राहत शिबिरे व छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यात लहान-मोठे मिळून 8,55,513 पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली व औरंगाबाद या चार जिल्ह्यांत स्वयंसेवी संस्थांनी स्वेच्छेने व स्वखर्चाने सहा छावण्या सुरू …

Read More »

शरद पवारांच्या टीकेला भाजपचे सडेतोड उत्तर ; गडचिरोलीला सर्वाधिक वेळा भेट देणारे फडणवीस एकमेव मुख्यमंत्री

मुंबई ः प्रतिनिधी आताचे गृहमंत्री (देवेंद्र फडणवीस) गडचिरोलीत केवळ पुष्पचक्र वाहायला जातात, या शरद पवार यांच्या टीकेला भाजपनेही सडेतोड उत्तर दिले आहे. गडचिरोलीत सर्वाधिक 10 वेळा जाणारे फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचा दावा भाजपने केला. पवारांनी या वेळी दुष्काळावरून टीका करताना भाजप संवेदनशील नसल्याचेही म्हटले होते. या वक्तव्याचाही भाजपने ट्विटरवरून …

Read More »

प्ले-ऑफच्या चार टीम ठरल्या

मुंबई : प्रतिनिधी कोलकात्याविरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईचा विजय झाला. या विजयाबरोबरच मुंबई यंदाच्या मोसमात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तसेच मुंबईच्या विजयामुळे कोलकात्याचे प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद या चार टीम प्ले-ऑफसाठी क्वालिफाय झाल्या आहेत. आयपीएलच्या ग्रुप स्टेजच्या शेवटच्या मॅचमध्ये प्ले-ऑफच्या टीम ठरल्या आहेत. आयपीएल …

Read More »

मुंबईचा 9 गडी राखून दणदणीत विजय ; कोलकाता नाईट रायडर्स प्ले-ऑफमधून बाहेर

मुंबई : प्रतिनिधी मुंबईने शेवटच्या साखळी सामन्यात कोलकात्यावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी 134 धावांचे आव्हान सहज पार केले. कर्णधार रोहित शर्माने 48 चेंडूत 55 धावांची खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 27 चेंडूंत 46 धावांची नाबाद …

Read More »

यंदा आंबा शौकिनांची निराशा

मुंबई ः प्रतिनिधी यंदा लहरी हवामानामुळे आणि आंब्यावर आलेल्या रोगामुळे सर्वच ठिकाणांच्या आंब्याचे पीक 50 टक्के घटले आहे. त्यामुळे यंदा बाजारात आंबा कमी आला. त्यात यावर्षीचा हंगामही लवकरच संपणार असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आंबा खवय्यांनी आताच आंब्याचा आस्वाद घ्यावा, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. हापूस आंब्याचा हंगाम हा व्यापार्‍यांसाठी मोठा आणि …

Read More »