Breaking News

महत्वाच्या बातम्या

भातपिकावर बगळा रोगाचा प्रादूर्भाव; शेती धोक्यात

कर्जत : बातमीदार जुलै महिन्यात कर्जत तालुक्यातील 900 हेक्टर भाताच्या शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकरी आधीच संकटात सापडला असताना आता भाताच्या पिकावर बगळा रोगाने शिरकाव केला आहे.त्यामुळे तालुक्यातील अर्ध्या भागातील भाताचे पीक बगाला रोगाने ग्रासले आहे. कर्जत तालुक्यातील भाताचे पीक जुलै महिन्यात आलेल्या महापुरात माती दगड शेतात घुसून …

Read More »

आदिवासी लोकांना भाजीपाला पिकांचा आधार

कर्जत तालुक्यातील आदिवासी समाज कोरोना मुळे लागलेल्या लॉक डाऊनमुळे गेली दोन वर्षे आर्थिक आधार शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.आदिवासी समाज आजही कंदमुळे,जंगलातील मेवा आणि पावसाळ्यात माळरानावर पिकवलेला भाजीपाला यांच्या रोजगारातून कुटुंबाची गुजराण करीत असतो.मात्र गेली दीड वर्षे त्यांना बाजारात आपल्याकडील कंदमुळे, भाजीपाला नेता येत नव्हता आणि त्यामुळे ग्राहकाला हव्या त्या किमतीत …

Read More »

तालिबान्यांनी घेतली अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधाराची भेट

काबूल ः प्रतिनिधी तालिबानचा नेता अनस हक्कानीने शनिवारी अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीची भेट घेतली. या वेळी तालिबानने अफगाणिस्तान क्रिकेट संघाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. रिपब्लिक वर्ल्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अनस हक्कानीने अफगाणिस्तान क्रिकेट संघातील सर्व सदस्यांशी आणि हशमतुल्लाह शाहिदीसह निवड मंडळाशी चर्चा केली. या बैठकीला …

Read More »

जोस बटलर आयपीएलबाहेर; राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का

जयपूर ः वृत्तसंस्था आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. टीमचा प्रमुख खेळाडू आणि इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर पुढच्या महिन्यात यूएईमध्ये सुरू होणार्‍या 2021 हंगामाच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये खेळणार नाही. बटलरने आपले नाव मागे घेतले आहे. तो आता दुसर्‍यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे आता त्याला कुटुंबासोबत अधिक वेळ …

Read More »

प्रतिकूल वातावरणावर मात करून अमित खत्रीचे रूपेरी यश

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अमित खत्रीने जागतिक युवा (20 वर्षांखालील) अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमधील 10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेमधील भारताचे हे दुसरे पदक ठरले. समुद्रसपाटीपासून 1800 मीटर उंचीवर हे स्पर्धेचे ठिकाण असल्यामुळे तेथील वातावरणाचा अमितच्या कामगिरीवर परिणाम जाणवला. शर्यतीदरम्यान त्याला श्वासोच्छ्वासाचीही समस्या जाणवत होती, पण तरीही कारकीर्दीतील पहिल्याच …

Read More »

‘आरसीबी’ने केले मोठे बदल; तीन नवे खेळाडू संघात होणार दाखल

बंगळुरू ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीगची फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, दुश्मंता चमीरा आणि ऑस्ट्रेलियाचा टिम डेव्हिड यांना करारबद्ध केले आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने भारतीय संघाविरोधात श्रीलंकेला टी-20 मालिकेत विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. आरसीबीने भारतीय संघाविरोधात चांगला खेळ करणार्‍या खेळाडूंना निवडण्याची परंपरा कायम …

Read More »

लोण्याचा गोळा मटकावणार्‍या बोक्याच्या भूमिकेत प्रितम म्हात्रे

शेकाप नेत्यांचा वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न सुरूच पनवेल ः रामप्रहर वृत्त‘कर्नाळा बँक घोटाळा आणि नागरिकांना परत करण्यात येणारे पैसे’ या मुद्द्यांवर शेकापचे युवा नेते आणि पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी अलिकडेच केलेले निवेदन वाचता त्यांना रायगडात काय चालले आहे याची कल्पनाच नाही, असा समज कोणाचाही होऊ …

Read More »

खारघर गावात कोविड लसीकरण केंद्र सुरू

नगरसेवक प्रवीण पाटील यांचे प्रयत्न पनवेल : प्रतिनिधी खारघर गावात स्थायी समितीचे माजी सभापती व विद्यमान नगरसेवक प्रवीण काळूराम पाटील यांचे प्रयत्नाने शनिवार (दि.21) पासून पनवेल महापालिकेचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. खारघर गावात कोविड 19 लसीकरण केंद्र नसल्याने तेथील लोकांना खारघर येथे जावे लागत होते. ग्रामीण …

Read More »

पिरवाडी ते चार फाटा रस्त्याची गणेशोत्सवापूर्वी डागडुजी करा

सरपंच रंजना पाटील यांची मागणी उरण : वार्ताहर, प्रतिनिधी सतत पडणार्‍या पावसामुळे पिरवाडी चौपाटी ते उरण चार फाटा या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पादचारी, पर्यटक आणि वाहनचालक यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. ओएनजीसी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी म्हातवली ग्रामपंचायतीच्या …

Read More »

उरणमध्ये महाविकास आघाडी सरकारचा सावळा गोंधळ

उरण : प्रतिनिधी राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी उरणमध्ये महाविकास आघाडीला नगरपरिषद निवडणुकीचे डोहाळे आताच लागले आहेत. उरण शहरात नसलेली ताकद आजमावण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्वयंघोषित नेत्यांनी शनिवारी (दि. 21) मोठा गाजावाजा करीत बोलावलेली पत्रकार परिषद नियोजित वेळेपेक्षा दोन तासांच्या कालावधीनंतरही सुरू न केल्याने येथील पत्रकारांनी या …

Read More »