पनवेल ः रामप्रहर वृत्त बुडित गेलेल्या बँकांच्या ठेवीदारांना केंद्र सरकारच्या निर्णयानुसार विमा संरक्षणाच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे. याचा लाभ घोटाळा झालेल्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांनाही मिळणार आहे. त्यामुळे या ठेवीदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीला धन्यवाद दिले आहेत. …
Read More »कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेसाठी सज्जता
नवी दिल्ली ः देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, मात्र असे असले तरी कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. कोरोनाच्या दुसर्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. त्यामुळे तिसर्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने आधीपासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. लसीकरण मोहिमेचा वेग …
Read More »तालिबानी दहशत
तालिबानी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तानात वर्चस्व मिळविले आहे. एक एक प्रांताचा ताबा मिळवित तालिबान्यांनी या संपूर्ण देशावर कधी कब्जा केला हे तेथील नागरिकांनाही कळले नाही. तालिबानी क्रूरतेसाठी ओळखले जातात. त्यांनी अफगाणिस्तानात प्रचंड दहशत निर्माण केली असून तेथील भयभीत नागरिक आपला जीव वाचविण्याची धडपड करीत आहेत. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधून माघार घेताच …
Read More »बाप-लेकीचा एक महिन्याचा उपवास
कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरातील एका जैन समाजाच्या कुटुंबातील वडील व मुलगी यांनी चतुर्मासात एक महिन्याचा उपवास करण्याचा संकल्प करून अन्नत्याग केला होता. हे दोघेही एक महिनाभर केवळ गरम पाणी पिऊन राहात होते. बाप-लेकीने एकाच वेळी एक महिना उपवास करणे ही रायगड जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. त्यांच्या या व्रताची …
Read More »अखंडित परंपरा पुन्हा सुरू
सावित्रीला वीरेश्वराचा नारळ अर्पण महाड : प्रतिनिधी महाडमधील कित्येक वर्षे खंडित झालेली एक परंपरा आज पुन्हा सुरू झाली. सावित्री नदीला वीरेश्वराचा नारळ महाजनांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. सावित्रीने महाडकरांवर कृपा ठेवावी, अशी विनंती करण्यात आली. ब्रिटिश काळात बंद पडलेली एक प्रथा आज महाडकरांनी पुन्हा सुरू केली. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वीरेश्वर …
Read More »दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांचा तज्ज्ञांमार्फत अहवाल तयार करणार -मेधा पाटकर
पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि महाड तालुक्यातील ज्या गावांना अतिवृष्टीमुळे दरडग्रस्त व पूरग्रस्त होऊन आर्थिक नुकसान, पशूधन व जीवितहानी सोसावी लागली, त्या सर्व गावांचा तज्ज्ञांमार्फत अहवाल करून राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधणार असल्याची ग्वाही जनआंदोलनच्या राष्ट्रीय समन्वय अध्यक्षा मेधा पाटकर यांनी दिली. महाड तालुक्यातील तळीये गावात जुलैमध्ये …
Read More »नगरपरिषदेसाठी प्रभाग रचना आराखडा बनविण्याचे आदेश
पेण : प्रतिनिधी पेण नगर परिषदेसह राज्यातील सर्व 227 नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचा कालावधी डिसेंबर 2021 या महिन्यात संपत असल्याने निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेला प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे, प्रारूप वॉर्ड रचनेची …
Read More »धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण
मुरूड : प्रतिनिधी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 277 श्रीसदस्यांनी मुरूड तालुक्यातील अनेक गावांत 510 झाडांची लागवड केली आहे. पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीसदस्यांनी मुरूड तालुक्यातील बारशीव, काशीद, चिकणी, माजगाव, मोरे, मुरूड शहर, डोंगरी, आगरदांडा, टोकेखार, वावे, वांदरे, अंदाड या गावात कोकम, फणस, चिंच, जांभूळ, …
Read More »कोरोनाचा ढोलकी विक्रीवर परिणाम
अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाच्या सावटाखाली साजर्या होणार्या गणेशोत्सवात यातील ढोलकीचा आवाज दाबला गेला आहे. आज रस्त्यावर ढोलकी विकण्यासाठी फिरणार्या विक्रेत्यांच्या ढोलकीचा आवाज कुणाच्या कानी पोहचत नाही. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी गावोगावी, शहरातील गल्लीबोळात खांद्यावर पाच, सहा ढोलक्या घेऊन, त्यातील एक ढोलकी वाजवत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ढोलकीविक्रेते दरवर्षी फिरतात. कोरोनाने …
Read More »खोपोली पोलीस ठाण्यात रक्षाबंधन
खोपोली : प्रतिनिधी शालोम एज्युकेशन सेंटर संचालित सोफिया शाळेच्या दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थिनींनी शनिवारी (दि. 21) खोपोली पोलीस ठाण्यात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचार्यांना राख्या बांधल्या. शालोम एज्युकेशन सेंटरच्या अध्यक्षा रूपा मजेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली येथे मतिमंद मुलांची शाळा सुरू आहे. तेथे 27 विद्यार्थी शिक्षण व प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. शाळेच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper