मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रसायनी परिसरातील वासांबे मोहोपाडा हद्दीतही कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने परिसरात चार दिवसांचा जनता कर्फ्यूही झाला. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत वासांबे मोहोपाडा हद्दीतील महेशवरी पार्क वसाहतीत दोघांचे, तर रिसवाडीतही दोघा पती-पत्नीचे कोरोना अहवाल …
Read More »लावणीच्या कामांना सुरुवात
पनवेल ः बातमीदार मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असून शेतात पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने पनवेल तालुक्यातील शेतकर्यांनी लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस हजेरी लावलेल्या पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला होता. पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढावल होते, मात्र मागील दोन …
Read More »कोविड रुग्णालयात गॅस पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पुरवठा
नवी मुंबई ः बातमीदार केवळ 20 दिवसांत नवी मुंबइतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या 1183 बेड्स क्षमतेच्या कोविड रुग्णालयामध्ये 483 ऑक्सिजन बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. या बेड्सना तातडीची गरज म्हणून सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात होता, मात्र यामध्ये अधिक सुधारणा करीत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा समान दाबाने मिळावा या दृष्टीने …
Read More »तीन दिवसांत लाखोंची दंडवसुली; नवी मुंबई पालिकेची धडक कारवाई
नवी मुंबई ः बातमीदार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला असला तरी अनेक नागरिक अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या बहाण्याने घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिका आयुक्तांनी विभागनिहाय नियुक्त केलेल्या विभागप्रमुख दर्जाच्या समन्वय अधिकार्यांना संबंधित विभागातील पोलीस यंत्रणेसह प्रभावी अंमलबजावणीकडे दररोज नियमित विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार …
Read More »कामोठ्यातील डुकरे दाम्पत्याची कोरोनाकाळात घरपोच भाजीपाला सेवा
कामोठे ः प्रतिनिधी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. अटी-शर्थींसह जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला पालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. असे असले तरी ते अपरिहार्य झाले आहे. अशा परिस्थितीत एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कामोठ्यातील उषा डुकरे आणि बिबीषण डुकरे दाम्पत्य …
Read More »वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून 38 जणांवर कारवाई
मोहोपाडा ः प्रतिनिधी रसायनी परिसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायतीने कडक पावले उचलली असून मास्क न वापरणार्या 36 जणांवर कारवाई करीत 15,200 रुपयांचा दंड वसूल केला, तर बाजारपेठेतील दोन दुकानदारांकडून ग्राहकांसाठी सोशल डिस्टन्ससाठी उपाययोजना न केल्याने ग्राहक गर्दी करीत असल्याने …
Read More »‘मूषक नियंत्रण कामगारांवरील अन्याय दूर करा’
नवी मुंबई ः बातमीदार जुलै महिना उजाडला तरी अजून पालिकेत मूषक नियंत्रण विभागात काम करणार्या कामगारांचे मे व जून महिन्याचे वेतन झाले नाही. त्यामुळे मूषक नियंत्रण कामगारांच्या वेतन विलंबाबाबत होणारा अन्याय दूर करण्याची मागणी सानपाड्यातील भाजप कार्यकर्ते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका …
Read More »कोरोनाच्या संकटातही कामगार भरतीसाठी मुलाखती; भाजप कार्यकर्ते आक्रमक
मोहोपाडा ः प्रतिनिधी रसायनी मोहोपाडा परिसरातील एनआयएसएम सेबी रस्त्यालगत जय प्रेसिजन प्रोडक्ट कंपनी आहे. या कंपनीतील काही कामगारांना कोरोनाची लागण होऊन त्यांचे कोरोना अहवालही पॉझिटिव्ह येत आहेत. शिवाय कंपनीतील बरेच कामगार व त्यांचे कुटुंबीय विविध आजारांनी त्रस्त आहेत. त्यातच जय कंपनीने हा डाव साधून बाहेरील कामगारांच्या मुलाखती सुरू केल्याने त्या …
Read More »वारी विठूरायाची काव्यस्पर्धेत माणगावच्या साहित्यिकांचे यश
माणगाव : प्रतिनिधी – उरण येथील मधुबन कट्टातर्फे आषाढी एकादशीनिमित्त नुकत्याच घेण्यात आलेल्या वारी विठूरायाची ऑनलाइन काव्यस्पर्धेत माणगावमधील चार स्पर्धकांनी क्रमांक पटकावून तालुक्याचा साहित्यिक ठसा उमटवला आहे. या वर्षी कोरोनाच्या महामारीत पंढरीची वारी चुकल्यामुळे कवितेतून विठूरायाचे स्मरण करून नवोदित व लौकिकप्राप्त अशा सर्व कवी-कवयित्रींना संधी मिळावी यासाठी या काव्यस्पर्धेचे आयोजन …
Read More »अलिबाग ‘रोटरी’चा पदग्रहण सोहळा
डॉ. किरण नाबर यांची अध्यक्षपदी निवड अलिबाग : प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोरच्या अध्यक्षपदी डॉ. किरण नाबर यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष जगदिश राणे यांच्याकडून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. सचिवपदी निमिश परब यांची, तर खजिनदारपदी डॉ. राजेंद्र चांदोरकर यांची नियुक्ती झाली आहे. कार्यकारीणीचा पदभार समारंभ झुम मिटींगच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper