Breaking News

महत्वाच्या बातम्या

खारघर टोलनाक्यावरील 39 कर्मचार्‍यांना अचानक डच्चू; प्रशासनाविरोधात कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

खारघर : प्रतिनिधी सायन पनवेल महामार्गावर मागील सात वर्षांपासून कार्यरत असलेल्या टोल नाक्यावरील विविध विभागातील 39 कर्मचार्‍यांना तडकाफडकी कामावरून कमी केल्याने या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. टोल प्रशासनाकडून दररोज लाखोंची वसुली करून देखील विविध कारणे दाखवून या कर्मचार्‍यांना कामावरून कमी केल्याने हे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. विशेष म्हणजे संबंधित …

Read More »

अपयशाचे खापर आयुक्तांच्या बदल्या करून फोडू नका!; देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नवी मुंबई : बातमीदार कोरोना महामारीच्या काळात सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. एकत्र बसून काम केले तर प्रश्न सुटण्यास मदत होईल. मात्र तरीही आम्ही आमच्यापरीने मदत करतच आहोत. सरकार आपले असताना आपल्या अपयशाचे खापर आयुक्तांवर फोडून त्यांची बदली करणे चुकीचे असल्याचे सांगत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

Read More »

भविष्यातील पोर्टफोलिओत सोने का हवे?

गुंतवणुकीत सोने असावे की नसावे हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे, पण नजीकच्या भविष्यात जग अस्थिर राहणार असल्याने सोने विक्रमी वाढले असतानाही सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. जे चमकतं ते सर्वच सोनं नव्हे, असं म्हटलं जातं. म्हणूनच खर्‍या सोन्याची किंमत मंदीमध्येच कळते. मागील एक वर्षांपासून आपण सोन्यामध्ये तेजी अनुभवत आहोत. …

Read More »

वॉरेन बफेट नावाच्या गुरूचा मंत्र लक्षात ठेवण्याची हीच वेळ का आहे?

कोरोना संकटात भारतासह जगभरातील शेअर बाजारांनी उत्तम परतावा दिला आहे. तीन महिने जग बंद असताना मिळणारा हा परतावा तोंडात बोट घालायला लावणारा आहे. अशा परताव्याच्या अपेक्षेने शेअर बाजारात येणार्‍या गुंतवणूकदारांनी जर गुंतवणुकीची शिस्त पाळली नाही तर या परताव्याचे मोठ्या हानीत रुपांतर होण्यास वेळ लागत नाही. गुंतवणूक गुरू वॉरेन बफेट यांना …

Read More »

सतीश लेले ‘कोविड योद्धा’ने सन्मानित

रेवदंडा ः प्रतिनिधी – नागाव येथील कार्यतत्पर तसेच परिसरातील गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे रेवदंडा अर्बन बँकेचे संचालक सतीश लेले यांना कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल परशुराम सेवा संघ महाराष्ट्र व मानवाधिकार सुरक्षा संघ या दोन राज्यस्तरावरील नामांकित संस्थांकडून कोविड योद्धा पुरस्काराने प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर …

Read More »

माणगाव राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्षांची पक्षनेतृत्वावर नाराजी

माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महमूद धुंदवारे यांनी पक्षनेतृत्व तसेच  तटकरे कुटुंबीयांबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली असून, लवकरच आपण शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. महमूद धुंदवारे गेली तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत आहेत. शेवटी शनिवारी (दि. 4) त्यांनी प्रसारमाध्यमांना आपली …

Read More »

रोह्यात पावसाचा जोर कायम; नदीनाले तुडूंब; बळीराजा सुखावला

रोहे ः प्रतिनिधी – रोहा शहरात गुरुवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर रोहा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यने नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. चांगला पाऊस पडल्याने तालुक्यात लावणीसह अन्य शेतीच्या कामांना वेग आला आहे. गुरुवारी सुरू झालेला पाऊस सातत्याने बरसत असल्याने शनिवारीही (दि. 4) पावसाचा जोर कायम असल्याचे …

Read More »

बेशिस्त नागरिकांना दणका

खोपोली पालिकेकडून दंडात्मक कारवाई खोपोली ः प्रतिनिधी – खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी गुरुवारी (दि. 2) एका बैठकीत खोपोली नगरपालिका प्रशासन कोरोनाबाबत देण्यात आलेल्या निर्देशांची कडक अंमलबजावणी करीत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खोपोली पालिका प्रशासनाकडून आक्रमक भूमिका घेत नगरपालिका हद्दीत विविध भागांत धडक कारवाई करण्यात आली. यात रस्त्यावर …

Read More »

चिंताजनक! रायगडात तब्बल 353 नवे रुग्ण; चौघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 3) कोरोनाच्या तब्बल 353 रुग्णांची नोंद झाली असून, चार जण मृत्युमुखी पडले आहेत. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 186, पनवेल ग्रामीणमधील 47, रोहा तालुक्यातील 33, अलिबाग तालुक्यातील 19, महाड तालुक्यातील 14, उरण व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी 13, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी सात, पेण …

Read More »

विक्रांत पाटील भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यकारिणी जाहीर मुंबई : प्रतिनिधीभाजपच्या राज्यातील कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 3) केली. यामध्ये 12 उपाध्यक्ष, पाच महामंत्री यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. याशिवाय आमदार आशिष शेलार व माधुरी मिसाळ विधानसभेत मुख्य प्रतोद असतील. दरम्यान, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडमधील नेत्या उमा खापरे, …

Read More »