Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘…अन्यथा एपीएमसी बंदसाठी मोर्चा’

नवी मुंबई ः बातमीदार कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत एपीएमसी मार्केट सुरू राहिले, तर आमची काहीच हरकत नाही, परंतु जर पुन्हा बेपर्वाई झाली तर नवी मुंबईकरांसाठी सोशल डिस्टन्स पाळून प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यासाठी मोर्चाही काढू, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. …

Read More »

पनवेल तालुक्यात कोरोनाचे 20 नवीन रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 19) कोरोनाचे 20 नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी पनवेल महापालिका क्षेत्रात कलंबोली, कामोठे, काळुंद्रे येथे प्रत्येकी 5, खारघर 2 आणि पनवेल तक्का येथे एक रुग्ण नवीन सापडला असून, 7 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 2 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पनवेल …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात ऑनलाइन मद्यविक्रीस परवानगी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कंटेन्मेंट झोन वगळून सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन मद्यविक्रीला परवानगी देण्याचे आदेश महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये घसा कोरडा पडलेल्या अनेक मद्यप्रेमींना  आनंद झाला आहे.  राज्यात मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्यानंतरही पनवेल महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये असल्याने दुकाने उघडण्यास बंदी …

Read More »

गणेश मूर्तिकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

पेण ः प्रतिनिधी गणेशमूर्ती परदेशात किंवा देशातील विविध भागांत वेळेवर पोहचण्यासाठी त्यांना वाहतूक परवाना मिळावा याबाबत शासनाशी चर्चा करून तो लवकर मिळवून देण्यासाठी तसेच गणेश मूर्तिकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पेण येथे झालेल्या बैठकीत केले. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा, पाहणी व …

Read More »

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी पोर्टल

नवी मुंबई ः बातमीदार कोरोनामुळे संपूर्ण जग आत्मनिर्भर बनण्याच्या तयारीत आहे. जीवनाश्यक वस्तूंबरोबरच  विद्यार्थ्यांना शिक्षणाची व पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशाची चिंता लागली आहे. यावर तोडगा काढत दिनेश औटी व आतिष दिवाकर या दोन मराठी अभियंत्यांनी तीन वर्षे अथक प्रयत्न करून बुक माय कॉलेज हे वेबसाइट पोर्टल सुरू केले आहे. दिनेश …

Read More »

ज्येष्ठांची रोगप्रतिकारशक्ती वाढणार; 60 वर्षांवरील व्यक्तींना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

पनवेल ः प्रतिनिधी वयोवृद्धांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. पनवेल परिसरात असे अनेक वयस्कर रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, रोग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर खांदा वसाहतीतील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. प्रभाग समिती …

Read More »

विचुंबे येथील कृष्ण वंदना, साई ऐश्वर्या इमारत कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

पनवेल ः रामप्रहर वृत्त  रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे कोरोना विषाणूबाधित व्यक्ती आढळल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या विचुंबे ता. पनवेल येथील कृष्ण वंदना को. ऑ. हौ. सो. आणि येथील सेंट थॉमस शाळेजवळील साई ऐश्वर्या बिल्डिंग कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात …

Read More »

पॅराथायरॉईडग्रस्त चिमुरड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

नवी मुंबई ः बातमीदार दुर्मीळ असा जन्मजात आजार असलेल्या नऊ महिन्यांच्या बाळावर अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील स्पेशालिस्ट सर्जन्सच्या टीमने पॅराथायरॉईड ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे.  या बाळाला जन्मापासून सुस्तपणा, चिडचिडेपणा आणि कोणत्याही क्रियेमध्ये उत्तेजन न देणे असे त्रास होत होते. अधिक तपासणीनंतर त्याला लहान बाळांना होणारा गंभीर …

Read More »

अन्नदान करून वाढदिवस साजरा

पनवेल ः वार्ताहर सध्या कोरोनाच्या संकटकाळात हातावर पोट असलेल्या नागरिकांना एक वेळचे जेवण मिळणेही मुश्कील झाले आहे. या वेळी सहा वर्षीय हर्षलने माझा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे थाटामाटात साजरा न करता आपल्या परिसरात असलेल्या नागरिकांना जेवण देऊन साजरा करा, असे आपल्या घरातील सदस्यांना सांगितले. त्याप्रमाणे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साळुंखे कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा वाढदिवस …

Read More »

नवी मुंबई महानगरपालिकेस पंचतारांकित मानांकन

नवी मुंबई ः वार्ताहर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंगळवारी (दि. 19) देशातील कचरामुक्त शहरांना देण्यात येणार्‍या स्टार रेटिंगची घोषणा केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी केली. त्यामध्ये नवी मुंबईला पुन्हा एकदा फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर झाले आहे. देशातील सहा शहरांना कचरामुक्त शहराचे फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर झाले असून त्यामध्ये …

Read More »