Breaking News

महत्वाच्या बातम्या

माथेरानमधील दोन दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवित हानी नाही, नागरिकांमुळे आग आटोक्यात

कर्जत : बातमीदार माथेरान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटरमधील रोहित टी अ‍ॅण्ड कोल्ड्रिंक या दुकानाला रविवारी रात्री 1:30 सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली आहेत सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने जीवितहानी टळली. अग्निशमन आणि नागरिकांमुळे ही आटोक्यात आणण्यात यश आले. माथेरान येथील हे शॉपिंग …

Read More »

जैवतंत्रज्ञानाच्या प्रगत साधनांचा वापर आवश्यक -कुलगुरू डॉ. संजय सावंत

कर्जत : बातमीदार : भाताच्या नवीन जाती विकसित करण्यासाठी लागणारा  कालावधी कमी करण्याची गरज असून, गतिशील संकरिकरणासाठी जैवतंत्रज्ञानाच्या प्रगत साधनांचा वापर आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत यांनी येथे केले. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आलेल्या 54 व्या महाराष्ट्र …

Read More »

फुप्फुसांचा कर्करोग : छुपा सैतान

कर्करोगामुळे होणार्‍या मृत्यूंपैकी 27% मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात आणि स्तनांचा कर्करोग, कोलोरेक्टल (मोठ्या आतडे) कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोग या तीन प्रामुख्याने आढळणार्‍या कर्करोगांमुळे होणार्‍या मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात. पूर्वी हा रोग केवळ वृद्ध व्यक्तींना होत असे पण आता कमी वयातही या रोगाचे प्रमाण वाढलेले आढळून येत आहे. पुरुषांमध्ये …

Read More »

‘आरोग्यवर्धक जीवनासाठी योगासने आवश्यक’

पेण : प्रतिपादन : आरोग्यवर्धक जीवन जगण्यासाठी दैनंदिन जीवनात सूर्यनमस्कार व योगासने आवश्यक असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी येथे केले. पेण नगर परिषदेच्या वतीने महिला व बालकल्याण समिती सभापती तेजस्विनी नेने यांच्या पुढाकाराने डॉ. भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली इनडोअर हॉल येथे महिलांसाठी सूर्यनमस्कार व योगासने विषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले …

Read More »

बेटी बचाओ, बेटी पढाओनिमित्त प्रभात फेरी

पोलादपूर : प्रतिनिधी : बेटी बचाव बेटी पढाव सप्ताहानिमित्त येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि पंचायत समिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूरमध्ये नुकताच प्रभातफेरी आयोजित करण्यात आली होती. या प्रभातफेरीच्या शुभारंभाला पंचायत समितीच्या सभापती नंदा चांदे, उपसभापती शैलेश सलागरे, गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी, पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, गटशिक्षणाधिकारी साळुंखे, …

Read More »

भारत संचार निगमची अनियमित ‘सेवा’कायमच

भारतातील एक विश्वसनीय सेवा म्हणून पाहिल्या गेलेल्या भारत संचार निगम लिमिटेडच्या दूरध्वनी आणि इंटरनेट सेवेचे महाडमध्ये तीनतेरा वाजले आहेत. ही सेवा महाडकरांना कधीतरी मिळत असुन आमावस्या पौर्णिमेला मिळणार्‍या या सेवेमुळे महाडकर कमालीचे संतप्त झाले आहेत. याचा परिणाम सर्व शासकीय कार्यालये, बँका आणि घरगुती, व्यावसाईक दूरध्वनी ग्राहकांवर जाणवू लागला आहे. एकीकडे …

Read More »

विकृतीला रोखणार कसे?

‘ढोर, गंवार, शुद्र, पशु और नारी, सकल है ताडन के अधिकारी’ हा शतकानुशतके चालत आलेला दृष्टिकोन समाजामध्ये इतका खोलवर मुरलेला आहे की विशेषत: स्त्रियांबाबतचा हा विकृत दृष्टिकोन विषवल्लीसारखा उपटून फेकून देणे हे कठीण काम होऊन बसले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्रियांचे समाजातील …

Read More »

खांदा कॉलनीत जलवाहिनी फुटली

पनवेल : बातमीदार खांदा कॉलनी सेक्टर सहा परिसरात पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन शनिवारी रात्री फुटल्याची घटना घडली. एका विकासकाकडून नव्या प्रकल्पासाठी रात्रीच्या वेळी पाणीजोडणी घेत असताना हा प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. निष्काळजीपणे रस्ता खोदल्यामुळे हा प्रकार घडला, असे बोलले जात असले तरी नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मुख्य पाइपलाइनवरून …

Read More »

‘मूकनायक’ने डॉ. आंबेडकरांच्या चळवळीला पंख दिले; संविधान अभ्यासक शामसुदर सोन्नर यांचे प्रतिपादन; सत्याग्रह महाविद्यालयातर्फे शंभर व्याख्यानांचे आयोजन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ज्या समाजाला आपले मत मांडण्यासाठी हक्काचे माध्यम नव्हते, अशा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी   ’मूकनायक’ हे पाक्षिक सुरु केले. या माध्यमातून  डॉ. आंबेडकर यांच्या चवळवळीला मुकनायकने भक्कम पंख दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, आणि संविधान अभ्यासक शामसुंदर सोन्नर यांनी केले. …

Read More »

रसायनीतील राजिप शाळांना पंखे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीतील सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने परिसरातील शिवनगरवाडी येथील रायगड जिल्हा परिषद (राजिप) शाळेला दोन सिलिंग फॅन, लाडिवली रायगड जिल्हा परिषद शाळेला दोन टेबल फॅन व एक सिलिंग फॅन आदी वाटप  करण्यात आले. या वेळी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करणात आले. …

Read More »