Breaking News

महत्वाच्या बातम्या

उरणमध्ये ‘शिटी’ वाजली

अपक्ष महेश बालदी यांचा ऐतिहासिक विजय उरण ः वार्ताहर उरणमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी 74463 मते मिळवून शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर (68745 मते) यांचा 5718 मतांनी पराभव केला. शेकाप महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार विवेक पाटील हे तिसर्‍या स्थानावर फेकले गेले असून त्यांना (61456 मते) मिळाली आहेत. …

Read More »

जल्लोष विजयाचा

Read More »

रायगडातून शेकाप हद्दपार, भाजप वाढली

रायगड जिल्ह्यातून शेकाप हद्दपार झाला, भाजपच्या जागा वाढल्या, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व अधोरेखित झाले, राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळाली, महायुतीला मोठे यश मिळाले, अशा चार ते पाच वाक्यांत रायगड जिल्ह्यातील निकालाचे विवेचन करता येईल.  महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक झाली. निकाल लागला. विजयी उमेदवारांनी गुलाल उडविला, तर पराभूत उमेदवार …

Read More »

रायगड उजळला

निकाल जाहीर होत असताना विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी महायुतीला मतदारांनी नाकारले अशी विधाने केली, परंतु स्पष्ट बहुमताचा कौल मिळालेल्या महायुतीला मतदारांनी नाकारल्याची हाकाटी करणे हा हास्यास्पद प्रकार आहे. चुकूनमाकून काही जागा आयत्या वाढल्यामुळे आता ईव्हीएमवर खापर तरी कसे फोडायचे अशी नवीच डोकेदुखी विरोधी पक्षाच्या नेत्यांना जडली असेल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत …

Read More »

‘पीएमसी’च्या खातेदारांना दिलासा

अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार मुंबई : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमसी बँक खातेदारांना आता 40 हजारांशिवाय अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार आहेत. महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. निकडीचा प्रसंगाच्या वेळीच ही 50 हजार रुपयांची …

Read More »

राष्ट्रवादीच्या ‘त्या’ उमेदवार प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

सातारा ः प्रतिनिधी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानादरम्यान जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी (ता. खटाव) गावातील मतदान केंद्रात कोणतेही बटण दाबल्यास मत कमळाला अर्थात भाजपच्या उमेदवाराला जात असल्याचे वृत्त स्थानिक ग्रामस्थांच्या हवाल्याने माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते. याप्रकरणी खोटी माहिती प्रसारमाध्यमांना देऊन निवडणूक प्रक्रियेविषयी समाजात गैरसमज पसरवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतिनिधी दीपक …

Read More »

कोल्हापुरात बॉम्बसाठा जप्त

69 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ; दोघांना अटक कोल्हापूर : प्रतिनिधी जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब बनवणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. 22) रात्री अटक केली आहे. हातकणंगले येथील माले मुडशिंगी गावात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून गावठी बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि 69 जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात …

Read More »

आता झारखंडमध्ये भाजपची मेगाभरती

रांची : वृत्तसंस्था झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची तारीखही अजून जाहीर झालेली नाही आणि भाजपने झारखंडमध्ये महाराष्ट्राप्रमाणे मेगाभरतीचा पॅटर्न सुरू केली आहे. माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखदेव भगत यांच्यासह विरोधी पक्षांच्या एकूण सहा आमदारांनी भाजपत प्रवेश केला आहे. रांचीमध्ये …

Read More »

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

10 हजारांवर कर्मचार्‍यांची नियुक्ती; मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे नजर मुंबई ः प्रतिनिधी राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी 10 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी बुधवारी (दि. 23) दिली. गुरुवारी सकाळी …

Read More »

पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक उत्तम धायगुडे यांनी पीएचडी पदवी संपादन केली आहे. त्याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रा. धायगुडे यांचे बुधवारी अभिनंदन केले. या वेळी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, प्रा. जे. व्ही. बोरगावे, प्रमोद कोळी, देवेंद्र म्हात्रे, रवींद्र भोईर …

Read More »