Breaking News

महत्वाच्या बातम्या

दोन राजांच्या भांडणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पेचात

मुंबई : प्रतिनिधी नीरा देवघर धरणातील पाणी वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे निंबाळकर-उदयनराजे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मुंबईत बैठक बोलविली होती. मात्र, शरद पवारांची शिष्टाई निष्फळ ठरली आहे. या वेळी …

Read More »

‘स्वच्छ भारत अभियानात कामगारांचा मोठा वाटा’

पेण : प्रतिनिधी भारत स्वच्छता अभियाना अंतर्गत पेण नगर परिषदेने शहर स्वच्छतेबाबत चांगली कामगिरी बजावली असून, राज्याच्या मानांकनामध्ये स्वच्छतेबाबत पेण नगर परिषदेला 49 वा मानांकन मिळाले आहे. या कामगिरीत सफाई कामगारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले.  स्वच्छ भारत अभियानात सातत्य रहावे, या हेतुने राज्य शासनाने सफाई …

Read More »

समुपदेशन प्रक्रियेत गोंधळ; शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर

अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी शुक्रवारी (दि. 14)जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्ह्यातील विविध भागातून 250 शिक्षक दाखल झाले होते, मात्र समुपदेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या तालुक्यांतील बदल्यांची प्रक्रिया  पूर्ण झाल्याचे शिक्षकांना सांगण्यात आले. त्यामुळे बदली …

Read More »

खालापुरात गॅसवाहक टँकर घसरला

खालापूर : प्रतिनिधी मुंबई – पुणे महामार्गावरील कलोते (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारा टँकर शनिवारी (दि. 15) सकाळी निसरड्या रस्त्यावरुन घसरला व महामार्गावर आडवा झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र कलोते गावाजवळ काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. इंडेन कंपनीचा स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारा टँकर …

Read More »

महाड तालुक्यातील नुकसानग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

महाड : प्रतिनिधी अतिवृष्टी व वादळी पावसामुळे मागील दोन वर्षांमध्ये महाड तालुक्यामधील 35 गावांतील ग्रामस्थांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या ग्रामस्थांना आता सरकारने मदतीचा हात दिला आहे. तालुक्यातील तब्बल 425 आपद्ग्रस्तांना सुमारे साडेतेरा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. महाड तालुक्याला नैसर्गिक आपत्तीचा इतिहास आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात …

Read More »

सायकलवर प्रवास करून दिला पाणी बचत, स्वच्छतेचा संदेश

पनवेल : बातमीदार बारामतीहून 10 दिवस सायकलवर प्रवास करून स्वच्छता, पाणी बचत व किल्ले संवर्धनचा संदेश एक 48 वर्षाचा अवलिया देत आहे. 14 जून रोजी हा 48 वर्षीय अवलिया पनवेल येथे आला होता. यावेळी 1220 किलोमीटरचा प्रवास झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. सुभाष चौक, बारामतीहून निघालेले एकनाथ जनार्दन देशमाने (वय …

Read More »

रस्त्यावरील मुलांना मोफत शिकवणी

पनवेल : प्रतिनिधी रस्त्यावरील गरीब वंचित घटक नेहमीच शिक्षणापासून वंचित राहिला आहे. अशा या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंजिरी ट्रस्ट खारघर शहरासह नवी मुंबईत कार्यरत आहे. मुलांना शाळेत प्रवेश देऊन त्यांना फावल्या वेळेत शिकवणी देण्याचे काम या ट्रस्टच्या मार्फत केले जाते. सुमुखी उमेश यांचे याकरिता मोलाचे योगदान आहे. या वर्षी …

Read More »

कंत्राटी कामगार व प्रकल्पबाधितांना न्याय मिळवून देऊ -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

अलिबाग : जिमाका मौजे रासळ येथील कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कंत्राटी कामगारांना तसेच एचओसी प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 15) अलिबाग येथे दिले. रासळ येथील कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत अलिबाग येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर, …

Read More »

जेएनपीटी बायपासवरील काँक्रीट रस्त्यावर बेकायदा पार्किंग

पनवेल : बातमीदार महामार्गाच्या बाजूला शेवटच्या मार्गिकांवर अनेक ठिकाणी बेकायदा पार्किंग केल्याचे पाहायला मिळते, मात्र नव्याने रूंदीकरण करून काँक्रिटीकरण केलेल्या जेएनपीटी आम्रमार्गावरही महामार्गाच्या मधोमध पहिल्या मार्गिकेवर बेकायदा पार्किंग केली जात आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या कळंबोली वाहतूक शाखेकडून या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. सायन-पनवेल महामार्ग, मुंब्रा-पनवेल, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग …

Read More »

स्पर्धा परीक्षा सेमिनार रविवारी

पनवेल : खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात रविवारी (दि. 16) सायंकाळी 5.30 वाजता यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे आदी स्पर्धा परीक्षांचे मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी प्रा. संजय हिरेमठ व इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. या सेमिनारचा लाभ बारावी ते पदवीधर विद्यार्थी घेऊ शकणार असून जास्तीत जास्त …

Read More »