Breaking News

महत्वाच्या बातम्या

मोर्बे धरणाची तातडीने दुरुस्ती करावी : आ. प्रशांत ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली. त्या अनुषंगाने धरणाच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर प्रगतिपथावर असून लवकरच या धरणाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात होणार आहे. मोर्बे धरणाची दुरवस्था झाल्याने दररोज लाखो …

Read More »

सीकेटी विद्यालयाचे शिष्यवृत्तीत सुयश

पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत फेब्र्ाुवारी 2019मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. नयन नारायण फडके, वैष्णवी नितीन शिंदे, जित विनोद गायकर अशी पूर्व …

Read More »

सुगंधी पोह्यासाठी भाताची ’कर्जत शताब्दी’ जात विकसित

कर्जत ः प्रतिनिधी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक व भात विशेषज्ञ डॉ. आर. एल. कुणकेरकर यांच्या नेतृत्वाखाली सुगंधी पोह्यासाठी ’कर्जत शताब्दी’ ही भाताची नवीन जात ’बोटवेल’ या स्थानिक जातीपासून उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आली आहे. ’कर्जत शताब्दी’ ही भाताची नवीन जात कमी उंचीची (बुटकी), न लोळणारी, 125-130 …

Read More »

पाकच्या पराभवानंतर मोहसीन खान यांचा राजीनामा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी कसोटीपटू मोहसीन खान यांनी भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाक क्रिकेट बोर्डातील आपल्या क्रिकेट कमिटी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे काम मोहसीन खान यांच्याकडे होते, मात्र खान यांनी पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांना आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती …

Read More »

सुधागडच्या सुष्मिताचे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुयश ; कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी होणार निवड, पाच सुवर्णांसह 32 पदकांची मानकरी

ठाणे ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील वाघोशी गावचे रहिवासी सुनील देशमुख यांची कन्या सुष्मिता देशमुखने 17 जूनला केरळमध्ये पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 47 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे, तर आगामी कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी सुष्मिताची निवड भारतीय संघात होणार आहे. विशेष म्हणजे सुष्मिताने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

उरण : न्हवा शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना त्यांचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे. सागरी सेतू प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याबद्दल सागरी सेतू प्रकल्पबाधितांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Read More »

दिवेआगर समुद्रात बंदी असतानाही बोटींग

दिवेआगर ः प्रतिनिधी  दिवेआगर समुद्रात पर्यटकांच्या मौजेसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या परवानगीने साहसी खेळ प्रकारातील स्पीड बोटींची सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र पावसाळा सुरू होण्याआधी 25 मेपर्यंतच स्पीड बोट सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र मेरिटाइम बोर्डाचा आदेश धुडकावून दिवेआगर समुद्रात 15 व 16 जून या सुटीच्या दिवशी खवळलेल्या समुद्रात बोटींग …

Read More »

चौक भाजप महिला मोर्चाच्या विविध पदांच्या नियुक्त्या

रसायनी : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत भाजपला सुयश मिळाल्याने स्थानिक पातळीवर पक्षवाढीसाठी महिला संघटना नेमणूक करण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः महिला मोर्चासाठी बांधणी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद विभागप्रमुखपर्यंत या नेमणुका आहेत. रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार व महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप ग्रामपंचायत चौकच्या महिला …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षणात सक्रियपणे सहभाग घ्या -नगराध्यक्षा पाटील

पेण : प्रतिनिधी स्वच्छ सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेऊन, नागरिकांनी आपला परिसर व आपले शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी गुरूवारी (दि. 20) येथे केले. महाराष्ट्र नागरी विकास अभियान विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण पेणमधील हॉटेल, शाळा, रूग्णालय, निवासी संकुल, शासकीय कार्यालये, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणच्या स्वच्छतेबाबत नगर …

Read More »

टीआयपीएलतर्फे ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त : महाराष्ट्र राज्य वाहतूक शाखेकडून सुरक्षित प्रवासासाठी ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंंतर्गत टीआयपीएल कंपनीतर्फे पाडेघर येथील प्रवेशद्वारापाशी गुरुवारी (दि 20) दुपारी अभियानाला सुरुवात झाली. या उपक्रमाचे उद्घाटन वाहतूक विभागाचे सहा. आयुक्त राजेंद्र चव्हाण, इन्स्पेक्टर पराग सोनावणे यांच्या हस्ते झाले. यावेळी टीआयपीएलचे …

Read More »