Breaking News

महत्वाच्या बातम्या

पत्नी व तिच्या प्रियकरावर पतीने केला प्राणघातक हल्ला

पनवेल : वार्ताहर कामोठ्यात राहणार्‍या एका विवाहितेने पतीला सोडून विवाहित असलेल्या नितीन शेडगे (28) याच्यासोबत घरोबा केल्याने सदर विवाहितेच्या पतीने व त्याच्या भावाने नितीन शेडगे व विवाहितेवर चाकू व कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना मानसरोवर रेल्वेस्टेशन जवळ घडली. या हल्ल्यात नितीन व त्याची प्रेयसी गंभीर जखमी झाली असून दोघांवर …

Read More »

राष्ट्रसेविका समिती कोकण प्रांतच्या वतीनं प्रवेश शिक्षा वर्गाचे आयोजन

पनवेल : येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात राष्ट्रसेविका समिती कोकण प्रांतच्या वतीनं प्रवेश शिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा समारोप रविवारी होणार असून, या वेळी नगरसेविका मुग्धा लोंढे, महिला मोर्च्याच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, स्वाती कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

माथेरानमध्ये महायुतीकडून जल्लोष

नेरळ : बातमीदार खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात विजय मिळविल्याने माथेरान शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निवडणुकीचे निकाल झाल्यानंतर माथेरानमध्ये शिवसेना, भाजप आणि आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते माथेरानमधील श्रीराम चौकात जमले आणि त्यांनी विजयाचा जल्लोष केला. त्यावेळी भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील, आरपीआय आठवले गटाचे शहर अध्यक्ष अनिल …

Read More »

मुरूड-जंजिराच्या परिसराचे नयनरम्य क्षण

मुरूड : मुंबईतील फोटोग्राफीकल सोसायटी ऑफ इंडियाच्या छायाचित्रकांनी निसर्गरम्य मुरूड-जंजिराच्या परिसराचे नयनरम्य क्षण टिपले. (छाया : सुधीर नाझरे)

Read More »

नगरसेवक राजू सोनी यांनी केली स्वखर्चाने चेंबरची दुरुस्ती

पनवेल : वार्ताहर  : पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी रोहिदासवाडा व परिसरातील दुर्दशा झालेल्या गटारे व चेंबरची दुरुस्ती स्वखर्चाने करून दिली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील गटारे व चेंबरची अवस्था खराब होती. या संदर्भातील अनेक तक्रारी स्थानिक रहिवाशांनी पनवेल महानगरपालिकेतील संबंधित खात्याकडे केल्या होत्या, परंतु याची दखल न घेतल्याने, …

Read More »

तरुणाला बेदम मारहाण

पनवेल : बातमीदार  : अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणार्‍या राकेश हरकुळकर (35) याने गुन्हा मागे घ्यावा, यासाठी त्याला अज्ञात चौकडीने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री कामोठे येथे घडली. या मारहाणीत राकेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कळंबोली पोलिसांनी अज्ञात चौकडीवर मारहाणीचा गुन्हा दाखल …

Read More »

रिक्षाचालकांचा रस्त्यावर कब्जा

नागरिक, वाहनचालकांची गैरसोय पनवेल : बातमीदार  : पनवेल एसटी स्थानकाबाहेर परिसरात वाहनांची कायम गर्दी असते. अशा प्रचंड गर्दीतही येथील एक मुख्य रस्ता इको आणि सहाआसनी रिक्षाचालकांनी गिळंकृत केला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहनांसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद झाल्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय होत आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेकडून कारवाई होऊनही पोलिसांचा …

Read More »

रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 07 ते 09 जूनपर्यंत करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील बॅडमिंटनपटूंसाठी सुवर्णसंधी असलेली ही स्पर्धा 11, 13, 15, …

Read More »

वर्ल्ड कप विजयाचे सेलिब्रेशन करणारा ‘तो’ खेळाडू भारतीय संघात

लंडन : वृत्तसंस्था प्रत्येक खेळाडूचे भारताकडून खेळायचे स्वप्न असते. त्याचबरोबर विश्वचषकाच्या संघात आपल्याला स्थान मिळावे आणि वर्ल्ड कप जिंकून तो आपल्या हातात घेऊन उंचवावा, असे प्रत्येक खेळाडूला वाटत असते. काही जणांची स्वप्ने खरी होतात, तर काहींची स्वप्न धुळीस मिळतात. असेच एक स्वप्न त्यानेही पाहिले होते आणि आज ते सत्यात उतरले …

Read More »

ख्रिस गेल खेळणार पाचव्यांदा विश्वचषक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होताच पाच किंवा त्यापेक्षा अधिक विश्वकप स्पर्धेत खेळणार्‍या क्रिकेटपटूंच्या विशिष्ट क्लबमध्ये स्थान मिळवणारा जगातील 19 वा खेळाडू ठरेल. भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर व पाकिस्तानचा जावेद मियांदाद यांनी सर्वाधिक सहा विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत, पण 16 असे …

Read More »